जगातील सर्वात मंद गतीची ट्रेन, नावाला एक्सप्रेस पण चालते रिक्षाहून स्लो, तरीही का असते गर्दी?

काही गाड्या वाऱ्याच्या वेगाने धावतात तर काही इतक्या संथ गतीच्या असतात की त्यांना कमी किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी कित्येक तास लागतात. 

| Sep 24, 2024, 18:27 PM IST

World Slowest Train: काही गाड्या वाऱ्याच्या वेगाने धावतात तर काही इतक्या संथ गतीच्या असतात की त्यांना कमी किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी कित्येक तास लागतात. 

1/7

जगातील सर्वात मंद गतीची ट्रेन, नावाला एक्सप्रेस पण चालते रिक्षाहून स्लो, तरीही का असते गर्दी?

World Slowest Train Glacier Express Railway Marathi News

World Slowest Train: भारतात दररोज करोडो लोक ट्रेनने प्रवास करतात. हजारो गाड्या प्रवाशांना त्यांच्या स्थानकावर नेऊन सोडतात. काही गाड्या वाऱ्याच्या वेगाने धावतात तर काही इतक्या संथ गतीच्या असतात की त्यांना कमी किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी कित्येक तास लागतात. 

2/7

सर्वात वेगवान ट्रेन

World Slowest Train Glacier Express Railway Marathi News

भारतातल्या अशा ट्रेनबद्दल बोलायचं झालं तर, दिल्ली ते भोपाळ मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही सर्वात वेगवान ट्रेन आहे. जिचा वेग ताशी 160 किमी आहे. सर्वात स्लो ट्रेन उटी-निलगिरी आहे. पण आज चर्चा भारताची नाही तर जगातील सर्वात स्लो ट्रेनची होणार आहे.

3/7

जगातील सर्वात स्लो ट्रेन

World Slowest Train Glacier Express Railway Marathi News

जगातील सर्वात स्लो ट्रेन इतकी हळू धावते की तिला 290 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 10 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणजेच ऑटोमध्ये बसलात तरी ट्रेनच्या आधी पोहोचाल.

4/7

सर्वात स्लो ट्रेनचा वेग

World Slowest Train Glacier Express Railway Marathi News

ग्लेशियर एक्सप्रेस ही जगातील सर्वात हळू धावणारी ट्रेन आहे. या ट्रेनच्या नावावर एक्सप्रेस असेल, पण तिचा वेग कासवासारखा आहे. ताशी केवळ 29 किमी वेगाने धावणाऱ्या या ट्रेनला जगातील सर्वात स्लो ट्रेनचा मान मिळाला आहे.

5/7

सर्वात हळू ट्रेन कुठे धावते?

World Slowest Train Glacier Express Railway Marathi News

ग्लेशियर एक्सप्रेस स्वित्झर्लंडमधील झर्मेट आणि सेंट मॉरिट्झ स्थानकांना जोडते. ही ट्रेन 1930 मध्ये सुरू झाली. या ट्रेनचा वेग कमी असेल, पण तिचा मार्ग अतिशय सुंदर आहे. 290 किमीच्या मार्गावर ही ट्रेन 90 हून अधिक बोगदे आणि 300 पूल पार करते.

6/7

सौंदर्य आणि थरारक नजारा

World Slowest Train Glacier Express Railway Marathi News

या ट्रेनच्या प्रवासादरम्यान, बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर दृश्ये दिसतात. ट्रेन डोंगर आणि उतारावरून जाते. काहींसाठी हे दृश्य निसर्गाचे सौंदर्य आहे तर काहींना ते थराराक वाटते. 

7/7

पर्यटकांची संख्या मोठी

World Slowest Train Glacier Express Railway Marathi News

प्रवासादरम्यान उलट्या किंवा पोटाचा त्रास होऊ नये, यासाठी ट्रेनमध्ये प्रवास करताना विशिष्ट प्रकारची वाइन लोकांना दिली जाते. निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी या रेल्वेने मोठ्या संख्येने पर्यटक येतात.