Maharashtra Breaking News Today LIVE Updates: उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील व दादा भुसे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार

Wed, 04 Dec 2024-8:55 pm,

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राजकीय घडामोडींच्या दृष्टीने आजचा दिवस महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. नेमकं आज काय घडणार? दिवसभरातील सर्वच घडामोडींचा घेतलेला धावता आढावा या ठिकाणी पाहता येईल...

Latest Updates

  • कपिल पाटील, राहुल नार्वेकर फडणवीसांच्या भेटीला

    माजी खासदार कपिल पाटील तसेच आमदार राहुल नार्वेकर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर वर दाखल

    जिंतुरच्या नवनिर्वाचीत आमदार मेघना बोर्डीकर आणि नाशिक पश्चिमच्या सीमा हिरे ,देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर निवासस्थानी दाखल

  • एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं 

    1. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी सोबतच काही मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या घ्यावा अशी मागणी एकनाथ शिंदेंनी केली. 
    2. शिवसेनेला मंत्रिमंडळात कुठली खाती अपेक्षित आहे आणि शिवसेनेचे कोण संभाव्य मंत्री असू शकतात याबाबत ही चर्चा झाली. 
    3. या सगळ्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून कळवणार असल्याच देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना सांगितले.

    सूत्र

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडवणीस यांच्यात बंद दाराआड बैठक सुरू

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडवणीस यांच्यात बंद दाराआड बैठक सुरू

    उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील व दादा भुसे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार - सूत्र 

  • देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल

    एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत

  • एकनाथ शिंदे यांना मनधरणी करण्याचा प्रयत्न

    शिवसेना आमदारांची वर्षावरील बैठकीत एकनाथ शिंदे यांना मनधरणी करण्याचा प्रयत्न - सूत्र

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व करावं आणि सोबत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं यासाठी सकारात्मक चर्चा 

    त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांच्या भूमिकेवर  सकारात्मक...सूत्र

  • एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार-  सूत्र

    काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार 

    सरकारमध्ये सामील होणार - सूत्र

  • आज संध्याकाळी महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक पार पडणार 

    वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात होणार चर्चा 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    उद्या आझाद मैदानावर किती मंत्री शपथ घेणार याबाबत होणार चर्चा 

    उद्या मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री घेणार शपथ

  • अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये टोलेबाजी 

    तुम्ही आणि अजित पवार उद्या शपथ घेणार का? असं विचारलं असता एकनाथ शिंदे उत्तर देत होते की, संध्याकाळपर्यंत थांबा. तेवढ्यात अजित पवार म्हणाले, "संध्याकाळपर्यंत त्यांचं समजणार आहे. मी तर घेणार आहे. मी थांबणार नाही". त्यावर टोला लगावत एकनाथ शिंदे म्हणाले, "अरे दादांना तर अनुभव आहे दुपारीही घेण्याचा आणि सकाळीही घेण्याचा". यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. पुढे अजित पवार म्हणाले की, "पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती. राहून गेलं होतं ते आता पुढचं 5 वर्षं ठेवणार आहे". 

    संपूर्ण बातमी वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

  • अजित पवार दिल्लीला का गेले होतं याचं कारण महायुतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तीन महत्त्वांच्या कामासाठी अजित पवार दिल्लीला गेले होते, असं त्यांनी स्वत: सांगितलं. 

    बातमी सविस्तर वाचा - Ajit Pawar : दिल्लीवारीबद्दल अजित पवारांचा मोठा खुलासा, 'अमित शाहांच्या भेटीसाठी...'

  • मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना शिवसनेचा पाठिंबा आहे. महायुती जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.  

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचा पाठिंबा - एकनाथ शिंदे 

  • देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद - 

    "आम्ही महायुतीच्या वतीने राज्यपालांना पत्र दिलं आहे. राज्यात नवं मंत्रिमंडळ स्थापन कऱण्यासाठी दावा केला आहे. राज्यपालांनी आमचा दावा घेतल्यानंतर आम्हाला 5 तारखेला संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधीची वेळ नेमून दिली आहे. आज भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, जनस्वराज्य, युवा स्वाभिमान, रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती झालेली आहे. या सगळ्यांच्या सहीचं पत्र दिलं आहे," अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 
     
    "मी शिवसेनेचे अध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानते. त्यांनी शिवसेनेच्या वतीने माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आहे. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. तसंच राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवार यांनीही त्याच आशयाचं पत्र दिलं आहे. आमच्या मित्रपक्षांनीही तशाच प्रकारची विनंती केली आहे. सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून राज्यपालांनी निमंत्रित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उद्या 5.30 वाजता आझाद मैदानात हा सोहळा पार पडला जाणार आहे. तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित असतील," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीची लिंक - https://zeenews.india.com/marathi/maharashtra/mahayuti-government-eknath...

