Student Bus Pass at School : शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिलासा
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 16 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' मोहिमेअंतर्गत एसटीचा पास थेट विद्यार्थ्यांच्या शाळेत
Student Bus Pass at School : शाळा - महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी आहे. 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' या विशेष मोहिमेंतर्गत एसटीचा पास थेट विद्यार्थ्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहे. तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी विद्यार्थिनींचा एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभं राहण्याचा त्रास वाचणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
अभिनेता सलमानला व्हिडिओतून धमकी देणाऱ्याला राजस्थानमधून अटक
Salman Khan Threat : अभिनेता सलमान खानला व्हिडिओ पोस्ट करत धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय... राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील बोर्डा गावातून त्याला अटक करण्यात आलीये.. बिश्नोई गँगच्या नावाने सलमानला धमकी देण्यात आली होती... बनवारीलाल गुजर ट्वेंटीफाईव्ह या यू ट्यूब चॅनलवरून सलमानला धमकी देण्यात आली होती.. सलमान खान कुठे जातो याचीही माहिती व्हिडिओत देण्यात आली होती.. व्हिडिओत लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
आत्महत्या थांबवा, नाहीतर राजकारण सोडेन.. पंकजा मुंडेंचं समर्थकांना भावनिक आवाहन
Pankaja Munde on Suicide : आत्महत्या थांबवा, नाहीतर राजकारण सोडेन, असं भावनिक आवाहन बीडमधील भाजपच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना केलंय.. लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. चिंचेवाडी येथील आत्महत्याग्रस्त वायबसे कुटुंबाला पंकजा मुंडेंनी भेट दिली. वायबसे कुटुंबाचा आक्रोश पाहून पंकजा मुंडेंनाही अश्रू अनावर झाले.. आत्महत्या करू नका, नाहीतर राजकारण सोडेन, असं भावनिक आवाहन त्यांनी यावेळी समर्थकांना केलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
EVM हॅक करणं अशक्य आहे.. ईव्हीएमसाठी कोणत्याही ओटीपीची गरज नसते- वंदना सूर्यवंशी
Election Commission on EVM : ईव्हीएम हॅक करणं अशक्य आहे.. ईव्हीएमसाठी कोणत्याही ओटीपीची गरज नसते असं स्पष्टीकरण निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिलंय.. वंदना सूर्यवंशी या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी आहेत.. तसंच चुकीची बातमी दिल्याबाबत एका वृतपत्राला नोटीस पाठवण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
'400पारनंतर भारत हिंदू राष्ट्र झालं असतं', टी राजांचं वादग्रस्त वक्तव्य
T. Raja Singh : भिवंडीतील धर्मसभेत हैदराबादमधील भाजप आमदार टी राजांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय.. 400पारनंतर भारत हिंदू राष्ट्र झालं असतं असं टी राजा म्हणालेत.. त्यांच्या या वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
'मनुष्य, AIकडून EVM हॅक करण्याचा धोका', एलन मस्क यांनी व्यक्त केली चिंता
Elon Musk on EVM : स्पेस एक्सचे CEO एलन मस्क यांनीदेखील EVM संदर्भात चिंता व्यक्त केलीय. EVM वापरणं बंद केलं पाहिजे असं मस्क म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे मोठी खळबळ उडालीय. मनुष्य, आणि AI कडून EVM हॅक करण्याचा धोका असल्याचं मस्क म्हणालेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
'EVM हा एक ब्लॅक बॉक्स', राहुल गांधींची EVMवरून टीका
Rahul Gandhi on EVM : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्ही ईव्हीएमवरून निशाणा साधलाय...EVM हा एक ब्लॅक बॉक्स आहे, EVM तपासाची कुणालाही परवानगी नाही, आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जातेय...जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्व नसते तेव्हा लोकशाहीला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.असं राहुल गांधींनी म्हटलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती
Sangli Zilla Parishad School : कन्नड भाषिक शाळेमध्ये मराठी शिक्षकांची नियुक्ती केल्याचा प्रकार सांगलीतील जत तालुक्यात उघडकीस आलाय.. जत तालुक्यातील 10 कन्नड शाळांमध्ये 11 मराठी भाषिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी केलाय.. विशेष म्हणजे पवित्र पोर्टलद्वारे या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलीये. आता हे मराठी भाषिक शिक्षक कन्नड विद्यार्थ्यांना कसे शिकवतील असा सवाल आमदार विक्रम सावंत यांनी उपस्थीत केलाय.. जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे कन्नड विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
BJP आमदारांची पुण्यात भरणार कार्यशाळा
BJP : लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अलर्ट मोडवर आलंय. पुण्यात भाजपच्या आमदारांची कार्यशाळा भरणारेय. संघाकडून महत्त्वाच्या आमदारांना प्रशिक्षित करुन विधानसभेचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सुत्रानं दिलीय. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या आठवड्यातच ही कार्यशाळा भरणारेय.
