Maharashtra Breaking News LIVE: धुळे-सोलापुर महामार्गावरील वाहतूक सुरू

Tue, 24 Sep 2024-7:11 pm,

Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंच्या मृत्यूबरोबरच आज दिवसभरामध्ये राजकीय घडामोडी चर्चेत असून याचसंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा...

Latest Updates

  • Maharashtra Breaking News LIVE: शाळेतील मुलींच्या सुरक्षेबाबत सु्प्रीम कोर्टाचे राज्यांच्या मुख्य सचिवांना आदेश

    बचपन बचाओ आंदोलन या 'एनजीओ'ने ही याचिका दाखल केली आहे. सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने देशातील सर्वच राज्यांच्या मुख्य सचिवांना आदेश देत बचपन बचाव आंदोलनाबाबत दिलेला आदेश पाळावा, असे कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा नुकताच पोलिसांनी एन्काऊंटर केला. एन्काऊंटरनंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्याने आता सीआयडीकडून एन्काऊंटरचा तपास होणार आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: धुळे-सोलापुर महामार्गावरील वाहतूक सुरू

    धुळे- सोलापूर महामार्गावरील मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केला होता. त्यानंतर पाऊस आल्यानं हा रास्ता रोको हटवण्यात आला आहे. त्यामुळे आता धुळे-सोलापूर महामार्ग सुरु झाला आहे. तब्बल 3 तास महामार्ग बंद करण्यात आला होता. 

  • Maharashtra Breaking News LIVE: पंढरपूरमध्ये धनगर समाज आक्रमक

    पंढरपूरमध्ये धनगर समाज आरक्षण उपोषण सोडण्यासाठी उपस्थित समाज बांधव आक्रमक

  • Maharashtra Breaking News LIVE: नाशिकमध्ये शिवशाही बसने 4 ते 5 वाहनांना दिली धडक

    नाशिकमध्ये शिवशाही बसने 4 ते 5 वाहनांना दिली धडक. अपघातात कुठलीही जीवित हानी नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवशाही बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात. 

  • Maharashtra Breaking News LIVE: सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम, अनेक ठिकाणी साचलं पाणी
     
    मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने तळकोकणात दमदार हजेरी लावलीय. काल रात्रीपासून रिमझिम सुरू असलेल्या पावसाने आज जोर धरलाय. त्यामुळे कुडाळ शहरात पाणी थेट रस्त्यावर आले आहे. नाल्यांची सफाई झाली नसल्याने वाहन चालक, पादचारी व प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. गटारातील पाणी रस्त्यावर आले असल्याचा आरोप करत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: मिरारोडमधील रुग्णालयात राडा

    मिरारोडमधील लाइफ लाईन हॉस्पिटलमध्ये गोंधळ झाला आहे. हॉस्पिटल स्टाफला मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. एक रुग्णाला रुग्णायलात घेऊन आले असता, वॉचमेननी गेट न उघडल्याने वॉचमेनला कानशीलात लावली आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. 

  • Maharashtra Breaking News LIVE: वडीगोद्री महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

    जालना -वडीगोद्री महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. रास्ता रोको करून मराठा आंदोलकांनी हा रस्ता बंद केला आहे. अर्ध्या तासापासून मराठा आंदोलकांनी या मार्गावर आंदोलन सुरु केलं आहे . मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. जरांगे यांच्या मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: नागपूरमधील मेट्रो शंकरनगर स्टेशनजवळ बंद पडली

    शंकर नगरकडून सीताबर्डीकडे जाणाऱ्या मार्गावर तांत्रिक कारणांमुळे एक मेट्रो बंद पडली. बंद पडलेल्या मेट्रोमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

    अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. सीआयडी अधिक्षक, नवी मुंबई हे तपासाचे प्रमुख असणार आहेत. सीआयडीचे पथक आजच ठाण्यात दाखल होणार आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE:  मुंबई सिनेट निवडणूक याचिका मागे

    मुंबई सिनेट निवडणुकीच्या स्थगिती संदर्भातील याचिका महाराष्ट्र स्टुडंट युनियनने मागे घेतली आहे. 

  • सिंधुदुर्गात आज आणि उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट

  • आंतरवली सराटी: मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडावं म्हणून महिलांचा आक्रोश

    आंतरवली सराटी: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी महिलांचा आक्रोश. उपोषण मागे घेण्याची मागणी. पाणी प्यावं असा महिल आग्रह करत आहेत.

