Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Sat, 07 Dec 2024-10:17 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 07 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • EVM विरोधात जनतेत असंतोष - सुप्रिया सुळे

     

    Supriya Sule On EVM : राज्यातील जनतेत EVMबाबत प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे EVM ऐवजी बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी जनतेकडून होत आहे. या मागणीवर विचार करायला काय हरकत आहे, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तसंच EVMविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याच्या मुद्द्यावर सोमवारी निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

  • निकालानंतर राज्यात उत्साहाचं वातावरण नाही - शरद पवार

     

    Sharad Pawar : विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण दिसत नाही... मतांची आकडेवारी बघितल्यास आश्चर्य वाटतं.. त्यामुळे पराभव झाला तरी चिंता करायची नाही.. असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय.. 

  • बदलापूरमध्ये 2 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

     

    Badlapur : बदलापूरच्या सोनिवली अदिवासी वाडीत उलट्या आणि जुलाबांमुळे 2 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.. इथल्या मिरकुटे कुटुंबातील 5 जणांना पाणी किंवा अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. यापैकी 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय. विशेष म्हणजे या कुटुंबावर करणी झाल्याचा संशय व्यक्त करत, आधी बदलापूर महापालिका रुग्णालयानं त्यांना दाखल करायला नकार दिला. मात्र आशआ सेविका समाजसेवकांनी समजावल्यानंतर रुग्णालयानं त्यांना दाखल करुन घेतलं. तर विषबाधेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेनं आदिवासी वाडीत आरोग्य शिबीर घेऊन गावक-यांची तपासणी केली. 

  • हा निवडून देणाऱ्या मतदारांचा अपमान - फडणवीस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Devendra Fadanvis : जनतेनं ज्यांना निवडून दिलं ते लोकप्रतिनिधी शपथ घेत नाहीत, हा निवडून देणा-या मतदारांचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला. त्यावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • एकनाथ शिंदे विधान परिषद सभागृह नेते होणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Eknath Shinde : विधानपरिषदेचे सभागृह नेता एकनाथ शिंदे होण्याची शक्यता आहे.. हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे हे कामकाज पाहण्याची शक्यता आहे. सध्या विधानसभेचे महायुतीचे सभागृह नेते म्हणून देवेंद्र फडणवीस हे कामकाज बघत आहेत.. मागील सरकारमध्ये फडणवीस हे विधान परिषदेचे सभागृह नेते होते तर एकनाथ शिंदे हे विधानसभेचे सभागृह नेते होते. त्यामुळे या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून विधानपरिषदेचे सभागृह नेते होण्याची शक्यता आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बीडमधील रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा

     

    Beed Hospital : बीडच्या अंबाजोगाईमधील स्वाराती रुग्णालयास बनावट औषधींचा पुरवठा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची बाब अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीमध्ये समोर आलीय.. महाराष्ट्र शासनानं नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदारानं रुग्णालयास बनावट औषधीचा पुरवठा केल्याचं तपासणीमध्ये उघड झालंय.. याप्रकरणी ठाणे आणि गुजरातमधील चौघांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. या बनावट औषध प्रकरणाचं गुजरात कनेक्शन असल्याचं समोर आलं असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत..

  • शरद पवार उद्या मारकडवाडीच्या दौऱ्यावर

     

    Sharad Pawar : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार उद्या सोलापुरातील मारकडवाडीचा दौरा करणार आहेत. राष्ट्रवादी SP पक्षाचे नवनिर्वाचित आमदार उत्तमराव जानकर यांनी EVMविरोधात भूमिका घेतली आहे. त्याबाबत मारकडवाडीतील ग्रामस्थांना भेटून, त्यांच्याशी पवार संवाद साधणार आहेत. उद्या सकाळी साडे दहा वाजता शरद पवार माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावाचा दौरा करणार आहेत. 

  • शिवसेना UBT पक्षाचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bhaskar Jadhav : विरोधी पक्षनेतेपद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मिळावं अशी मागणी भास्कर जाधव यांनी केलीय.. प्रथा परंपरेनुसार सर्वात मोठ्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळतं असंही भास्कर जाधव म्हणालेत.. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष आमच्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • जिंकल्यावर EVM चांगलं आणि हरलं की वाईट- अजित पवार

     

    Ajit Pawar on EVM : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना खडसावलंय. जिंकल्यावर EVM चांगलं आणि हरलं की वाईट, असं म्हणत त्यांनी निशाणा साधलाय. विरोधक काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतात, उद्या शपथविधीचा शेवटचा दिवस आहे.त्यामुळे विरोधकांना उद्या शपथ घ्यावीच लागेल, असंही अजित पवार म्हणालेत. 

  • राहुल गांधी मारकडवाडीला भेट देणार-जितेंद्र आव्हाड

     

    Jitendra Awhad on Rahul Gandhi : 'राहुल गांधी मारकडवाडीला भेट देणार'..आमदार जितेंद्र आव्हाडांची माहिती... राहुल गांधींच्या दौ-याचं नियोजन सुरू-नाना पटोले..सध्या दौरा निश्चित झाला नाही-पटोले

  • 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन?

     

    State Legislature Session 2024 : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय.. 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होण्याची शक्यात आहे.. दरम्यान त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्याता आहे असं अजित पवार म्हणालेत.. 

