Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय, 7 आणि 8 तारखेला विशेष अधिवेशन

तेजश्री गायकवाड Thu, 05 Dec 2024-7:52 pm,

Maharashtra New Chief Minister Shapath Vidhi LIVE Updates: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अखेर सत्तास्थापनेचा तिढा सुटला आहे. आज 5 डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारस्थापनेसह महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या नेृतृत्त्वातील नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा दक्षिण मुंबईतील आझाद मैदान इथं पार पडणार आहे. शपथविधी ते अन्य महाराष्ट्रातील घडामोडीचा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.

Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates:  विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अखेर सत्तास्थापनेचा तिढा सुटला आहे. आज 5 डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारस्थापनेसह महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या नेृतृत्त्वातील नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा दक्षिण मुंबईतील आझाद मैदान इथं पार पडणार आहे. शपथविधी ते अन्य महाराष्ट्रातील घडामोडीचा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या. 

Latest Updates

  • Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: कॅबिनेट बैठकीत 16 विषयांवर चर्चा

    देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते आझाद मैदानावरून थेट मंत्रालयात आले. मंत्रालयातील 7 व्या मजल्यावर येऊन त्यांनी पहिली मंत्रीमंडळ बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

  • Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय, 7 आणि 8 तारखेला विशेष अधिवेशन

    मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय. 7 आणि 8 तारखेला विशेष अधिवेशन होणार. 9 तारखेला राज्यपालांचं अभिभाषण होणार तर अधिवेशनात आमदारांचा शपथविधी होणार. 

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कॅबिनेट बैठक सुरु

    मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत कॅबिनेट बैठक सुरु. कॅबिनेट बैठकीनंतर फडणवीस-शिंदे आणि अजित पवार पत्रकार परिषद घेणार. 

  • Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात दाखल

    मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच मंत्रालयात दाखल. 

  • Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: फडणवीसांनी थपथ घेताच नागपुरात जल्लोष

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर नागपुरात जल्लोष. 

  • Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. 

  • Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: एकनाथ शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. 

  • Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: 'मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस...', राज्यात नवीन सरकार स्थापन

    महाराष्ट्रात 'देवेंद्र पर्व', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. 

  • Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी आझाद मैदानावर दाखल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात शपथविधी सोहळयाला सुरुवात होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. 

  • Maharashtra New CM Oath Ceremony LIVE:  देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आझाद मैदानावर दाखल

     देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आझाद मैदानावर दाखल. देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. 

  • Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: नरेंद्र मोदी थोड्याच वेळात पोहचणार

    महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात आझाद मैदानावर दाखल होणार आहेत. 

  • महायुतीचा भव्य शपथविधी सोहळा पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

  • Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांची हजेरी

    शपथविधी सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे. ज्यामध्ये अभिनेता सलमान खान, संजय दत्त, रणवीर सिंग, शाहरुख खान अशा अनेक कलाकार शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत. 

  • Maharashtra CM Swearing-in Ceremony : शपथविधी सोहळ्याला राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटीही उपस्थित

     महायुतीचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली आहे. 

  • देवेंद्र फडणवीस, शिंदे-अजित पवार थोड्याच वेळात घेणार शपथ

    महायुतीचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार  उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. 

  • अमित शाहांची महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक 

    महायुती सरकारचा आज आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. अशातच शपथविधीपूर्वी अमित शाहांची महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. 

  • एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार : उदय सामंत

    महायुतीमधील तिढा संपला. दबावाचं कोणतंही राजकारण नव्हतं.  एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहेत. 

  • गृहमंत्री अमित शाह मुंबई विमानतळावर दाखल 

    आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीसाठी गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. 

  • शिवसेनेचे शिष्टमंडळ सागर बंगल्यावर दाखल 

    शिवसेनेचे एक शिष्टमंडळ म्हणजेच भरत गोगावले ,उदय सामंत ,रवी फाटक व संजय शिरसाठ हे सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.  

  • एकनाथ शिंदे शपथ घेतील अशी खात्री, गिरीश महाजन

    एकनाथ शिंदे आज शपथ घेतील अशी खात्री आहे. ते नाराज नाहीत अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे. 