'मोदी-शाहा जेडीयू, टीडीपी पक्ष फोडतील', संजय राऊतांचा गंभीर आरोप
Chandrababu Naidu : खासदार संजय राऊतांनी मोदी-शाहांवर गंभीर आरोप केलाय...भाजपचा लोकसभा अध्यक्ष झाल्यास मोदी शाहा हे नितीशकुमार आणि चंद्राबाबूंचा पक्ष फोडतील असा आरोप राऊतांनी केलाय...चंद्राबांबूना लोकसभा अध्यक्षपद हवंय, त्यांनी उमेदवार दिल्यास आम्ही चर्चा करून पाठिंबा देऊ असंही राऊतांनी म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
संभाजीनगरात UPSCचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
Sambhajinagar UPSC Student Exam Missed : संभाजीनगरात यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिलेयत...गुगल मॅपमुळे रस्ता चुकल्याने परीक्षा केंद्रावर विद्यार्थी वेळेत पोहोचले नाहीत...त्यामुळे यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिलेयत...यामुळे इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झालेयत...यूपीएससी परीक्षेसाठी संभाजीनगरातील विवेकानंद कॉलेज या ठिकाणी यूपीएससी परीक्षा पार पडत आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी संभाजीनगर आले आहेत मात्र या परीक्षेसाठी देण्यात आलेल्या विवेकानंद कॉलेज हे केंद्र इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्यामुळे त्यांनी गुगल मॅप च्या साह्याने परीक्षा केंद्रापर्यंत वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र गुगल मॅप वर मूळ केंद्रापासून 11 किलोमीटरचे केंद्र दाखवत या विद्यार्थ्यांची दिशाभूल झाली
बातमीचा व्हिडीओ पाहा-
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल
Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे खासदार रवींद्र वायकरांच्या नातेवाईकासह निवडणूक अधिका-यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय...एम पंडिरकर हे रविंद्र वायकर यांचे नातेवाईक आहेत तर दिनेश गुरव निवडणुक अधिकारी आहेत...अमोल किर्तीकर आणि वायकर यांच्या थेट लढतीत 48 मतांनी वायकरांना विजयी घोषित करण्यात आले...गोरेगाव येथील नेस्को मतदान केंद्रावर मतमोजणीदरम्यान रविंद्र वायकर यांचे नातेवाईक एम. पंडिरकर हे मोबाईल घेऊन आले होते. मतदान केंद्रावर मोबाईन नेण्यास सक्त मनाई असताना त्यांना निवडणुक अधिकारी दिनेश गुरव यांनी मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. हा प्रकार उघडकीस येताच भारत जन आधार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वायकरांसह त्यांच्या नातेवाईक आणि निवडणुक अधिका-याविरुद्ध वनराई पोलिसांत तक्रार केली...या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोघांनाही चौकशीसाठी समन्स बजाविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
छगन भुजबळांना मुंबई सत्र न्यायालयाची तंबी
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मुंबई सत्र न्यायालयाची तंबी...कलिना मध्यवर्ती ग्रंथालय भूखंड गैरव्यवहार प्रकरणी तंबी..सुनावणीला हजर न राहील्यास अटक वॉरंट बजावणार..सुनावणी पुढे ढकलण्याचा अर्ज कोर्टानं फेटाळला
मध्य रेल्वे, हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक
Mumbai Mega Block : मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येतोय. त्यामुळे आज रेल्वेने प्रवास करत असाल तर वेळापत्रक पाहून बाहेर पडा. सकाळी ११:०५ ते दुपारी ३:०५ वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक आहे. तर सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत कुर्ला आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असणारेय. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येतोय..