  • 'वेडवाकडं वागल्यास बंदोबस्त करणार', निलेश राणेंचा इशारा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nilesh Rane : विरोधकांच्या अॅक्शनला रिअॅक्शन मिळणार, असा इशारा शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी दिला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. माझ्याशी वेडवाकडं वागलात तर बंदोबस्त करणार, असं ते म्हणालेत. विरोधक नीट वागले नाहीत तर माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका, असंही निलेश राणे म्हणालेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

     

  • विशेष अधिवेशनादरम्यान विरोधकांचा सभात्याग

     

    Mahavikas Aghadi : विशेष अधिवेशनादरम्यान विरोधकांचा सभात्याग..शपथ न घेताच विरोधी पक्षाचे आमदार सभागृहाबाहेर

  •  गुलाबराव देवकर राष्ट्रवादीच्या वाटेवर?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Gulabrao Devkar : जळगावमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गुलाबराव देवकर राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. गुलाबरावांनी देवकरांनी मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची भेट घेतलीय. या भेटीत पक्षप्रवेशनाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांआधी जळगाव मध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव देवकर यांचा शिवसेना नेते गुलाबराव पाटलांकडून पराभव झाला होता.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • भंडाऱ्यात मोबाईलच्या स्फोटात मुख्याध्यापकाचा मृत्यू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bhandara : जर तुम्ही मोबाईल खिशात ठेवून फिरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी... खिशात ठेवलेल्या मोबाईलच्या स्फोट होऊन एका मुख्याध्यापकाचा मृत्यू झालाय.. तर एक गंभीर जखमी झालाय... भंडारा जिल्ह्यातील सिरेगाव टोला इथं ही घटना घडलीये.. सुरेश संग्रामे असं मृत मुख्याध्यापकाचं नाव आहे.. ते नत्थु गायकवाड यांच्यासोबत दुचाकीवरुन जात असताना अचानक त्यांच्या मोबाईलचा स्फोट झाला.. त्यानंतर त्यांच्या कपड्याला आग लागली.. यात ते भाजले.. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.. तर त्यांचा मित्र नत्थु गायकवाड हा देखील गंभीर जखमी झालाय.. 

     

  • विधान परिषदेला सभापती मिळणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    State Legislature Session 2024 : विशेष अधिवेशनात विधान परिषद सभापती निवडीची शक्यता..गेल्या दोन वर्षांपासून सभापती पद रिक्त...सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवड...अध्यक्षांसोबत परिषदेच्या सभापतींचीही निवड होण्याची शक्यता

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे दुसऱ्या क्रमांकावर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Eknath Shinde : कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे दुस-या क्रमांकावर...एकनाथ शिंदेंना नागपुरातील देवगिरी बंगला..हिवाळी अधिवेशनासाठी बंगल्यांचं वाटप..अजितदादांचा विजयगड बंगल्यावर मुक्काम...शिंदेंकडं दिल्या जाणा-या खात्यांबाबत उत्सुकता

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • फडणवीस मंत्रिमंडळ नव्या चेहऱ्यांचं असणार?

     

    State Cabinet : फडणवीस मंत्रिमंडळ नव्या चेह-यांचं असणार?..ज्येष्ठ नेते मंत्रिमंडळाबाहेर राहणार?..जुन्या जाणत्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याची शक्यता...महाराष्ट्र भाजपातही मार्गदर्शक मंडळ?..कुणाकुणाचा ज्येष्ठत्वानुसार पत्ता कट होणार

  • ठाणे आणि भिवंडीतील 10% पाणीकपात मागे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Thane Water Cut Withdraw : ठाणे आणि भिवंडीकरांसाठी आनंदाची बातमी.. मुंबईसह ठाणे शहरात लागू करण्यात आलेली 10 टक्के पाणी कपात रद्द करण्यात आलीये.. या शहरांना पाणीपुरवठा करणा-या पिसे येथील 'न्यूमॅटिक गेट सिस्टीम'मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यामुळे मुंबई महापालिकेने लागू केलेली १० टक्के पाणीकपात शुक्रवारी मागे घेतली. महापालिकेतर्फे ठाणे आणि भिवंडी परिसरातही पाणीपुरवठा करण्यात येतो. अशात ही पाणीकपात रद्द केल्यामुळे ठाणे आणि भिवंडीकरांनाही दिलासा मिळालाय.. पिसे न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये 30 नोव्हेंबर रोजी बिघाड झाला होता... महानगरपालिकेने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. हे काम 1 आणि 2 डिसेंबर या कालावधीत पूर्ण करण्यात आले. पाणीपुरवठा यंत्रणा स्थिर झाल्यानंतर शुक्रवार 6 डिसेंबरपासून ही पाणीकपात मागे घेण्यात आलीये.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

     

  • जळगाव पालिकेची पाईपलाईन चोरीला

     

    Jalgaon :  जळगाव महापालिकेच्या किरणा पंपिंग ची ब्रिटिश कालीन जुनी पाईपलाईन चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर यांचे पती व महापालिकेचे विरोधी पक्षनेते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेनंतर महापालिका पाणीपुरवठा विभागाने जेसीबी द्वारे संपूर्ण पाईपलाईनची तपासणी केली असता यात 1 हजार 260 मीटर लांबीचे पाईप चोरीला गेल्याचे आढळून आलं. या पाईपची किंमत सुमारे सव्वा कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे
     

  • महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Important meeting of Mahayuti today : महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक...मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता..महायुतीच्या प्रमुख नेते राहणार बैठकीला उपस्थित.. कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

     

  • आजपासून राज्य विधीमंडळाचं अधिवेशन

     

    State Legislature Session from Today : राज्य विधीमंडळाचं आजपासून मुंबईत विशेष अधिवेशन...आजपासून 3 दिवसांचं विशेष अधिवेशन... 7, 8 डिसेंबरला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी... सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशनाला सुरुवात...9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड.. 9 डिसेंबरला संध्याकाळी 4 वाजता दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राज्यपालांचं अभिभाषण.. त्यानंतर 9 डिसेंबरलाच नागपूरमध्ये होणा-या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा केली जाईल. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link