Lab Report on Tirupati Laddu : तिरुपतीच्या लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी- लॅब अहवालात पुष्टी

Thu, 19 Sep 2024-11:56 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 19 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • तिरुपतीच्या लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्याची लॅब अहवालात पुष्टी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Lab Report on Tirupati Laddu : तिरुपतीच्या लाडवांमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरल्याचा खळबळजनक आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलाय आणि एका खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातही तिरुपतीच्या लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्याची पुष्टी करण्यात आली आहे. NDDB CALF लॅबच्या अहवालात तिरुपती लाडूंसाठी वापरण्यात आलेल्या तुपामध्ये परदेशी चरबी वापरल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे तिरुपतीला जाऊन लाडवांचा प्रसाद घेणा-या भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भाविकांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • तिरुपती लाडवांमध्ये तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात होती- चंद्राबाबू नायडू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chandrababu Naidu on Tirupati Laddu : तिरुपतीच्या लाडू प्रसादामध्ये तुपाऐवजी चरबीचा वापर केला जात असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय.. हा आरोप दुस-या तिस-या कुणीही केलेला नाही तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलाय... जगन मोहन सरकारवर नायडूंनी हे भयंकर आरोप केले आहेत.. तिरुमलाच्या पवित्र लाडू प्रसादामध्ये तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात होता असा धक्कादायक आरोप करुन नायडूंनी खळबळ उडवून दिली आहे... जगन मोहन सरकारवर तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप नायडूंनी केलाय...मात्र, आता आपलं सरकार तिरुपतीच्या लाडूमध्ये शुद्ध तूप वापरत आहे असा दावाही करायला नायडू विसरले नाहीत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • शिवराय पुतळाप्रकरणातील बांधकाम सल्लागार चेतन पाटीलचा जामीन फेटाळला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chetan Patil's bail Rejected : शिवराय पुतळा प्रकरणातील बांधकाम सल्लागार चेतन पाटीलचा तुरुंगातील मुक्काम वाढलाय... ओरोस येथील जिल्हा सत्र न्यायालयानं चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळलाय..सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी चेतन पाटीलच्या जामिनाला विरोध केला.. तांत्रिक बाबींचा तपास आणि एक्स्पर्ट ओपिनीयन रिपोर्ट यायचा असल्यानं चेतन पाटीलच्या जामिनास विरोध करण्यात आलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • काँग्रेस, भाजपनंही स्वामीनाथन आयोग लागू केला नाही- बच्चू कडू यांचा आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bacchu Kadu on Mahayuti : माजी मंत्री बच्चू कडूंची महायुतीला सोडचिठ्ठी… 'झी २४ तास'च्या रोखठोक कार्यक्रमात बच्चू कडू यांची घोषणा... बच्चू कडू परिवर्तन महाशक्तीसोबत.. परिवर्तन महाशक्तीच्या बॅनरखाली निवडणूका लढवणार असल्याची प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंची माहिती.. काँग्रेस आणि भाजपनंही स्वामीनाथन आयोग लागू केला नाही- बच्चू कडू यांचा आरोप.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • नार्वेकरांच्या घराबाहेर काँग्रेसचं आंदोलन, कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Congress Agitation : अनिल बोंडेंनी राहुल गांधींविरोधात केलेल्या टीकेनंतर राज्यभर काँग्रेस आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय...काँग्रेसनं आज राज्यभर आंदोलनाची हाक दिलीये...विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी जमले होते...त्यावेळी नार्वेकरांचेही कार्यकर्ते तेथे उपस्थित होते...यावेळी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली...पोलीस व्हॅन नसल्यानं पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांना बेस्ट बसमधून घेऊन गेले.. वर्षा गायकवाड यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर भाईंदरमध्येही नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसनं आंदोलन केलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत मनसे तटस्थ?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तटस्थ भूमिका घेणारे...सूत्रांकडून याबाबत माहिती मिळतेय...22 सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे पक्ष युवा सेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशी लढत रंगणारे...महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याही संघटनेला, पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचं अमित ठाकरेंनी पदाधिका-यांना स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय...निवडणूक लढत असलेले काही पदाधिकारी मनसेकडून पाठिंबा मिळाला असल्याचं सांगत असतील तर ते चुकीचं असल्याचंही मनसेकडून सांगण्यात येतयं...या निवडणुकीत मनसे पदाधिकारी कोणत्याही उमेदवाराचं काम करताना दिसला किंवा कुठल्या प्रकारची मदत करताना आढळल्यास त्यावर पक्ष कारवाई करेल असा इशाराही मनसेकडून देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शरद पवारांचा छगन भुजबळांना धक्का

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Changan Bhujbal : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्री छगन भुजबळांना मोठा धक्का बसलाय.. भुजबळांचे निकटवर्तीय ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे शरद पवारांच्य पक्षात प्रवेश करणार आहेत... त्यांच्यासह चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात पक्ष प्रवेश होणार आहे... ओबीसींना न्याय मिळत नसल्यानं परत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचं बाळबुद्धेंनी म्हटलंय.. उद्या सकाळी मुंबईतील पक्ष कार्यालयात शरद पवार, जयंत पाटील आणि अनिल देशमुखांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आदित्य ठाकरे राहुल गांधींसारखे प्रोडक्ट - अनिल बोंडे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Anil Bonde VS Arvind Sawant : आदित्य ठाकरे राहुल गांधींसारखे प्रोडक्ट असल्याची टीका भाजप खासदार  बोंडे यांनी केलीये.. त्यांच्या या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी उत्तर दिलंय.. अनिल बोंडे विषारी खतांवर रुजलेलं बोंड असल्याचा टोला अरविंद सावंतांनी लगावलाय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • वन नेशन, वन इलेक्शन लोकशाहीला पोषक नाही - उल्हास बापट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ulhas Bapat On One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शन हे भारताच्या लोकशाहीला पोषक नाही, अशी प्रतिक्रिया राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी दिलीये. तुम्हाला 4 राज्याच्या निवडणुकाच एकावेळी घेता येत नाहीत तर 28 राज्यांच्या निवडणुका एकत्र कशा घेणार, असा सवाल त्यांनी केलाय. तर हा निर्णय सुप्रीम कोर्ट घटनाबाह्य ठरवू शकतात, असं त्यांनी म्हटलंय

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • ज्योती मेटे तिसऱ्या आघाडीत सामील होणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jyoti Mete : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ज्योती मेटे सुद्धा तिसऱ्या आघाडीत सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संभाजीराजे छत्रपतींनी ज्योती मेटेंना फोन केला आणि आमच्या तिसऱ्या आघाडीत येण्याबाबत विचार करावा, अशी विनंती त्यांना केली. मेटे साहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी ही उत्तम आणि योग्य संधी असल्याचंही संभाजीराजेंनी यावेळी ज्योती मेटेंना सांगितलं. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्या तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याबद्दल ज्योती मेटे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना टोला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    CM Ekanath Shinde On Sanjay Raut : सकाळचं प्रदूषण कमी झालं पाहिजे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना लगावलाय.. गणपती विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीवर स्वच्छता ही सेवा उपक्रम रावबण्यात आला.. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राऊतांवरही टीका केली.. स्वभाव आणि संस्काराच्या स्वच्छतेवरही विशेष लक्ष दयायला हवं असा टोला शिंदेंनी राऊतांचं नाव न घेता लगावलाय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुणे विसर्जन मिरवणुकीत 3 जणांचा मृत्यू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीदरम्यान तिघांचा अकस्मित मृत्यू झालाय.. हा मृत्यू कशामुळे झालाय याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये.. या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण कळणार आहे.. दरम्यान कालच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेच्या आवाजामुळे 582जणांना त्रास झाला.. त्यांच्यावरही तातडीनं उपचार करण्यात आलेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • भरत गोगावलेंची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती?

     

    Bharat Gogavale : भरत गोगावलेंची ST महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड कऱण्यात आल्याची माहिती सूत्रांनी झी 24 तासला दिलीय.. एकनाथ शिंदेंकडून त्यांच्या नेत्यांची महामंडळावर नियुक्ती केली जातेय.. एसटी महामंडळावरील पदाला कॅबिनेटचा दर्जाचे आहे. शिंदे गटातील तीन आमदारांची काही दिवसांपूर्वीच महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यामध्ये आनंदराव अडसूळ, हेमंत पाटील आणि संजय शिरसाटांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे शिंदेंच्या नेत्यांची महामंडळावर नियुक्ती होत असतांना दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी असल्याची माहिती आहे.. 