     

  • Mahayuti Press Conference : राज्यपालांकडे जाऊन महायुतीने सत्तास्थापनेचा दावा केला. उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनी स्विकारलं की नाही, याबद्दल सस्पेन्स कायम आहे. कारण महायुतीच्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, एकनाथ शिंदे सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा यांनी व्यक्त केली. 

    बातमी सविस्तर वाचा - Mahayuti Press Conference: मी एकनाथ शिंदेंना विनंती केली आहे; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

     

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यपालांकडून महायुतीला सत्तास्थापनेचं आमंत्रण

     

  • महायुती सत्तास्थापनेचा दावा करणार, तिन्ही नेते राजभवनाच्या दिशेने रवाना

  • देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ अजित पवारही वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.

     

  • फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल

     

  • फडणवीस मुख्यमंत्री होणार निश्चित होताच; नाशिकमध्ये मोठ्या राड्याचे संकेत?

    भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर होतात नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. या आनंद उत्सवात भाजप पदाधिकाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मुख्यमंत्री असा बॅनर घेऊन आनंद साजरा केला गेला. तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्री असं बॅनर देखील फडणवीसांच्या नावासहीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून दाखवण्यात आलं. त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील तीनही पक्षांकडून दावे केले जात आहेत. त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्री पदावरूनही संघर्ष महायुतीत पाहायला मिळणार असे चित्र सध्यातरी समोर येत आहे.

  • दुपारी 2 वाजता फडणवीस, शिंदे, अजित पवार भेटणार आणि...

    दुपारी 2 वाजता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. वर्षा निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. या बैठकीला अजित पवारसुद्धा उपस्थित राहणार आहेत. पुढील सर्व प्रक्रिया, मंत्रिपदं, कोण शपथ घेणार याबाबत तिन्ही नेते चर्चा करणार आहेत.

  • फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्यानंतर शिंदेंचे नेते घेणार त्यांची भेट

    एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शुभेछा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. विधिमंडळ गट नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यामुळे त्यांना भेटून शुभेच्छा देणार आहेत. उदय सामंत, अर्जुन खोतकर, अब्दुल सत्तार, भरत गोगावले, किशोर आप्पा पाटील आणि इतर नेते भेटून शुभेच्छा देणार आहेत.

  • मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव घोषित पुढे काय?

    विधीमंडळ पक्षाचा नेता भाजपकडून घोषीत झाल्यानंतर सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेत्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर महायुतीचे 3 प्रमुख नेते म्हणजेच एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस एकत्रच राज्यपालांकडे जाण्याची शक्यता आहे. 2 वाजता अजित पवार दिल्लीहून मुंबईत पोहोचतील अशी माहिती समोर येत आहे. दुपारी साडेतीन वाजता हे तिन्ही नेते राज्यपालांची भेट घेणार आहे. साडेतीन वाजताची वेळ ही राज्यपालांच्या भेटीसाठी नियोजित केली आहे.

  • अशी झाली फडणवीसांच्या नावाची निवड

    कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा गटनेता म्हणून प्रस्ताव निश्चित करण्यात आल्यानंतर तो भाजपाच्या विधीमंडळ सदस्यांसमोर म्हणजेच नवनिर्वाचित आमदारांसमोर ठेवण्यात आला. या प्रस्तावाला आशिष शेलार, पंकजा मुंडेंसहीत भाजपाच्या अनेक नेत्यांनी अनुमोदन देत फडणवीसांचं अभिनंदन केलं. प्रस्तावाला अनुमोदन दिलं. त्यानंतर आमदारांनी आपला पाठिंबा दर्शवल्यानंतर फडणवीसांचं नाव गटनेते पदी निश्चित झालं.

  • महाराष्ट्रात पुढील 5 वर्ष फडणवीस पर्वच... BJP कडून शिक्कामोर्तब!

    भाजपाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांची गटनेता पदी नियुक्ती झाली आहे. विधीमंडळातील सर्वात मोठ्या पक्षाचा गटनेता हाच बहुमत असल्यास मुख्यमंत्री होतो. त्यामुळे फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील हे निश्चित झालं आहे. भाजपाच्या सर्व नवनियुक्त आमदारांनी फडणवीसांच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे. फडणवीसांची बिनविरोध निवड झाली आहे.

  • 'हमारा नेता कैसा हो?' 'देवेंद्र फडणवीस जैसा हो'च्या घोषणा

    भाजपाच्या आमदारांकडून विधीमंडळ पक्ष बैठकीमध्ये 'हमारा नेता कैसा हो?' 'देवेंद्र फडणवीस जैसा हो'च्या घोषणा दिल्या.

  • विधीमंडळ गटनेता पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव

    विधीमंडळ गटनेता पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वच आमदारांनी जल्लोष केला. पंकजा मुंडे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं.

  • उद्या मुंबईत शपथविधी सोहळा, जय्यत तयारी! आझाद मैदान परिसरात 5 हजार पोलीस तैनात

    उद्या म्हणजेच 5 डिसेंबर रोजी मुंबई महानगरपालिकेसमोरील आझाद मैदानामध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून भाजपा नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे समजते. आझाद मैदान परिसरामध्ये 5 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

  • भाजपाचं ठरलं... फडणवीसांना गटनेता करण्याचा प्रस्ताव; चंद्रकांत पाटील...

    गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावार भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आता हा प्रस्ताव विधिमंडळ बैठकीमध्ये मांडला जाणार आहे. चंद्रकांत पाटील हा प्रस्ताव मांडणार असून सुधीर मुनगंटीवार, रविंद्र चव्हाण, आशिष शेलार या प्रस्तावाला अनुमोदन करणार आहेत.

  • विधानसभवनात भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक संपली; थोड्याच वेळात जाहीर होणार नव्या मुख्यमंत्र्याचं नाव

    विधानसभवनात भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक संपली आहे. जवळपास अर्धा तास ही बैठक सुरु होती. यानंतर भाजपाच्या विधानसभा पक्षाची बैठक होणार असून यामध्ये गटनेता निवडला जाणार आहे.

  • PUBG खेळत असताना पाठीमागून वार; पुण्यात अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलाची हत्या

    पुण्यात अल्पवयीन आरोपींकडून गुन्हेगारीचे सत्र सुरूच असल्याचं चित्र दिसत आहे. अल्पवयीन आरोपीने अल्पवयीन मुलाचा धार धार शस्त्राने वार करत खून केला आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुकमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी आणि मृत मुलामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत नंबरवरून वाद झाला होता. मुलगा पब्जी खेळत असताना पाठीमागून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

  • पक्ष विरोधी कार्यवाही केल्याचा आरोप असलेला 'तो' नेताही बैठकीत सहभागी

    रणजीत सिंह मोहिते पाटील भाजपाच्या बैठकीसाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्ष विरोधी कार्यवाही केल्याचा आरोप केला होता.

     

  • विधानसभवनात भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात; फडणवीसही उपस्थित

    विधानसभवनात भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीनंतर होणाऱ्या विधीमंडळाच्या भाजपाच्या बैठकीत सर्व नवनिर्वाचित आमदार उपस्थित असणार आहेत. या बैठकीत गटनेता निवडला जाणार आहे. कोअर कमिटीच्या बैठकीला फडणवीसही उपस्थित आहेत.

  • 'देवा भाऊ आपले मुख्यमंत्री'; मुंबईत बॅनरबाजी

    भाजपाचे केंद्रीय निरिक्षक थांबलेल्या ताज प्रेसीडंट हॉटेलबाहेर, 'देवा भाऊ आपले मुख्यमंत्री' अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे. नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असणार असा विश्वास बॅनरमधून व्यक्त करण्यात आला आहे. भाजप गटनेता निवडीची बैठक होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री असा उल्लेख केला जात आहे.

  • भाजपाचा विजय झाल्यापासून मराठी माणसांवर हल्ले सुरु; राऊतांचा हल्लाबोल

    भाजपचा विजय झाल्यापासून मराठी माणसांवर हल्ले सुरू झाले आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मराठी बोलू नका, मारवाडी गुजराती बोला अशा धमक्या देत आहेत. मराठी माणसाला उचलून आणण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्या फडणवीस यांच्या आजूबाजूचे उपरे देत आहेत. राज्यात सुरु असलेल हे चित्र अत्यंत गंभीर आहे. मुंबई मराठी माणसांच्या रक्तातून तयार झाली आहे. आम्ही मराठी माणसाच्या हक्कासाठी लढत आहोत मराठी खपवून घेतल जात नाही अशा धमक्या दिल्या जात आहेत, असं राऊत म्हणालेत.