  • आंतरवली सराटी: मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडावं म्हणून महिलांचा आक्रोश

    आंतरवली सराटी: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी महिलांचा आक्रोश. उपोषण मागे घेण्याची मागणी. पाणी प्यावं असा महिल आग्रह करत आहेत.

  • अक्षय शिंदेंच्या शवविच्छेदनाला सुरुवात; 2 तास चालणार प्रक्रिया

    अक्षय शिंदेच्या शवविच्छेदन प्रक्रियेसाठी पोलिसांकडून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दुपारी एक वाजता शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयाकडे सोपवण्यात आला असून पुढील दोन तासांमध्ये शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

  • शरद पवार जरांगेंबरोबर हे स्पष्ट झालं : प्रकाश आंबेडकर

    "शरद पवार हे जरांगे पाटील यांच्याबरोबर आहेत हे आता स्पष्ट झालं आहे," असं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. "जरांगेच्या मागणीला त्यांचा पाठींबा आहे," असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला

    राज ठाकरे सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये दाखल झाले आहेत. ठाकरेंवर आधारित चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे भेटीला आल्याची माहिती समोर येत आहे. उद्या संध्याकाळी ताज लँड्स एंडला राज ठाकरे यांच्यावरील 'येक नंबर' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडणार आहे.

  • संशयाचे वातावरण दूर करण्यासाठी...; अक्षय शिंदे मृत्यूवरुन प्रकाश आंबेडकरांची मागणी

    बदलापूर घटनेतील आरोपींना सुरुवातीला शोधण्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला अपयश आलं होतं, असं प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे. "सुरुवातीपासून आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. संशयाचे वातावरण दूर करण्यासाठी खरी माहिती यावी यासाठी ज्या पोलिसाला गोळी लागली आहे, त्याचा मेडिकल रिपोर्ट समोर आणावा," असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. "नेमक्या कशाच्या शोधासाठी अक्षय घेऊन जात होते? ते समोर आलं पाहिजे. कुणाला वाचवण्यासाठी हे केलं गेलं का हे समोर आणलं पाहिजे," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. 

  • अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन पोलीस जे. जे. रुग्णालयात

    अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन पोलीस अधिकारी शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल झाले आहेत. ठाण्यातील कळव्यामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात आणण्यात आला आहे.

  • मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक प्रकरण : सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

    सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी. राज्य सरकार आणि काही विद्यार्थी संघटना यांची निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी आहे. न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि एसव्हीएन भारती यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. आज सिनेट निवडणुकीसाठी एकीकडे मतदान होत असताना दुसरीकडे सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष आहे.

  • शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

    एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केलं नाही म्हणून ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून दाखल केल्यानंतर याचिका

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मागच्या 2 आठवड्यात कोर्टाने या सुनावणीसाठी तारखा निश्चित केल्या होत्या मात्र त्यावर सुनावणी नव्हती झाली.

    कोर्टाने आजची तारीख सुनावणीसाठी निश्चित केली असल्याने आज तरी सुनावणी होते का हे पाहणं महत्वाचं!

    विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने आणि त्यानंतर मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे निवृत्त होणार असल्याने या प्रकरणाचा निकाल त्यापूर्वी लागणे अपेक्षित आहे.

    आज कोर्टाने प्रकरण ऐकलं तर सुनावणीची दिशा निश्चित होईल.

  • शिंदे-पवारांच्या एकत्रित जागांपेक्षा BJP ला अधिक जागा? आकडा समोर; जळपास शिक्कामोर्तब

    राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपावर शिक्कामार्तेब झाल्याचं मानलं जात. मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या बैठकींचं सत्र, आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदाव्यांनंतर अखेर या तिन्ही पक्षांचं जागा वाटपावर एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे. जागावाटपामध्ये काय ठरल्याची चर्चा आहे हे जाणून घ्या येथे क्लिक करुन...

  • बदलापूर रेल्वे स्थानकावर पेढे वाटप

    बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी मृत्यू झाल्यानंतर शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. शिंदे सरकारच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन कार्यकर्त्यांनी केलं आहे.

  • नागपूर शहरात मुसळधार पाऊस

    नागपूर शहरात मुसळधार पाऊस होतोय. सकाळीच काळेकुट्ट ढग दाटून आले आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने नागपूरसह विदर्भात येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवस दमदार पाऊस राहणार असल्याची शक्यता ही व्यक्त करण्यात आली आहे.