  • वन नेशन, वन इलेक्शन लोकशाहीविरोधी - संजय राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut On One Nation One Election : 'वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाहीविरोधी' असल्याचं म्हणत संजय राऊतांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. मोदी पुढची निवडणूक हरणार असल्याच्या भीतीमुळे स्वार्थासाठी निर्णय घेतल्याचा राऊतांनी आरोप केलाय इतकंच नाहीतर आगामीकाळात 'नो नेशन...नो इलेक्शन'पण होईल असाही टोला राऊतांनी लगावलाय

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकी

     

    Salman Khan : अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकी देण्यात आलीय. 'लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या, असं म्हणत अज्ञात महिलेकडून धमकी देण्यात आलीये. मुंबईतल्या बँड स्टँड परिसरात सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी गेले असता एका स्कुटीवर पुरुष आणि बुर्खादारी महिला त्यांच्या जवळ येऊन त्यांना ही धमकी दिली. याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायेत. 

  • वक्फ विधेयकावरील समिती 5 राज्यांचा दौरा करणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Waqf Board : वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती 5 राज्यांचा दौरा करणार आहे.. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांना ही समिती भेट देणार आहे.. 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान समिती हा दौरा करणार आहे.. दौ-या दरम्यान पाच राज्यांतील अल्पसंख्याक विभागांच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहे..  मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू मध्ये या समितीच्या बैठका होतील.. या दौ-यात वक्फ मालमत्तांची माहिती गोळा करुन वक्फ विधेयकाबाबत चर्चा करणार आहेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मविआ राज्यात 'वर्धा पॅटर्न' राबवणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vardha Pattern : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी अनेक ठिकाणी वर्धा पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे...तीन पक्ष एकत्रित असताना मतदारसंघांची देवाण-घेवाण होईलच सोबतच उमेदवारांचा मेरिट ही महत्त्वाचा ठरेल असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस शेखर सावरबांधे म्हणालेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या वर्धा दौरा

     

    Prime Minister Narendra Modi In Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्तानं मोदींचा वर्ध्यात कार्यक्रम होणारेय. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते चकाचक करण्याचं काम सुरूये. तसंच रस्त्यांवरील खड्डेही बुजवण्यात येतायेत. 

  • अजित पवारांचे फेसबुक अकाऊंट हॅक?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar : अजित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती आहे.. अजित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्यानंतर काही लोकांनी त्यांना फॉलो केलंय अजित पवारांच्या फेसबुक अकाऊंटहून आक्षेपार्ह पेज असलेल्या एका पेजला फॉलो करण्यात आलं.. त्यानंतर काही लोकांनी पेजला फॉलो केलंय... त्यामुळे अजित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा आहे.. अजित पवारांची प्रतिमा मलीन करण्यासाठी काही लोकांचा प्रयत्न असल्याचं अजित पवारांच्या पक्षाकडून सांगण्यता आलंय.. त्याची सायबर पोलिसात तक्रार दाखल कऱण्यात येणार आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संजय दिना पाटील अडचणीत येण्याची शक्यता

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Dina Patil : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे.. त्यांच्या खासदारकीला अपक्ष उमेदवार शहाजी थोरात यांच्याकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय.. निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्यानं संजय दिना पाटील यांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून करण्यात आलीये..दरम्यान याप्रकरणी मिहीर कोटेंचा यांच्यासह अन्य उमेदवारांना समन्स बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा डबा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Special Coach For Senior Citizen : लोकलमधून प्रवास करणा-या ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी...लवकरच लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र डबा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबई हायकोर्टात याबाबत माहिती दिलीये... पुढील दोन वर्षांत ज्येष्ठ नागरिकांना मुंबई लोकलमध्ये ही विशेष सेवा मिळणार आहे.. तोपर्यंत लोकलमधील एका मालडब्याचे रुपांतर ज्येष्ठ नागरिकांच्या स्वतंत्र डब्यामध्ये करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले... ज्येष्ठ नागरिकांना लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या त्रासावर उपाय म्हणून अपंग प्रवाशांप्रमाणे स्वतंत्र डबा उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी जनहीत याचिकेद्वारे करण्यात आली होती.. या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करून दिला जाईपर्यंत त्यांना मालडब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी असे आदेशही हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला दिले.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

     

    Sanjay Pandey Joins Congress : माजी पोलीस महासंचालक संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.. आज संध्याकाळी मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.. आझात मैदानातील मुंबई काँग्रेस कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.. संजय पांडे हे वर्सोवा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत.. ते 1986च्या IPS बॅचचे पोलीस अधिकारी असून निवृत्तीनतंर 2022मध्ये त्यांना NSEफोन टॅपिंग प्रकरणात अटकही झाली होती..  

  • लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाही - शरद पवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar : लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होणार नसल्याचं मोठं विधान शरद पवारांनी केलंय.. आगामी विधानसभेत मविआ जिंकणार असल्याचा विश्वासही शरद पवारांनी केलाय.. एका मुलाखतीत शरद पवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय... तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना त्यांच्या नेतृत्वावरही शरद पवारांनी शिक्कामोर्तब केलंय.. कोरोना काळात ठाकरेंनी चांगलं काम केल्याचं शरद पवार म्हणालेत तर सुप्रिया सुळे दिल्लीत खुश असल्याचं शरद पवार म्हणालेत.. त्यामुळे सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात येणार नसल्याचंही शरद पवारांनी अप्रत्यक्ष सांगितलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संजय पाटील यड्रावकर यांच्या पक्षाला मान्यता

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kolhapur : जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकरांच्या शाहू विकास आघाडी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्यता दिलीये.. संजय पाटील हे शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे भाऊ आहेत.. पक्षाला मान्यता मिळाल्यामुळे आता आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शाहू विकास आघाडीकडूनच निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • दिल्लीत नव्या मुख्यमंत्र्यांचा शनिवारी शपथविधी?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Delhi New Chief Minister : शनिवारी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. नायब राज्यपालांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्याकडे तसा प्रस्ताव पाठवल्याची माहिती मिळतेय. 2 दिवसांपूर्वी अतिशी यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. आतिशी यांच्यासोबत इतर कोणते मंत्री शपथ घेणार त्याची नावं मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • रामदास आठवलेंकडून 10-12 जागांची मागणी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Latur Ramdas Aathvale : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी 10 ते 12 जागांची मागणी केलीये.  देवेंद्र फडणवीस हे आमचा विचार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.. ते लातूर जिल्ह्यातील औसा शहरात तक्षशिला बौद्धविहार विकासकामांसाठी आले होते..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे दणदणाट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Sound Pollution : पुण्यात ध्वनीप्रदूषण रोखण्याच्या नियमांची पायमल्ली झाल्याचं पाहायला मिळालं...पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी आवाहन करूनही  डिजेचा दणदणाट पाहायला मिळाला. ध्वनिप्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडून यंदाच्या मिरवणुकीत लक्ष्मी रोड आणि दहा प्रमुख चौकांत सरासरी 90 डेसिबलपेक्षा जास्त नोंदवली गेली. सरासरी ध्वनीपातळी 94.8 डेसिबल असून, त्यातही बेलबाग चौक आणि होळकर चौकातील ध्वनीपातळी सर्वाधिक 118 डेसिबल इतक्या धोकादायक पातळीवर पोहचली होती.  

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.सगे सोयरे कायद्याच्या मागणीसाठी जरांगे यांनी अंतरवाली सराटीत सहाव्यांदा आमरण उपोषण सुरु केलंय. काल जरांगे यांच्या तपासणीसाठी 3 वेळा डॉक्टरांचं पथक आलं तीन वेळा त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. दोन दिवसांपासून जरांगे यांनी अन्न पाण्याचा त्याग केल्यामुळे त्याची शुगर लेव्हल 70 वर आली होती, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. आपल्या उपोषणावर जरांगे ठाम असून  मागण्या मान्य करा अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल जरांगेंचा पुन्हा इशारा... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यातील नव्या आघाडीसाठी आज बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune : महाराष्ट्रातील नव्या आघाडीसाठी आज प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. महाराष्ट्राला नवीन सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू, तसंच इतर घटक पक्षांची आज पुणे शहरात एकत्र बैठक होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुशे आणि इतर घटक पक्षाच्या नेत्यांची चौथी बैठक आज पुण्यात होईल. यात राज्यातील महत्त्वाचे प्रश्न, तसंच आगामी निवडणुकीतील अजेंडा, यावर सखोल विचारमंथन केलं जाईल. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link