Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Mon, 28 Oct 2024-10:36 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 28 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • शिवसेनेची तिसरी यादी जाहीर

     

    Shivsena : शिवसेनेची तिसरी यादी जाहीर...तिस-या यादीत १५ उमेदवारांची नावे जाहीर...मुंबादेवीतून शायना एन सी यांना उमेदवारी 

  • शिवसेनेनं अर्ज न दिल्यानं श्रीनिवास वनगा संतप्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shrinivas Vanga : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला नाही..पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप....वनगांना पालघरमधून उमेदवारी डावलल्यानंतर श्रीनिवास वनगा संतप्त असून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेत...तर उद्धव ठाकरे देवमाणून असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय...श्रीनिवास वनगांना उमेदवारी जाहीर न झाल्यानं ते डीप्रेशनमध्ये असल्याचं त्यांच्या पत्नी सुमन वनगा म्हणाल्या...शिवसेनेतून एकनाथ शिंदेंसोबत बाहेर पडलेल्या 40 आमदारांमध्ये श्रीनिवास वनगाही होते...39 आमदारांना उमेदवारी देण्यात आली मात्र वनगांना उमेदवारी न मिळाल्यानं ते संतप्त झालेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • समीर भुजबळांविरोधात पंकज भुजबळ प्रचार करणार 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sameer Bhujbal : भुजबळांच्या घरात भाऊंबदकी पहायला मिळतेय...समीर भुजबळांनी बंड करत नांदगावमधून अपक्ष लढण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांची अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी केली...त्यानंतर महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदेंना नांदगावमधून उमेदवारी देण्यात आली...तर येवल्यातून छगन भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालीये...दरम्यान आज महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी छगन भुजबळांचे पूत्र आणि आमदार पंकज भुजबळ हजर होते...यावेळी त्यांनी महायुतीच्या वरिष्ठांकडून नांदगावमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे आदेश असल्याचं सांगितलं...त्यामुळे आता भुजबळ कुटुंबात भाऊबंदकी पहायला मिळण्याची शक्यता आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • अमित ठाकरेंना विधानपरिषदेवर मंत्री करणार-सूत्र

    Amit Thackeray : लोकसभेतील मनसेच्या (MNS) बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्यात महायुतीला अडचणी येत असल्याची शक्यता आहे...दादर माहिममधून सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत...त्यामुळे महायुतीच्या बिनशर्त पाठिंब्याच्या परत फेडीत अडचणी येताय...अमित ठाकरेंनी आज दादर माहिममधून उमेदवारी अर्ज दाखल केला...तर सदा सरवणकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणारेत...मात्र, अमित ठाकरेंनी विधान परिषदेवर घेऊन मंत्रीपद देण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतंय....शिवसेनेकडून चाचपणी सुरू असून भाजपला त्यासंदर्भात प्रस्तावही पाठवला जावू शकतो अशी माहिती सूत्रांकडून समजतेय...

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

     

     

  • मनसेचा शिवसेनेला 10 जागांचा प्रस्ताव-सूत्र

     

    MNS : मनसेनं शिवसेनेकडे 10 जागांचा प्रस्ताव ठेवला असल्याचं समजतंय. मुंबईतील 10 जागांबाबतचा प्रस्ताव मनसेनं शिवसेनेला दिल्याची सूत्रांची माहिती आहे. वरळी, शिवडी, माहीम, अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशी
    भांडुप, विक्रोळी आणि कल्याण, या त्या मुंबईतील जागा आहेत. तर 10व्या जागेबाबत मात्र सस्पेन्स असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. 

  • राष्ट्रवादी (SP) पक्षाची चौथी यादी जाहीर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    NCP (SP) : राष्ट्रवादी (SP) पक्षाची चौथी यादी जाहीर..माण - प्रभारक घार्गे, काटोल-सलिल देशमुख, खानापूर-वैभव पाटील, वाई-अरुणादेवी पिसाळ, दौंड-रमेश थोरात, पुसद-शरद मेंद सिंदखेडा- संदीप बेडसेंना उमेदवारी जाहीर 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

     

  •  उद्या माहीममधून सदा सरवणकर उमेदवारी अर्ज भरणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sada Sarvankar : सदा सरवणकर दादर माहिममधून विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत...मनसे नेते आणि उमेदवार अमित ठाकरेंविरोधात ते निवडणूक लढवणार आहेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • भाजपची तिसरी यादी जाहीर

     

    BJP List : भाजपनं आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 25 जणांची नावं भाजपकडून जाहीर करण्यात आली आहेत. नागपूरच्या सावनेरमधून आशिष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. किशोर जोरगेवार यांना तिकीट मिळालंय. तसंच राजू तोडसाम, जितेश अंतापूरकर, भारती लव्हेकर, सुरेश धस, पराग शाह, अर्चना पाटील चाकुरकर, राम सातपुते, संग्राम देशमुख, यांच्यासह एकंदर 25 जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत भाजपकडून एकंदर 146 जणांची उमदेवारी घोषित करण्यात आली आहे. 

