Breaking News LIVE: शेतकऱ्यांना मिळणार आठ दिवसाच्या आत सरसकट पाहणी करून 25% अग्रीम
Maharashtra Breaking News LIVE : महाराष्ट्रातील घडामोडींचे अपडेट एका क्लिकवर.
Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.
Latest Updates
बीड:अतिवृष्टी मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या सरसकट पाहणी करून 25 टक्के अग्रीम देण्याचा निर्णय
पिकविम्यात काही गैरप्रकार झाला तर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश
कृषी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय
शेतकऱ्यांना मिळणार आठ दिवसाच्या आत सरसकट पाहणी करून 25% अग्रीम
महाविकास आघाडीची बैठक संपली, जागा वाटपावर अजूनही चर्चा सुरू
पुढील दोन दिवस जागा वाटपावर महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू राहतील
मुख्यत्वे करून मुंबईतला ३६ जागांचा जागावाटप जवळपास पूर्ण होत असून ज्या ६-७ जागांवर तिढा आहे अशा जागांवर लवकरच तोडगा काढला जाईल व उर्वरित महाराष्ट्रातल्या जागावाटप वर सुद्धा चर्चा महाविकास आघाडीचे नेत्यांकडून केली जातीये
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप करताना जिंकलेल्या जागा सोडून इतर जागांवर महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे आणि त्या ठिकाणी कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत त्यावर सुद्धा चर्चा केली जातीये
त्यामुळे मेरिटनुसार महाविकास आघाडीच्या जागावाटप केलं जात असल्याचं सांगण्यात आलंयत्यानुसारच महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्मुला समोर येईल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची खेळी...
विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्यांची महामंडळावर लावणार वर्णी
विधनपरिषदेसाठी अजित पवार गटात इच्छुकांची रांग लागली आहे, त्यामुळे पक्षात कोणीही नाराज होऊ नये म्हणून महामंडळावर वर्णी लावण्यात येणार आहे
पक्षात इच्छुकांशी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे चर्चा करत आहे..
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील नाराजी निवडणुकीत डोके दुखी ठरू शकते त्यामुळे ही रणनीती आखली जात आहे...
बांग्लादेशविरोधातील मालिकेला आदित्य ठाकरेंचा विरोध
बांग्लादेशसोबत क्रिकेट सिरिज सुरू होत आहे.याविषयी मी ट्विट केले सकाळी. मला परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती हवी की,हिंदूंवर बांग्लादेशात अत्याचार झाले की नाही. इथंही त्यामुळं दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला.
केंद्र भाजपचे,बीसीसीआय भाजपचे आता क्रिकेट सामने खेळवत आहे. निवडणूक आली की हे हिंदू मुस्लिम करतात.
जर बांग्लादेशात हिंदूवर अत्याचार होत असतील तर मग त्यांच्यासोबत क्रिकेट सामने का ?
केंद्र सरकारने याविषयी भूमिका स्पष्ट करावी
23 सप्टेंबर 2024 ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक, बैठकीत राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा नवीन वेळापत्रकावर चर्चा केली जाणार
बैठकीतील निर्णयानंतर नवीन वेळापत्रक केले जाणार जाहीर
22 ऑगस्ट ला झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या, मात्र तारीख जाहीर करण्यात आलेली नव्हती
परीक्षेची सुधारित तारीख लवकरात लवकर जाहीर करावी यासाठी दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं होत पत्र..
ऑगस्ट २०२४ मध्ये नियोजित असलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या दिवशी IBPS परीक्षा येत असल्याने राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलावी, या प्रमुख मागणीसाठी पुणे येथे MPSC च्या विद्यार्थांनी ठिय्या आंदोलन केले होत..
अनिल बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्याविरोधात अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
365,192 अंतर्गत गुन्हा दाखल
भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखेडे यांनी केली होती गुन्हा दाखल करण्याची मागणी
अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
यशोमती ठाकूर व बळवंत वानखडे यांचा अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात आयुक्तांच्या दालनात केलं होतं आंदोलन
27 तास उलटूनही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अद्याप सुरू
अजूनही पुण्यातील लक्ष्मी रोड,केळकर रोड,टिळक रोडवर मंडळांची मिरवणूका सुरूच आहेत. कुमठेकर रोडवरील मिरवणुका संपल्या नसून अजून 2 ते 3 तास लागण्याची शक्यता
नाशिक शहरात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
नाशिक शहरात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आई वडिलांसह मुलीचा मृतदेह आढळून आल्यानं नाशिक शहर हादरलं आहे. मूळचे गौळणे गावचे मात्र पाथर्डी फाटा परिसरात हे सहाणे कुटुंब राहत होतं. विजय माणिक सहाने, ज्ञानेश्वरी विजय सहाने , अनन्य विजय सहाने अशी तिघांची नावं आहे.. मात्र मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. इंदिरानगर पोलिसांकडून तपास सुरु आहे.
विसर्जन करताना दोन मुलांचा मृत्यू, नाशिकच्या विसर्जन महोत्सवाला गालबोट
नाशिकच्या गणेशोत्सवाला गालबोट, विसर्जनानंतर दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वालदेवी नदी पात्रात दोघांचा गणेश विसर्जन करताना मृत्यू झाला आहे. म्हाडा कॉलनीमधील ओंकार गाडे आणि स्वयम मोरे या दोघा युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. नदीपात्रात असलेल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यात हे दोघे पडले आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.
नागपूर-अमरावती मार्गांवरून प्रवास कणा-यांसाठी खूशखबर
नागपूरकरांना एक नवा उड्डाणपूल मिळणार आहे. नागपूरहून अमरावतीला जाताना वाडीत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही आहे. कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विक्रमी वेळेत नागपूर जवळच्या वाडीमध्ये जवळपास अडीच किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला आहे. हा उड्डाणपूल टेस्टिंगच्या उद्दिष्टाने वाहन चालकांसाठी सुरू करण्यात आला आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीलं आहे. यावेळी त्यांनी मोदींना त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या मात्र या पत्रात त्यांनी राहुल गांधींविरोधात द्वेषपूर्ण भाषणावर चिंताही व्यक्त केली आहे.
वादग्रस्त विधान भोवणार, संजय गायकवाड यांच्या विरोधात दिल्लीत तक्रार
आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेसनं दिल्लीतील तुघलक रोड पोलिसात तक्रार दिली आहे. केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू तरविंदर मारवाह यांच्यासह संजय गायकवाडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
लालबागच्या राजाचे पार पडले विसर्जन
तब्बल 24 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन झालं आहे. गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे विसर्जन
पूर्व नागपूर मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
भाजपसाठी सुरक्षित मानल्या जाणा-या पूर्व नागपुर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आभा पांडे यांनी दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारालाही त्यांनी सुरुवात केली आहे. आता अजित पवारांनी सांगीतलं तरी माघार घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधींची जीभ छाटू नये, त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे; शिंदेंच्या आमदारानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांचे वादग्रस्त वक्तव्य
बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाखाचे बक्षीस देणार असं वादग्रस्त विधान ताज असतानाच आता भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी देखील राहुल गांधी यांच्या यासंदर्भात एक वादग्रस्त केलं आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाहीये. परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे. विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची ''''जीभ छाटू नये जिभेला चटके मात्र दिले पाहिजे'''' अशा लोकांना जिभेला चटके देणे आवश्यक आहे. अशी टिका अनिल बोंडे यांनी केली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राहुल गांधी, ज्ञानेश महाराव असो अथवा श्याम मानव असोत असे म्हणत भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी ज्ञानेश महाराव श्याम मानव यांच्यावरही टीका केली आहे. भारतामधील बहुसंख्यांकांच्या भावना जे दुखावतात त्या लोकांना किमान जाणीव तरी करून द्यायला हवी म्हणून ''''जीभ छाटू नये तर जिभेला चटके'''' मात्र निश्चितच दिले पाहिजे असा पुनरउल्लेख सुद्धा डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.
अमरावती MIDCमध्ये ऑईल रिफायनरीला भीषण आग लागली आहे. अमरावती-बडनेरा मार्गावरील जुन्या MIDCमध्ये ही आगीची घटना घडली आहे. MIDCतील राम इडस्ट्रीज या ऑइल रिफायनरीमध्ये ही आग लागली आहे. पहाटे सहाच्या सुमारास कंपनीला आग लागली. त्यानंतर आगीनं संपूर्ण कंपनीला विळख्यात घेतलं. अग्निशमन दलाचे 6 बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी
अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी, अशी आग्रहाची मागणी मनसे नेत्यांनी केली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मनसे नेत्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, या नेत्यांच्या मागणीवर राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्व मनसैनिकांच लक्ष लागलं आहे.
अजित पवारांनी बोलावली बैठक
आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट महायुतीत 80 जागा लढवण्यावर आग्रही असल्याची माहिती सूत्रानं दिली आहे. अजित पवार गटाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. बैठकीत विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणारेय. जागा वाटपाबाबत महायुतीत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आमदारांसोबत चर्चा करणार आहेत. आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती अजित पवार जाणून घेणार असल्याची माहितीही सूत्रानं दिलीय. तर अजित पवार गटाला 40 जागा मिळतील, प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.
संजय पाटलांचा विशाल पाटलांवर हल्लाबोल
सांगलीचे खासदार विशाल पाटील अपरिपक्व माणूस, अशा शब्दांत माजी खासदार संजयकाका पाटलांनी विशाल पाटलांवर हल्लाबोल केला आहे. पद आणि प्रतिष्ठा मिळाल्यावर माणूस बेफाम होतो, तसं विशाल पाटील बेफाम झालेत. ते सर्वांना पाठिंबा देत सुटलेत, अशी टीका संजयकाका यांनी केली आहे.
गणेश विसर्जनाला गेलेला तरुण बुडाला
पुण्याच्या इंदापूरमध्ये गणेश विसर्जन करताना एक जण बुडाल्याची घटना घडली आहे. नीरा नदीमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेला 16 वर्षीय युवक बुडालाय आहे. अनिकेत कुलकर्णी असं या युवकाचं नाव आहे. दरम्यान प्रशासनाकडून त्याचा शोध सुरू आहे.
राज ठाकरेंचा शैक्षणिक धोरणावर सवाल
गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून डॉ. अजित रानडे यांना काढल्यानंतर राज ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. लोकांना अपमानित करणं हेच नवं शैक्षणिक धोरण आहे का असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला विचारला आहे.
अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची.. अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी निकाल लागणार का याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस
अंतरवाली सराटीत सहाव्यांदा जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगेंनी हे उपोषण सुरू केल आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, सगे सोयरे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून अंमलबजावणी करावी, हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे, दरम्यान,मराठा आरक्षणाबाबत सरकार प्रामाणिक आहे. सरकारनं सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजानं देखील सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे,असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदें व्यक्त केल आहे. मुख्यमंत्र्यांना उत्तर देताना जरांगेंनी आता खडतर प्रवास सुरू झाल्याचं म्हटल आहे. त्याचबरोबर संधी दिली आता आरक्षणाची अंमलबजावणी करा असं आवाहनही जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे.