Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Tue, 22 Oct 2024-8:11 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 22 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • शिवसेनेकडून 48 मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक

     

    Maharashtra Assembly Election 2024 :  शिवसेना शिंदेंकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 48 मतदार संघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलीये..या 48 मतदार संघातील निरीक्षकांवर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे काम आणि समन्वयकांची जबाबदारी देण्यात आली आहे.
    तसेच निरीक्षकांवर मतदार संघातील प्रत्येक बुथ आणि उमेदवारांना निवडून आणण्याची विशेष जबाबदारी देण्यात येणार आहे.

  • महायुतीत शिवसेनेचं घोडं 25 जागांवर अडलं?

     

    Maharashtra Assembly Election 2024 :  महायुतीत शिवसेनेचं घोडं 25 जागांवर अडल्याची सूत्रांची माहिती... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात चर्चा झाली.. भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 60 नावांची यादी बैठकीत मांडल्याची सूत्रांची माहिती.. विद्यमान आमदारांना तिकीट देण्यावर सकारात्मक चर्चा.. उर्वरित 25 जागांचा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडण्यात आल्याचं समजतंय.. स्थानिक पातळीवर पक्षीय बलाबल, जातीय राजकारण या जागांवर तिन्ही पक्षातील प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळतेय.

  • राष्ट्रवादी SP पक्षाकडून जितेंद्र आव्हाडांना  AB फॉर्म

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तिढा नसलेल्या जागांवर AB फॉर्म द्यायला सुरुवात.. जितेंद्र आव्हाडांना राष्ट्रवादी(SP) एबी फॉर्म वाटप.. कळवा-मुंब्रा मतदारसंघातून आव्हाडांना उमेदवारी.. आव्हाड 24 तारखेला अर्ज दाखल करणार.. शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • शिवसेना UBT पक्षाकडून राजन साळवी, वैभव नाईकांना AB फॉर्म

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Assembly Election 2024 : आजपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एबी फॉर्म देण्यासाठी सुरुवात झाली असून ज्या जागावर तिढा नाही त्या मतदार संघातील उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.. राजापूर लांजा मतदारसंघांचे विद्यमान आमदार राजन साळवी यांनी आज मातोश्रीमधून स्वीकारला एबी फॉर्म.. राजन साळवी 24 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर कुडाळचे आमदार वैभव नाईक मतदारसंघात असल्याने त्यांच्या प्रतिनिधीने घेतला एबी फॉर्म.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • संदीप नाईकांच्या हाती तुतारी

     

    Sandip Naik : संदीप नाईकांनी हाती तुतारी घेतलीये...25 नगरसेवकांसह त्यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश केलाय...जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय...नवी मुंबईतील मेळाव्यात त्यांनी पक्ष प्रवेश केलाय...
     

  • लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा निवडणुकीची ऑफर

     

    Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा निवडणुकीची ऑफर...उत्तर भारतीय विकास सेना या पक्षानं दिली ऑफर...लॉरेन्स बिश्नोईत भगतसिंग दिसत असल्याचा उल्लेख... बाबा सिद्दीकींच्या हत्येत लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग...सुनील शुक्लांची लॉरेन्स बिश्नोईला ऑफर

  • निलेश राणे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार

     

    Nilesh Rane : माजी खासदार नीलेश राणे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत... मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थित निलेश राणे यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहितीय.. मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातील सहकारी ही पक्ष प्रवेशासाठी येणार असल्याचं नीलेश राणे यांनी यावेळी म्हटलंय..

  • संदीप नाईक तुतारी हाती घेणार?

     

    Sandip Naik : नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलच तापलंय. संदीप नाईक बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. वाशीमध्ये त्यांनी बैठक घेऊन निर्णय जाहीर केलाय. ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याची शक्यता आहे.  नवी मुंबई शहरावर अन्याय होत असेल तर मला निर्णय घ्यावा लागेल....नवी मुंबईच्या विकासासाठी मी माझा वैयक्तिक निर्णय घेणार आहे....कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला निर्धार मेळावा आहे. कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल.

  • ...डोंगर, दऱ्या बघण्यासाठी कायमचं घरी पाठवणार- रोहित पवार

     

    Rohit Pawar : पुणे कार कॅशप्रकरणी रोहित पवारांचं ट्विट केलंय. रोहित पवारांनी आपल्या ट्विटर अकांऊटवर पैशांचा व्हिडिओ पोस्ट करून शहाजी बापूंवर निशाणा साधलाय. महाराष्ट्राशी गद्दारी करणा-या खोकेबाजांना इथली जनता ओके करून डोंगर, द-या बघण्यासाठी कायमचं घरी पाठवणार, अशी टीका रोहित पवारांनी केलीय. तसंच एक गाडी सापडली मात्र अजून चार गाड्या कुठे आहेत?, असा सवालही केलाय.

  • झाडी-डोंगरातून 10 कोटीची रक्कम सुखरूप सांगोल्यात पोहोचली- संजय राऊत

     

    Sanjay Raut on Shahajibapu Patil : झाडी-डोंगरातून 10 कोटीची रक्कम सुखरूप सांगोल्यात पोहोचली, असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. 15 कोटींची रक्कम सांगल्याकडं जात होती. पण कार्यकर्त्यांनी ती रक्कम पकडली. मात्र पोलिसांनी केवळ 5 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली. पैसे सोडवण्यासाठी पोलिसांना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून फोन आला होता. फोन आल्यानंतर पैसे सोडून देण्यात आले, असा गंभीर आरोप राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता केलाय.

  • 1 नोव्हेंबरला राज्यातील रेशन दुकानदार संपावर जाणार  

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ration Shopkeepers Strike : राज्यातील संपूर्ण रेशन दुकानदार येत्या १ नोव्हेंबरपासून संपावर जाणारेत. वितरण दर वाढवून देण्याच्या मागणीसाठी रेशन दुकानदारांनी संप पुकारलाय. राज्य सरकारकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप स्वस्त धान्य दुकानदार संघटनेनं केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 26 ऑक्टोबरला युगेंद्र पवार अर्ज भरणार?

     

    Yugendra Pawar : युगेंद्र पवार बारामतीतून लढणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळतेय. युगेंद्र पवार हे 26 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचीही माहिती मिळतेय. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अजित पवारच लढणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातंय. तर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पावरांचं नाव समोर येत आहे. त्यामुळे बारामतीतून अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जातेय.

  • आमदार​ राजहंस सिंहांचं राजकीय पुनर्वसन?

     

    Rajhans Singh : भाजप आमदार राजहंस सिंह शिवसेनेकडून दिंडोशीतून तर राहुल कनाल कलिनातून निवडणूक लढणार असल्याची शक्यता सूत्रानं दिलीय...शिवसेनेचे सोशल मीडिया राज्य प्रमुख राहुल कनाल कालिना विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार संजय पोतनीसांना विरोधात लढण्याची शक्यताये. राहुल कनाल श्रीकांत शिंदेंचे जवळचे मानले जातात.

  • बारामतीच्या उमेदवाराची आज शरद पवार घोषणा करणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Baramati Assembly Elections 2024 : बारामतीच्या उमेदवाराची आज शरद पवार घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारी कुणाला मिळणार याकडं सर्व राज्याचं लक्ष लागून आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अजित पवारच लढणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातंय. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पावरांच्या नावाची चर्चा सुरूये. त्यांनी जनसंपर्कावर भर दिलाय. त्यामुळे बारामतीतून अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जातेय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • अमरावतीत रवी राणा आज उमेदवारी अर्ज भरणार

     

    Ravi Rana : अमरावतीतील बडनेरा मतदार संघातून युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा हे निवडणूक रिंगणात उतरणार आहे.... रवी राणा हे पुन्हा चौथ्यांदा युवा स्वाभिमान संघटनेकडून रिंगणात उतरणारेय... आज युवा स्वाभिमान पक्षाकडून ते उमेदवारी अर्ज भरणार आहे. ... महायुतीचा मला पाठिंबा आहे, असा दावा यावेळी रवी राणा यांनी केलाय.

  • शिवसेना UBTकडून 53 जणांची नावं निश्चित?

     

    Shivsena UBT : शिवसेना UBT पक्षाकडून 53 उमेदवारांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची सूत्रांची माहिती...तिढा नसलेल्या जागांवर संबंधित उमेदवाराला तयारीचे आदेश- सूत्र... शिवसेना UBTपक्ष 96-98 जागा लढण्याची सूत्रांची माहिती... एकापेक्षा जास्त इच्छुक असणा-या मतदारसंघात उमेदवारांचा सर्वे

  • विधानसभेसाठी आजपासून भरता येणार अर्ज

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhansabha Election 2024 : आजपासून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.. अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे.. २९ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. राज्यातील निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झालीय.. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून 6 दिवस मिळणार आहे.. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.. त्यामुळे नेते आणि अपक्षांची आजपासून अर्ज भरण्याची लगबग सुरू होणार आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • शेकापच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shekap : शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांची आज यादी जाहीर होणारेय. शेकापचे नेते जयंत पाटील अलिबागमधील शेतकरी भवनातून उमेदवारांची घोषणा करणारेत. रायगड जिल्ह्यातील 4 आणि सांगोल्यासह साधारण 8 जागांवर शेकाप लढण्याची शक्यताय. उद्धव ठाकरेंनी सांगोल्यातून दिपक साळुंखेंना उमेदवारी दिलीये. त्यामुळे जयंत पाटील नाराज असल्याचं समजतंय. त्यामुळे जयंत पाटील महाविकास आघाडीतून बाहेर पडतात की आणखी काही वेगळा निर्णय घेतात याकडे सर्वांच लक्ष आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • राज पुरोहित घेणार आज देवेंद्र फडणवीसांची भेट

     

    Raj Purohit will meet Devendra Fadnavis today : भाजपचे कुलाब्याचे आमदार राज पुरोहित आज फडणवीसांची भेट घेणार...आज सकाळी 11 वाजता भेटण्याची फडणवीसांकडून वेळ...सागर बंगल्यावर फडणवीस आणि पुरोहितांमध्ये होणार चर्चा... राज पुरोहित मविआच्या वाटेवर असल्याची चर्चा

     

  • मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mahavikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होणारेय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शरद पवार, उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बैठकीत सहभागी होणार नाहीत. त्यांच्या ऐवजी जागांच्या वाटाघाटीची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात आजच्या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरेंशी चर्चा करतील. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीनं थोरातांवर ही जबाबदारी सोपवलीये. दरम्यान आज महाविकास आघाडीची उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यताये.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link