Maharashtra Budget Session 2023 : विधानसभेत जोरदार हंगामा
Maharashtra Budget Session 2023 LIVE : विधिमंडळ अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) आजचा दिवसही विरोधकांच्या आंदोलनानं गाजणार आहे. शेतकऱ्यांच प्रश्न, वाढीव वीज दर आणि महागाई यावरती विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसा इशारा विरोधकांनी दिला आहे.
Maharashtra Budget Session 2023 LIVE : विधिमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. (Maharashtra Budget Session) आजचा दिवसही विरोधकांच्या आंदोलनानं गाजणार आहे. शेतकऱ्यांच प्रश्न, वाढीव वीज दर आणि महागाई यावरती विरोधक आक्रमक राहाणारेत. राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आज यावर मुख्यमंत्री उत्तर देणारेत. या चर्चा करताना विरोधी पक्षाच्या आमदारांनी अनेक आरोप केले आहेत. यावर मुख्यमंत्री उत्तर देतील.
Latest Updates
Maharashtra Budget Session 2023 Update : आज प्रश्नोतरच्या तासात अंगणवाडी सेविकांचा विषय होता. जवळपास 100 सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. या विभागाचे मंत्री उत्तर देत होते तेव्हा सगळेच
म्हणत होते उत्तर व्यवस्थित दिलंच नाही. या सरकारची भूमिका योग्य नाही. 100 सदस्य प्रश्न उपस्थित करून देखील मंत्री बघू बघू म्हणत असतील हे योग्य नाही.ज्या घोषणा तोंडी केल्या जातायत मात्र सरकार अंमलबजावणी करत नाहीत, असा हल्लाबोल माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.अंगणवाडी सेविकांना 15000 हजार रुपये द्या, विरोधकांची मागणी
Maharashtra Budget Session 2023 Update : अंगणवाडी सेविका वेतन वाढीसाठी विरोधकांकडून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. 15000 हजार रुपये पगारवाढ करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.अंगणवाडी सेविका मानधन वाढ
Maharashtra Budget Session 2023 Update : अंगणवाडी सेविकांबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मोठी माहिती दिली आहे. अंगणवाडी सेविका मानधन वाढ अर्थसंकल्प अधिवेशनात होईल, असे ते म्हणाले. 20 टक्के पगार वाढ केली जाणार आहे. तसेच मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविका भरती करणार आहोत.अंगणवाडी सेविकांबाबत मोठी बातमी
Maharashtra Budget Session 2023 Update : अंगणवाडी सेविकांबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मोठी माहिती दिली आहे. 20 टक्के पगार वाढ केली जाणार आहे. तसेच मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविका भरती करणार आहोत. तसेच अंगणवाडी सेविका यांच्यासाठी मोबाईल खरेदी करण्साचा 150 कोटी खर्च केले जाणार आहे. तर मनपा क्षेत्रात 200 कंटेनर अंगणवाडी सेविका सुरु करत आहोत. अंगणवाडी भाड्डेदर वाढवला जाणार आहे, अशी माहिती लोढा यांनी दिली.
Maharashtra Budget Session 2023 Update : विधानसभेत महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक 2023 आज मांडले जाणार आहे. मुंबईत देवेन भारती पोलिस आयु्कत पर्यायी नियुक्त संदर्भात हे विधेयक आहे. यावरून विधानसभेत आज सत्ताधारी विरू्दद विरोधक असा वाद होऊ शकतो. मुंबई पोलिस आयु्कत पद फणसाळकर असताना भारती यांना सारखेच पद नियुक्ती केली. भारती यांच्या नियुक्तीवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Budget Session 2023 Updates : राज्यातील उद्योगधंदे बाहेर गेल्याप्रकरणी कोण जबाबदार यासंदर्भात माहिती देणारी श्वेतपत्रिका लवकरच काढण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत विधिमंडळात ही श्वेतपत्रिका काढली जाईल. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात विधानसभेत घोषणा केलीय. तसंच वेदांत फॉक्सकॉन, एअरबस आणि बीडीपी बे तीन प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात गेलेले नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. उद्योग विभागाच्या पुरवणी मागण्यांना उत्तर देताना त्यांनी माहिती दिली.
Maharashtra Budget Session 2023 Updates : विधीमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस गाजण्याची शक्यता आहे. शेतकरी, वीज प्रश्नावर विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. (Maharashtra Budget Session) आजचा दिवसही विरोधकांच्या आंदोलनानं गाजणार आहे. शेतकऱ्यांच प्रश्न, वाढीव वीज दर आणि महागाई यावरती विरोधक आक्रमक राहाणारेत. राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आज यावर मुख्यमंत्री उत्तर देणारेत. या चर्चा करताना विरोधी पक्षाच्या आमदारांनी अनेक आरोप केले आहेत. यावर मुख्यमंत्री उत्तर देतील.