  • राज्याची कशी लूट होईल याचा ट्रेलर आम्ही 8 दिवसांपासून...; संजय राऊतांचा टोला

    महाराष्ट्रात सरकार स्थापना हा खेळखंडोबा होऊन बसला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. इतकं प्रचंड बहुमत मिळालं आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं आहे मात्र मुख्यमंत्री पदासाठी काँटे की टक्कर सुरू आहे. बहुमत मिळून भाजप वेळेवर सरकार स्थापन करू शकत नाही. अंतर्गत कुरघोडीमुळे भाजपला हे कठीण जात आहे तर सरकार चालवताना काय? राज्याची कशी लूट होईल याचा ट्रेलर आम्ही 8 दिवसांपासून पाहत आहोत, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. 

  • फेटे बांधून भाजपा आमदारांचं विधानभवनात स्वागत; फडणवीसही दाखल

    देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरून विधानभवनात दाखल. आज भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षनेता निवडला जाणार आहे. फेटे बांधून भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांचं स्वागत करण्यात आलं आहे.

  • भाजपाचे निरीक्षक विधानसभेकडे रवाना

    भाजपचे निरीक्षक विजय रूपाणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ताज प्रेसिडेंट हॉटेलमधून विधानभवनाच्या दिशेने रवाना

  • गोल्डन टेम्पलच्या गेटवर माजी उपमुख्यमंत्र्यांवर गोळीबार

    पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री तसेच शिरोमणी अकाली दल पक्षाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गोल्डन टेम्पच्या प्रवेशद्वारावर हा हल्ला करण्यात आला.

  • मित्रपक्षांमुळे महाराष्ट्रात काँग्रेस अडचणीत; थेट राहुल गांधींकडे महिला खासदारांची तक्रार

    उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून जागावाटपात आडकाठी आणली गेली असं काँग्रेसच्या महिला खासदारांनी राहुल गांधींच्या भेटीदरम्यान म्हटलं आहे. महाविकास आघाडीच्या प्रचारात एकवाक्यता नव्हती आणि पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक खासदारांची मते विचारात घेतली नाहीत, असेही या महिला खासदारांनी सांगितले. महिला खासदारांनी नाना पटोले विरोधात राहुल गांधीकडे तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे. पक्षांतर्गत कुरघोडीमुळे कांग्रेसचं नुकसान होत असल्याचंही या महिलांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांकडून अडचणीत आणण्याचे प्रकार घडले, काँग्रेस पक्ष संघटनेतही मोठा गोंधळ पाहायला मिळाला, असं निरिक्षणही या खासदारांनी नोंदवलं आहे. जबाबदार नेत्यांनी स्वतःला भावी मुख्यमंत्री मानून आपल्या जवळच्या व्यक्तींना उमेदवारी वाटप केल्याने हे अपयश आल्याचे सांगण्यात आल्याचे कळते. 

  • राहुल गांधींची पराभवावर चर्चा; महाराष्ट्रातील महिला काँग्रेस खासदारांची घेतली भेट

    मित्रपक्षामुळे कांग्रेसला निवडणूकीत फटका बसल्याची तक्रार कांग्रेस महिला खासदारांनी राहुल गांधीकडे केली आहे. विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या सुमार कामगिरीबाबत महिला खासदारांनी राहुल गांधींकडे तक्रार नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राहुल गांधींनी पक्षाच्या लोकसभेतील महिला खासदारांसमवेत चर्चा केली. यामध्ये महाराष्ट्रातील वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, शोभा बच्छाव तसेच प्रतिभा धानोरकर आदींचा समावेश होता. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमधील काँग्रेसच्या कामगिरीबाबतही राहुल यांनी मते जाणून घेतली. यावेळी प्रियांका गांधी तसेच संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे देखील उपस्थित होते.