  • मविआत जागावाटपाचा गोंधळ कायम

     

    Maharashtra Election 2024 : उमेदवारी अर्ज भरायला केवळ दोन दिवस शिल्लक असताना मविआचे 20 मतदारसंघातील उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहेत. काही जागांवर मित्र पक्षांमध्ये तिढा आहे. काही जागांवर एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असल्यानं उमेदवार निश्चित होऊ शकले नाहीत. मविआतील जागावाटपाच्या गोंधळामुळे तिन्ही पक्षाचे नेते,कार्यकर्ते संभ्रमात आहेत. 

  • कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Election 2024 : कसब्यामध्ये याहीवेळी धंगेकर पॅटर्न चालणार, असा दावा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केलाय. धंगेकरांनी कसबा गणपतीची आरती करून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं. पोटनिवडणुकीत भाजपाच्या हेमंत रासनेंचा धंगेकरांनी पराभव करत, भाजपाचा बाल्लेकिल्ला उद्ध्वस्त केला होता. आता पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने लढत होणार आहे. 

     

  • नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम

     

    Nawab Malik : उद्या तुम्हाला कळेल की मी पक्षाकडून लढणार आहे की अपक्ष, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिलीय. नवाब मलिक उद्या मानखुर्दमधून उमेदवारी अर्ज दाखल करणारेत. मात्र ते अपक्ष लढणार की अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. एकीकडे भाजपमधून त्यांच्या उमेदवारीला विरोध होताना दिसतोय. त्यावर निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं मलिकांनी सांगितलंय. तसंच मी अजित पवारांसोबत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

  • बारामती मतदारसंघातून अजित पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल

     

    Maharashtra Election 2024 : अजित पवारांनी बारामती मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरलाय. अर्ज भरण्यापूर्वी अजित पवारांनी बारामतीत मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शनही केलं. अजित पवार उमेदवारी अर्ज भरताना त्यांचे चिरंजीव पार्थ पवारही उपस्थित होते.

  • बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल

     

    Maharashtra Election 2024 : युगेंद्र पवारांनी बारामतीतून उमेदवारी अर्ज भरलाय. अर्ज भरण्यापूर्वी कुटुंबियांकडून युगेंद्र पवारांचं औक्षणही करण्यात आलं. कण्हेरी मारुतीचं दर्शन घेऊन बारामती प्रशासकीय भवनाकडं रवान झाले. शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थितीत युगेंद्र पवारांनी अर्ज दाखल केला. सुशिक्षित आणि जाणकार तरुणाला पक्षान संधी दिलीय अशी प्रतिक्रिया शरद पवारंनी दिली.

  • कोपरी पाचपाखाडीत शिंदे विरुद्ध दिघे लढत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Election 2024 : राज्याचं लक्ष लागून असलेल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर त्यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केदार दिघेंना उमेदवारी दिलीय. केदार दिघेही आजच अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात एकनाथ शिंदे विरुद्ध आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे असा सामना रंगणारेय. अर्ज दाखल करण्याआधी दोन्ही नेत्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणाची वर्णी लागतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आज अनेक दिग्गज नेते भरणार उमेदवारी अर्ज

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोपरी पाचपाखाडी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर मनसेकडून अमित ठाकरे दादर-माहिमसाठी  उमेदवारी अर्ज दाखल करणार.राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अमित ठाकरे अर्ज भरणार आहे.. तर विरोधी पक्षनेते  विजय वडेट्टीवारही उमेदवारी अर्ज दाखल करणार  आहेत...  तर सदा सरवणकरही उमेदवारी अर्ज भरणार आहे...

    बातमी पाहा - Maharashtra Breaking News LIVE UPDATES : एकनाथ शिंदे यांच्या बंडातील एकमेव सीटिंग आमदाराचा पत्ता कट ?

