Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Tue, 30 Apr 2024-10:26 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • पुण्यात 7 महिन्याच्या चिमुकल्याचं अपहरण करणाऱ्या बेड्या

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Child Kidnapper Arrested : पुण्यातून एका 7 महिन्याच्या बालकाचं अपहरण करणा-या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. दोन दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनबाहेर आई-वडिलांसोबत झोपलेल्या बालकाला उचलून नेण्यात आलं होतं. एवढंच नाही तर त्या बालकाला विकण्यात देखील आल्याचा प्रकार समोर आलाय. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्यात. तर कर्नाटकातील विजापूरच्या एका हॉटेलमधून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. या कामगिरीमुळे पोलिसांचं कौतुक होत आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • उत्तर मुंबईमध्ये काँग्रेसकडून भूषण पाटलांना उमेदवारी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    North Mumbai Loksabha :  उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी भाजपकडून पियूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात आता भूषण पाटील विरुद्ध पियूष गोयल यांच्यात लढत होणार आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • गिरीश महाजनांनी घेतली छगन भुजबळांची भेट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Girish Mahajan Meets Chagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा सुरूये...या चर्चेमध्येच नाशिकचा उमेदवार ठरणार अशी माहिती सूत्रांकडून मिळालीये...गिरीश महाजन नाशिक दौ-यावर असून दिवसभर भेटीगाठी घेतल्यानंतर काहीवेळापूर्वी ते भुजबळांच्या भेटीला पोहोचले...पदाधिका-यांसोबत अर्धातास चर्चा झाल्यानंतर...भुजबळ आणि महाजनांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरूये...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • भांडुपमध्ये टॉर्च लावून महिलांची प्रसूती, नवजात शिशूसह आईचा मृत्यू

     

    Bhandup Hospital : भांडुपमध्ये सुषमा स्वराज पालिका प्रसुतीगृहामध्ये टॉर्च लावून महिलांची प्रसुती करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. एवढंच नाही तर सिझर करताना नवजात शिशूचा आणि एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय. गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानं तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिचादेखील मृत्यू झालाय. विद्युतपुरवठा खंडित झाल्यांना डॉक्टरांवर टॉर्च लावून प्रसुती करण्याची वेळ आलीय. महिलेच्या मृत्युमुळे महिलेच्या कुटुंबीयांनी संपात व्यक्त केलाय. ईशान्य मुंबई उपनगरातील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशूचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना नाही. त्यामुळे या भागात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. तसेच, संबंधित डॉक्टर आणि कर्मचा-यावर कारवाईची मागणी करण्यात येतेय. राज्यात एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना हा प्रकार घडलाय. त्यामुळे राजकीय नेत्यांनी या घटनेकडं लक्ष देण्याची गरज आहे.

  • द. मुंबईमधून शिवसेना शिंदे गटाकडून यामिनी जाधवांना तिकीट

     

    South Mumbai Loksabha : महायुतीचा दक्षिण मुंबईचा तिढा सुटलाय...दक्षिण मुंबईची जागा शिवसेना लढवणार आहे...शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये...आता दक्षिण मुंबईमध्ये शिवसेनेच्या यामिनी जाधव विरुद्ध ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत असा सामना रागणारे...

  •  2 मे रोजी श्रीकांत शिंदे कल्याणमधून उमेदवारी भरणार अर्ज

     

    Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे 2 मे रोजी लोकसभा उमेदवारी अर्ज भरणार आहेत...कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेनेतर्फे ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत...महायुती मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत डोंबिवली येथे हा अर्ज भरणारे...डोंबिवलीच्या गणेश मंदिर येथून ही रॅली काढण्यात येणारे...

  • कल्याणमध्ये ठाकरे गटाला पुन्हा खिंडार

     

    Vivek Khamkar : कल्याणमध्ये ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडलंय...ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर शिंदे गटात प्रवेश करणारेत...वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी खामकर गैरहजर होते...त्यांच्यासह कल्याण-डोंबिवलीतील अनेक पदाधिकारीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारेत...पक्षात महत्त्व मिळत नसल्याचा आरोप खामकर यांनी केलाय..

  • वर्ल्ड कप T-20साठी टीम इंडियाची घोषणा

     

    T-20 world Cup : टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून 19 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार असून हार्दिक पांड्या टीम इंडियाचा उपकर्णधार असणार आहे. टीम इंडियामधून केएल राहुलला डच्चू देण्यात आला असून ऋषभ पंतची टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली आहे.