  • दक्षिण भारतातील भूकंपाचा केंद्रबिंदू सापडला

    तेलंगानामधील मुलुगू येथे आज (बुधवार, 4 डिसेंबर 2024) सकाळी दक्षिण भारताला बसलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रिक्टर स्केल वर हा भूकंप 5.3 तिव्रतेचा नोंदवण्यात आला. मुलुगूपासून 36 किमी एनएनडब्ल्यू तीव्रतेचा भूकंप झाला. खोली 35 किमी होती आणि ईएमएससीने याची नोंद करण्यात आली.

  • येरवाडा तुरुंगातील कैद्याने दिली राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा

    पुणे येरवडा कारागृहातून कैदी असलेल्या आरोपीने राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा दिली आहे. जामीन अर्ज प्रलंबित होता मात्र कैद्याची जिद्द बघून जुन्नर न्यायालयाने परीक्षा देण्याचा आदेश पारित केला. पोलीस बंदोबस्तात परीक्षा केंद्रामध्ये घेऊन जाण्यासाठी 30 नोव्हेंबर रोजी न्यायालयानचे आदेश दिला होता. जितेंद्र पांडुरंग घोलप असे या कैद्याचे नाव असून त्याने वाघोली येथील केंद्रावर पोलिस बंदोबस्तात पूर्व परीक्षा दिली आहे.

  • 'या' 3 बँकांच्या ग्राहकांना मोबाईलवरील सायबर हल्ल्याचा सर्वाधिक धोका; धक्कादायक अहवाल समोर

    भारतीयांच्या मोबाइलवर सध्या जगात सर्वाधिक हल्ले होत असून, याद्वारे खासगी माहिती चोरण्यासह आर्थिक गंडाही घातला जात आहे. 'जेडस्केलर थ्रेटलॅब्ज 2024 मोबाइल, आयओटी अँड ओटी थ्रेट' अहवालात समोर आले आहे. 'मालवेअर' हे सॉफ्टवेअर मोबाइल किंवा संगणकावर एखाद्याची ओळख चोरण्यासाठी किंवा गोपनीय माहिती चोरण्यासाठी वापरले जाते. स्पायवेअर हा मालवेअरचा एक प्रकार आहे. याद्वारे एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती त्याच्या नकळत मिळवली जाते. मोबाइल स्पायवेअर मालवेअर हल्ल्यांमध्ये 29 टक्के वाढ झाली असून यात मुख्य हेतू हा आर्थिक फसवणुकीचा असतो. थ्रेटलॅब्ज विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिससारख्या प्रमुख भारतीय बँकांच्या मोबाइल ग्राहकांना लक्ष्य करून फिशिंग केले जात आहे. या बँकांच्या ग्राहकांवरील हल्ले वाढले आहेत. बँकिंग संदर्भातील सायबर हल्ल्यांमध्ये 111 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या अभ्यासात गुगल प्ले स्टोअरवर 200 पेक्षा अधिक असे अॅप्लिकेशन्स आढळून आले आहेत, जे मोबाईल सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहेत.

  • सकाळी साडेसातच्या सुमारास गडचिरोलीला भूकंपाचे धक्के; चंद्रपूरही हादरलं

    गडचिरोलीमध्ये सकाळी 7.30 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. दक्षिण गडचिरोलीत नागरिकांना या भूकंपाची तीव्रता अधिक जाणवली. या भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण भारतात असल्याचा अभ्यासकांचा कयास आहे. चंद्रपूर शहरात देखील नागरिकांनी भूकंपाचे सौम्य धक्के अनुभवले.

  • अजित पवार अमित शाहांच्या भेटीसाठी दिल्लीत; मात्र मागील दोन दिवसांपासून...

    अजित पवार आज सकाळी मुंबईकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, अमित शाहांच्या भेट व्हावी यासाठी दिल्लीत दाखल झालेल्या अजित पवारांची दुसरा दिवसही भेटीशिवाय गेला. महायुती सरकारचा शपथविधी जवळ येऊन ठेपलेला असताना अजित पवार आपल्या मागण्या घेऊन दिल्लीत गेले असून त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे. अजित पवारांच्या मागण्या भाजपचे वरिष्ठ नेते मान्य करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

  • महाराष्ट्राच्या राजकारणात आज या 8 महत्त्वाच्या गोष्टी घडणार?