  • बारामतीतून युगेंद्र पवार भरणार उमेदवारी अर्ज

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Baramati Yugendra Pawar : युगेंद्र पवार काही वेळात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना होत आहेत. त्यांच्या निवास्थानी कुटुंबीयांकडून संपूर्ण तयारी केलीय. कुटुंबियांकडून युगेंद्र पवारांचं औक्षणही केलं. औक्षण करून कण्हेरी मारुतीचे दर्शन घेऊन युगेंद्र पवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बारामती प्रशासकीय भवन इथं जाणार आहेत. अर्ज भरण्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थितीत असणार आहेत.

     

  • मविआत जागावाटपांचा घोळ कायम?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Election : मविआत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, शिवेसना ठाकरे यांना प्रत्येकी ९० जागांचा फॉर्म्युला ठरला होता. असं असताना काँग्रेसनं आतापर्यंत ९९ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे जाहीर फॉर्म्युल्याचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसनं आतापर्यंत चार उमेदवार याद्या जाहीर केल्यात त्यात 99 उमेदवार घोषित केलेत.. त्यामुळे मविआतील 90च्या फॉर्म्युल्याचं काय झालं असा सवाल उपस्थित होतोय. तर मविआतील तिन्ही पक्षांकडून उमेदवार काही मतदारसंघातून उमेदवार देण्यात आलेत... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुण्यात अमोल बालवडकर निवडणूक लढवण्यावर ठाम

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Election 2024 : पुण्यातील भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी घरी जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतरही अमोल बालवडकर कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा विद्यमान आमदार आणि मत्री चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिलीय. चंद्रकांत पाटलांनी उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला. असं असताना अमोल बालवडकर देखील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळतेय. बालवडकरांच्या बंडखोरीमुळे भाजपसह चंद्रकांत पाटलांची डोकेदुखी वाढणारेय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • चार्टर विमान,हेलिकॉप्टर घिरट्या वाढणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Election 2024 : विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याने नेत्यांचे दौरेही वाढलेत. या दौऱ्यांसाठी नेत्यांनी हेलिकॉप्टर आणि चार्टर विमानं बूक केलीयेत. त्यामुळे आचारसंहितेपर्यंत 40 हेलिकॉप्टर आणि विमानं चार ते साडेचार हजार वेळा उड्डाणं करणार आहेत. यामधून जवळपास 400 कोटींची उलाढाल होणार आहे.या चार्टर विमान आणि हेलिकॉप्टरचं भाडं अडीच लाख ते सहा लाखांपर्यंत आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विकासकामांच्या जोरावर विजयी होणार - भावना गवळी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Election 2024 : वाशिम जिल्ह्यातील रिसोडमधून भावना गवळींना उमेदवारी देण्यात आलीय.. शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलीय... मतदारसंघात केलेल्या विकासकामाच्या जोरावर आपणच जिंकू असा विश्वास भावना गवळी यांनी व्यक्त केलाय.. रिसोडच्या जागेवरून महायुतीत पेच निर्माण झाला होता.. अखेर शिंदेंच्या शिवसेनेकडे रिसोडची जागा आलीय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यात काका-पुतण्याचा नवा वाद?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Election 2024 : राज्याच्या राजकारणात काका पुतण्याचा नवा वाद पाहायला मिळण्याची शक्यताये. बीड जिल्ह्यात सोळंके कुटुंबात फूट पडण्याची शक्यताये. माजलगाव मतदारसंघात तिकिटावरून प्रकाश सोळंके विरुद्ध जयसिंह सोळंके यांच्यात वाद सुरू असल्याचीमाहिती सूत्राकडून मिळतेय. प्रकाश सोळंकेंना उमेदवारी देण्यात आली. यामुळे त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रानं दिलीय. जयसिंह सोळंके यांचे समर्थक आज अजित पवारांची भेट घेणार असल्याचीही माहिती मिळतेय. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यावर यावर जयसिंह सोळंके समर्थक ठाम असल्याचं कळतंय.

     

  • साताऱ्यात 4.90 कोटींचं सोनं पकडलं

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Satara Gold : पुणे- बेंगलोर महामार्गावर 4 कोटी 90 लाख रुपयांचं सोनं तसेच 57 लाख रुपयांची चांदी सापडलीय. तासवडे टोल नाक्यावर हे सोने, चांदी आढळून आलीय. महाराष्ट्रातील एका बड्या सोन्याच्या व्यापाऱ्याचं हे सोनं असल्याची माहिती मिळतेय.तळबीडचे पोलीस अधिकारी, आरटीओ, आयकर विभागाचे अधिकारी आणि कराडचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झालेत. सोन्याची तस्करी केली जात होती का? याची चौकशी पोलीस करीत आहेत

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link