  • 'सामान्यांच्या संपत्तीवर काँग्रेसची नजर',पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

     

    PM Narendra Modi Live | Marathi News LIVE Today : काँग्रेसनं देशाला फक्त गरिबी दिली...संपत्ती लुटण्याचा काँग्रेसचा प्लॅन...सामान्यांच्या संपत्तीवर काँग्रेसची नजर...लुटणाऱ्या पंजाला साथ दिली पाहिजे?..काँग्रेसनं फक्त एकाच परिवाराचा विचार केला...पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल... 2014मध्ये दहशतवाद, बॉम्बस्फोट...आता भारत घरात घुसून मारतो...पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला...2036 मध्ये ऑलिम्पिक भरवण्याचं स्वप्न...काँग्रेसच्या काळात देश असुरक्षित होता...आज भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था...पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य..

  • भाजप संविधान बदलणार हे निराधार - अमित शाह

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amit Shah : संविधान बदलण्यासाठी, आरक्षण हटवण्यासाठी भाजपनं 400पार जागांचा नारा दिलाय, असा आरोप काँग्रेसकडून सातत्यानं होतोय. काँग्रेसचे हे आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी खोडून काढलेत. हे आरोप निराधार आणि तथ्यहीन असल्याचं अमित शाहांनी म्हटलंय. 10 वर्ष भाजपकडे बहुमत होतं, बहुमताचा वापर 370हटवणं, तिहेरी तलाख, राम मंदिरासाठी अनुकूल वातावरण तयार करायला केला असं अमित शाहांनी म्हटलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • कळंबा कारागृहात खळबळ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kolhapur Kalamb Jail : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील मोबाईल प्रकरण अधिकाऱ्यांना भोवलंय. याप्रकरणी दोन तुरुंग अधिका-यांसह 11 कर्मचा-यांना कारागृह प्रशासनाने बडतर्फ केलं. कळंबा मध्यवर्ती कारागृहात गेल्या अनेक महिन्यांपासून मोबाईल ,गांजा सापडण्याच्या घटना वारंवार घडतायत. कारागृह सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता याच पार्श्वभूमीवर आता कारागृह प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. कारागृहात 75 पेक्षा जास्त कैद्यांकडे मोबाईल सापडल्याप्रकरणी दोन तुरुंगाधिकाऱ्यांसह 11 कर्मचाऱ्यांवर कारागृह प्रशासनाने बडतर्फची कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली.  

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबईकरांचे खिसे कापण्याचा प्रयत्न - आदित्य ठाकरे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Aaditya Thackeray Tweet : मुंबईतील बेस्ट बसच्या प्रस्तावित भाडेवाढीवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय...भाजप हे मुंबईविरोधी असून, प्रस्तावित भाडेवाढ म्हणजे मुंबईकरांचे खिसे कापण्याचा आणखी एक मार्ग असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय...बसचं भाडं 5 रुपयांवरून 7 रुपये केलं जाणार आहे...तर एसी बसचं 6 वरून 10 रुपये केलं जाणार आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • चांदवडच्या राहुड घाटात बस-ट्रकचा अपघात, 3 ते 4 जणांचा मृत्यू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chandwad Accident : चांदवडमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय.. या दुर्घटनेत 3 ते 4 प्रवासी दगावल्याची महिती मिळतीये.. तर 17 प्रवासी जखमी झालेत.. यातील 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.. मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात ही दुर्घटना घडलीये.. बसचा टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतीये.. 

    बातमी पाहा - नाशिकमध्ये ST बसचा भीषण अपघात! 3 ते 4 प्रवाशांचा मृत्यू; टायर फुटल्याने दुर्घटना

  • मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Water : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट ओढावलंय.. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांतील पाण्याची पातळी सतत घटू लागलीये.. मुंबईच्या प्रमुख धरणांपैकी तानसा आणि भातसा धरणांतील पाणासाठा सातत्यानं घटू लागलाय. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सातही धरणांतील पाणीसाठा 20 टक्क्यांवर आलाय. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानाचा परिणाम जलसाठ्यावर होऊ लागला आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नागपुरातील मतदार याद्यांचा घोळ कोर्टात

     