राज्यात 483 गावांवर दरड कोसळण्याचा धोका
Landslides : यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील 483 गावांवर दरड कोसळण्याचा धोका आहे. ही सर्व ठिकाणं राज्य सरकार निश्चित करून जिल्हा प्रशासानाला कळवले आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका आहे. दरड कोसळून कुणाला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. तर नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना केल्यात
पुण्यातील सिग्नलची जबाबदारी आता पुणे पोलिसांकडे
Pune Police : पुण्यातील रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी आता पुणे पोलिसांकडे देण्यात आलीये... आतापर्यंत महानगर पालिकेकडे ही जबाबदारी होती.. त्यामुळे सिग्नल यंत्रणा बंद पडल्यानंतर पोलिसांना मनपाकडे चकरा माराव्या लागत होत्य.. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिग्नल यंत्रणेची जबाबदारी पोलिसांकडे सोपवलीये.. यामुळा आता सिग्नल दुरुस्तीसाठी येणारा सर्व निधी पुणे पोलिसांना मिळणार आहे..शहरातील जवळपास 50% सिग्नल सध्या बंद आहेत.. आता हे सगळे सिग्नल सुरु करण्याची जबाबदारी पुणे पोलिसांवर असणार आहे.
'इस्लामपूर-वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार',खासदार विशाल पाटलांचा जयंत पाटलांना इशारा
Vishal Patil on Jayant Patil : इस्लामपूर-वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार, असा इशारा खासदार विशाल पाटलांनी जयंत पाटलांना दिलंय.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या मतदारसंघातल्या कसबे डिग्रज येथे आयोजित सत्कार समारंभात विशाल पाटलांसह आमदार विश्वजीत कदम उपस्थित होते. यावेळी विश्वजित कदमांनी इस्मालपूर-वाळवा मतदारसंघात 10 पटीने लक्ष देणार असं म्हणत जयंत पाटलांना अप्रत्यक्ष आव्हान दिलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
कोकणात महायुतीत अंतर्गत संघर्ष
Ratnagiri Banner War : सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीतही बॅनर वॉर पाहायला मिळालाय...मंत्री उदय सामंतांच्या पाली गावात भाजपचे बॅनर लागलेयत...या बॅनरवर बाप बाप होता है.. झुंड मे तो कुत्ते आते है, शेर अकेला आता है अशा आशयाचा मेसेज लिहिण्यात आलाय...कालच सिंधुदुर्गात उदय सामंतांचा फोटो असलेल्या बॅनरवर वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशय लिहिण्यात आला होता...त्यामुळे आता रत्नागिरीतही बॅनर लागले असून...कोकणात महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचं स्पष्ट दिसतंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
'केंद्र सरकार केव्हाही पडू शकते', अमोल कोल्हेंचं सूचक विधान
Amol Kolhe : शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारबाबत सूचक वक्तव्य केलंय...वस्ताद एक डाव राखून ठेवत असतो...केंद्रातील सत्ता गेली असली तरी ती आता पुरतीच गेलीय असं म्हणा...केंद्र सरकार केव्हाही पडू शकतं...असं सूचक विधान अमोल कोल्हेंनी केलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
मुंबईत पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, विक्रोळीत कंत्राटदाराला 25 हजारांचा दंड
Mumbai Rain : मुंबईत पहिल्याच पावसात 30 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्यात.. गेल्या आठवड्यात रविवारी संध्याकाळनंतर मुंबईत पडलेल्या पावसामुळे तब्बल ३० हून अधिक ठिकाणी पाणी साचल्याचं आढळू आलं..यापैकी नवीन ठिकाणे किती, जुनी किती याचा अभ्यास पालिका प्रशासनाने सुरू केलाय... दरम्यान, रविवारच्या पावसात विक्रोळीतील छोटे नाले साफ न केल्यामुळे पाणी तुंबल्याचे आढळून आल्याने संबंधित कंत्राटदाराला 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला... दरम्यान ज्या ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी येतील त्या ठिकाणापासून 50 मीटर परिसरातील नाले तपासणी करुन तातडीनं उपाय योजना करण्याचे निर्देश मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिलेत.