अर्जुन तेंडुलकरच्या 25 व्या वाढदिवशी बहीण साराने केली खास पोस्ट, लाडक्या भावाला दिली 'ही' उपमा

भारताचा माजी क्रिकेटर आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा 24 सप्टेंबर रोजी त्याचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याची बहीण सारा तेंडुलकर हिने लाडक्या भावासाठी एक खास पोस्ट केली आहे. 

| Sep 24, 2024, 18:29 PM IST
1/6

युवा क्रिकेटर अर्जुन तेंडुलकरचा जन्म 24 सप्टेंबर 1999 रोजी सचिन आणि अंजली तेंडुलकर यांच्या घरी झाला होता. अर्जुन हा सुद्धा वडील सचिन प्रमाणे क्रिकेटमध्ये करिअर करत असून आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून त्याचे पदार्पण झाले होते. तर सध्या तो गोवा टीमकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. 

2/6

अर्जुनच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त बहीण सारा तेंडुलकरने लाडक्या भावासाठी खास पोस्ट केलीये. यात साराने अर्जुनला शुभेच्छा देत काही खास फोटो पोस्ट केले.    

3/6

साराने अर्जुनला शुभेच्छा देणाऱ्या पोस्टमध्ये म्हंटले, "आमच्या घरातील बाळाला 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो आम्हाला तुझा अभिमान आहे". 

4/6

साराने अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर अजून एक स्टोरी लिहिली. यात तिने दोघांच्या लहानपणीचा फोटो शेअर केला. तिने यात लिहिले "माझ्या सर्वात मोठ्या डोकेदुखीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" .

5/6

अर्जुन तेंडुलकरला 2021 च्या आयपीएल ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते. 2023 मध्ये त्याने मुंबईने पदार्पणाची संधी दिली.  अर्जुन एक ऑलराऊंडर खेळाडू असून आयपीएलच्या 5 सामन्यांमध्ये त्याने 3 विकेट्स घेतले आणि 13 धावा केल्या.

6/6

अर्जुनच्या फर्स्ट क्लास क्रिकेट करिअरबद्दल बोलायचे झाल्यास त्याने 13 सामन्यांमध्ये आतापर्यंत 21 विकेट्स घेतल्या आहेत. यासह अर्जुनने रणजी ट्रॉफी सामन्यात एक शतक ठोकलं असून त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 481 धावा निघाल्या आहेत.