    Nagpur : नागपुरातील मतदार याद्यांचा घोळ कोर्टात जाणार आहे...नागपुरातील भाजपने कोर्टात जाण्याची तयारी केलीय...षडयंत्र करून 2 लाख मतदारांची नावे गहाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय...प्रशासनाने नागपुरात यंदा 75 टक्के पर्यंत मतदान वाढवू असा गाजावाजा केला... मात्र प्रत्यक्षात नागपुरात फक्त 54 टक्केच मतदान होऊ शकले... याला जबाबदार मतदान अधिकारी असून, 2 लाख मतदारांना वंचित ठेवल्याचा आरोप करत अधिका-यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आलीय...लवकरच भाजपकडून नागपूरमधील मतदार याद्यांमधील चुकांसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे...

  • अजित पवारांचे पंतप्रधान मोदींबद्दल गौरवोद्गार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar : पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींची तुलनाच होऊ शकत नाही असं विधान अजित पवारांनी केलंय. ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदींबद्दल गौरवोद्गार काढलेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • देशातील विमानतळांवर धमकीचे ई-मेल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Airport Security : वाराणसीसह देशातील 30 विमानतळं बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आलीये.. देशभरातील विमानतळांवर असे धमकीचे मेल आल्यानं एकच खळबळ उडालीये.. जयपूर, नागपूर, गोवा विमानतळांनाही अशाच प्रकारचे मेल आले आहेत.हा इमेल फसवा असल्याचा संशय पोलिसांना आहे.. मात्र तरिही खबरदारी म्हणून विमानतळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीये.. दरम्यान इमेल पाठवणा-याचा शोध पोलीस घेत आहेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Election 2024 : उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग वाढलीय. आज कोणते उमेदवार अर्ज दाखल करणारेत पाहूयात... भाजपचे पियूष गोयल मुंबई उत्तरमधील उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल करतील. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात ते अर्ज भरणारेत. त्यांच्याविरोधात मविआला उमेदवारच सापडत नाहीय. इकडे उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड अर्ज भरतील. भाजपनं त्यांच्याविरोधात उज्ज्वल निकमांना मैदानात उतरवलंय. उत्तर पूर्व मुंबईतून संजय दिना पाटील उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यांच्या विरोधात असलेल्या मिहीर कोटेचा यांनी दोन दिवसांपूर्वीच अर्ज दाखल केलाय. इकडे कल्याण मतदारसंघात महायुतीसमोर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर रिंगणात आहेत. त्या आज शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करतील. यावेळी आदित्य ठाकरेंचा रोड शो होणारेय. कल्याणमध्ये शिंदेंकडून अधिकृतरित्या अजूनही श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा झालेली नाही. धुळ्यामध्ये काँग्रेस अंतर्गतच विरोधाचा सामना करावा लागलेल्या शोभा बच्छाव यांचाही आज अर्ज भरण्यात येणारेय. यावेळी बाळासाहेब थोरात उपस्थित असतील. त्यांच्यासमोर भाजपच्या डॉ. सुभाष भामरेंचं आव्हान असणारेय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबईकरांचा 'बेस्ट'चा प्रवास महागणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Best Ticket Rate Hike : मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास महागण्याची शक्यताय. साध्या बसचं किमान तिकीट 7 रुपये तर एसी बसचं किमान तिकीट 10 रुपये होणार असल्याचं समजतंय. आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट प्रशासनाला मुंबई महापालिकेनं दरवाढ सुचवलीय. बेस्ट उपक्रमानं महापालिका प्रशासनाकडे 3 हजार कोटींची मागणी केली होती. मात्र बीएमसीनं पैसे देण्यास नकार देत बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्न वाढीचे पर्याय सूचवलेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर बेस्ट बसच्या प्रवाशांना दरवाढीचा झटका बसणारेय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभांचा महाराष्ट्रात झंझावात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचाराचा झंझावात आजही राज्यात पाहायला मिळणार आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज राज्यात तीन सभा होणार आहेत.. माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये आज मोदींच्या सभा असतील..  माढामधील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरस येथे.... राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्यासाठी धाराशिवमध्ये.. तर भाजपच्या शुधाकर शृंगारेंच्या प्रचारासाठी लातूरमध्ये मोदी सभा घेणार आहेत..  त्यांच्या या सभांची जय्यत तयारी करण्यात आलीये. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link