  • तेजीत असलेल्या पालेभाज्यांच्या दरात मोठी घट

    पालेभाज्यांची आवक वाढल्याने मेथी, कोथिंबिरीच्या दरात मोठी घट झाली आहे. मात्र अन्य पालभाज्यांचे दर स्थिर आहेत. महिनाभरापासून कोथिंबीर, मेथीसह सर्व पालेभाज्यांचे दर तेजीत होते. मध्यंतरी पावसामुळे पालेभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली. आठवड्यापूर्वी कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर 60 ते 70 रुपये होते. तो आता 40 ते 50 रुपयांपर्यंत आला आहे

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    किरकोळ बाजारातील दर खालीलप्रमाणे : -

    - मेथी 20 ते 30

    - कोथिंबीर - 20 ते 25

    - पालक - 25 ते 30

    - शेपू - 25 ते 30

  • राज्यात चार दिवस पावसाची शक्यता

    राज्यात आजपासून चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून आज पासून बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन, ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील हवामान विषयक स्थितीचा परिणाम म्हणून पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस असल्याने पुढील चार दिवस वादळी वारे, मेघगर्जनेसह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या उर्वरित भागातही पावसाची हजेरी राहणार आहे.

  • राहुल गांधींविरोधातील 'तो' खटला पुण्यातील 'एमपीएमएलए' कोर्टात चालणार

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर दाखल असलेल्या फौजदारी तक्रारीची सुनावणी आता ‘एमपीएमएलए’ या विशेष न्यायालयात होणार. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या विशेष न्यायालयात ही सुनावणी होणार असून, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींविरुद्ध दाखल असलेल्या फौजदारी गुन्ह्यातील प्रकरणांची सुनावणी जलदगतीने व्हावी, यासाठी उच्च न्यायालयाच्या अधिसूचनेनुसार जिल्हा व सत्र न्यायालयात ‘एमपी एमएलए’ हे विशेष न्यायालय नुकतेच स्थापन करण्यात आले आहे.

  • अजित रानडे यांना दिलासा कायम

    पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था या अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांना देण्यात आलेला अंतरिम दिलासा उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या डॉ. रानडे यांच्या याचिकेवरील सुनावणी 25 सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे.

  • विक्रम! मुंबई मेट्रोच्या 'या' मार्गावर एका दिवसात पावणेतीन लाख प्रवाशांचा प्रवास

    डी. एन. नगर ते दहीसर पूर्व 'मेट्रो २ अ' आणि अंधेरी पूर्व ते दहीसर पूर्व 'मेट्रो 7' या मार्गिकेवर सप्टेंबर महिन्यातील एका दिवसात पावणेतीन लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. एका दिवसातील प्रवासी संख्येने आतापर्यंतचा हा सर्वोच्च आकडा पार करून 2 लाख 81 हजारांचा आकडा गाठला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या मेट्रो मार्गिकांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रवासीसंख्येचा 2 लाख 60 हजारांचा टप्पा पार केला होता.

  • सिनेटमध्ये कोण बसणार? आज मतदान! युवासेना-अभाविपमध्ये थेट लढत

    मुंबई विद्यापीठाच्या बहुचर्चित अधिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी आज, मंगळवारी मतदान होणार असून उद्धवसेनेची युवासेना आणि भाजपप्रणीत अभाविप या दोन संघटनांचे उमेदवार आमने-सामने आहेत. एकूण 28 उमेदवार ही निवडणूक लढवीत असून युवासेना आणि अभाविपच्या प्रत्येकी 10 उमेदवारांत हा सामना रंगेल, अशी चर्चा आहे.

  • कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस पडणार?

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन, त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारपासून (२४ सप्टेंबर) पुढील चार दिवस वादळी वारे, मेघगर्जनेसह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या उर्वरित भागातही पावसाची हजेरी राहणार आहे.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मंगळवारसाठी पावसाचा अंदाज
    नारंगी इशारा – सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगड, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली

    पिवळा इशारा – उर्वरित महाराष्ट्र.

  • महायुतीची महत्त्वाची बैठक

    भाजपच्या मतदार संघनिहाय आढावा बैठकीनंतर महायुतीची ही महत्त्वाची बैठक होणार आहे. संभाजी नगरातील या बैठकीला दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील. 

  • अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सायंकाळी 6:15 ला छत्रपती संभाजी नगर विमानतळावर त्यांचे आगमन होईल. 6:30 वाजता एमजीएम येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर अमित शाह बैठकीसाठी 8:35 वाजता हॉटेल रामा येथे मुक्कामी असतील. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे उपस्थित असणार आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link