    > भाजप पक्ष निरीक्षक ताज प्रेसिडेन्टमधून 9 वाजता निघतील.
    > भाजप पक्ष निरीक्षक विधानभवनात 10 पर्यंत पोहचतील. 
    > 10 वाजता भाजप विधीमंडळ पक्ष कार्यालयात चौथ्या मजल्यावर कोअर कमिटीची बैठक होईल.
    > 11 वाजता विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधीमंडळ गटनेता निवडीसाठी बैठक होईल.
    > विधीमंडळ गटनेता निवडीनंतर भाजपची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.
    > भाजपचे निरीक्षक महायुतीच्या नेत्यांना भेटतील.
    > साडेतीन वाजता महायुतीचे नेते पक्ष निरीक्षक राज्यपालाकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करतील.
    > महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होईल अशी शक्यता. 

  • हार्बर मार्गावर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष लोकल

    हार्बर मार्गावरील वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशी येथून रात्री 1.30 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे रात्री 2.10 वाजता पोहोचेल. पनवेल-कुर्ला विशेष लोकल पनवेल येथून रात्री 1.40 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे रात्री 2.45 वाजता पोहोचेल. वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशी येथून रात्री 3.10 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे रात्री 3.40 वाजता पोहोचेल. कुर्ता-वाशी विशेष लोकल कुर्ला येथून रात्री 2.30 वाजता सुटेल आणि वाशी येथे रात्री 3.00 वाजता पोहोचेल.

  • महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्यरात्रीनंतर 12 विशेष लोकल

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या सोयीसाठी गुरुवारी मध्यरात्री परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान 12 विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील कुर्ता-परळ विशेष लोकल कुर्ला येथून गुरुवारी रात्री 12.45 वाजता सुटेल आणि परळ येथे रात्री 1.05 वाजता पोहचेल. कल्याण-परळ लोकल कल्याण येथून रात्री 1 वाजता सुटेल आणि परळ येथे रात्री 2.15 वाजता पोहोचेल. ठाणे-परळ विशेष लोकल ठाणे येथून रात्री 2.10 वाजता सुटेल आणि परळ येथे रात्री 2.55 वाजता पोहोचेल. परळ-ठाणे लोकल परळ येथून रात्री 1.15 वाजता सुटेल आणि ठाणे येथे रात्री 1.55 वाजता पोहोचेल. परळ-कल्याण विशेष लोकल परळ येथून रात्री 2.25 वाजता सुटेल आणि कल्याण येथे रात्री 3.40 वाजता पोहोचेल.

     

  • आझाद मैदान परिसरात 5 हजार पोलीस तैनात

    राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत प्राप्त करत अभूतपूर्व यश संपादन केले. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवार, 5 डिसेंबर रोजी दक्षिण मुंबईतील मुंबई महानगरपालिका मार्गावरील आझाद मैदानात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदान परिसरासह मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सुमारे 5 हजार पोलीस आझाद मैदान परिसरात तैनात राहणार असून त्यामध्ये जवळपास चार ते साडेचार हजार पोलीस अंमलदारांचा समावेश असेल. तसेच, 2 दंगल नियंत्रण पथक, तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकेही असणार आहेत.

  • बेस्ट उपक्रमाकडून महापरिनिर्वाण दिनी विशेष बस सेवा

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत विशेष बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंत 15 ते 20 मिनिटांच्या वारंवारतेने बससेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.

  • मुंबईकरांना पुन्हा घामाच्या धारा! थंडीची प्रतिक्षा कायम

    काही दिवसांपूर्वी मुंबईत थंडीची चाहूल लागली होती. मात्र, त्यानंतर आलेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मागील दोन दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानात वाढ झाली. ऐन डिसेंबर महिन्यात मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्या असून मुंबईकर थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतील वातावरणावरही झाला आहे. काही दिवसांपूर्वी थंडीची चाहूल लागली होती. उपनगरांतील किमान तापमान नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून 20 अंशाखाली नोंदले जात होते. यामुळे रात्री, तसेच पहाटे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, मागील दोन – तीन दिवसांपासून मुंबईत पुन्हा उकाडा जाणवू लागला आहे. तसेच वातावरण ढगाळ आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी 24.4 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात 24 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

  • भाजपाचे केंद्रीय निरीक्षक घेणार महायुतीच्या तिन्ही नेत्यांची भेट

    भाजपचे केंद्रीय निरीक्षक बैठकीनंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • सरकार स्थापनेसाठी भाजपाच्या हलचालींना वेग

    विधिमंडळ गटनेता निवड होण्याआधी भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटी बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यानंतर सकाळी सेंट्रल हॉल, विधानभवन येथे भाजप आमदारांची बैठक होईल, या बैठकीत नव्या सरकारच्या स्थापनेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link