  • सरकारच्या पत्रात एकनाथ शिंदेंचं नाव - सूत्र 

    सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

  • Uday Samant: आमचं राजकीय करिअर शिंदेंच्या हातात - उदय सामंत 

    Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं, अशी भावना उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. इतंकच नाही तर जर शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं नाही तर आम्ही कोणीही मंत्री होणार नाही. आमचं राजकीय करिअर शिंदेंच्या हातात असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

  • Chhagan Bhujbal: "अजित पवारांना अर्थखात मिळेल..."  छगन भुजबळांना खात्री 

     

    Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: 1985 साली निवडून आलो, तेव्हापासून मी विधनभवनात आहे.  परंतु एवढी मजोरीटी कधीच मिळाली नाही. पहील्यांदाच मिळाली आहे. अर्थात यामागे प्रधानमंत्री यांचा राज्याला असलेला सपोर्ट आहे. आम्हाला एवढं बहुमत मिळाले आहे की आता अशी शंका येत आहे की नियमानुसार विरोधी पक्षनेता होणार की नाही. प्रधानमंत्री येत आहे त्यामुळे वेळेचं बंधन आहे. महत्त्वाचे हे आहे की, कोणाला किती मंत्री कोणती खाती यावर अजूनही चर्चा सुरूच आहे. नंतर तक्रारी होईल त्यामुळे आता यावर चर्चा करणे गरजेचं आहे. या आठवड्यात इतर नेत्यांचे शपथविधी होईल.  मला नाही तस वाटतं की अर्थ खात्यासाठी शिंदे गटाची मागणी आहे. त्यांची मागणी गृह खात्यासाठी आहे. मला खात्री आहे अजित दादांना अर्थ खात देण्यात येईल. 

  • आज देवेंद्रजी आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल- शंभूराज देसाई

    Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: शंभूराज देसाई यांनी जनतेचे आभार मानत बोलले की " जनतेने महायुतीला प्रचंड बहुमत दिलं त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन आभार मानतो. आज देवेंद्रजी आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. शिवसेना आमदारांनी वर्षा बंगल्यावर भेटून साहेबांनी शपथ घ्यावी हा आग्रह धरला. आज पून्हा आम्ही जाणार आहोत. आमचा हक्क आहे आमच्या नेत्याकडे आग्रह करायचा. 

  • सागर बंगल्यात शपथविधी घेण्यापूर्वी गोमातेचे पूजन 

     

    Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: आज 15 व्या विधानसभेसाठी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शपथ घेणार आहेत.  या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या सागर बंगल्यावर गोमातेचे पूजन करण्यात येणार आहे. त्यासाठी सागर बंगल्यावर 2 गाई आणण्यात आल्या आहेत.

  • राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गुलाबी रंगाची निमंत्रण पत्रिका

    Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: राष्ट्रवादी अजित  पवार गटाकडून गुलाबी रंगाची निमंत्रण पत्रिका देण्यात आली आहे.  शपथविधी सोहळ्यासाठी पास म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांना गुलाबी रंगाची निमंत्रण पत्रिका पक्षाकडून देण्यात आली. प्रचारादरम्यान अजित पवार गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये पाहायला मिळत होते.  आता पक्षाची निमंत्रण पत्रिका देखील गुलाबी रंगाची करण्यात आली आहे. 

  • Amit Shah: अमित शहांचा शपथविधीनिमित्त आज मुंबई दौरा 

     

    Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा शपथविधीनिमित्त मुंबई दौरा आज होणार आहे. मुंबई विमानतळ 3.00 वाजता पोहचतील त्यानंतर ते सह्याद्री अतिथीगृह - 3:30 पर्यंत दाखल होती. यानंतर ते आझाद मैदानावर शपथविधीच्या वेळेनुसार पोहचतील. या आधी अमित शहा जवळपास 2 तास सहयाद्री अतिथीगृहात आहेत. त्यामुळे त्या वेळात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सोबत बैठक होण्याची शक्यता आहे. शपथविधी पूर्वी तिन्ही नेत्यांची अमित शहांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

  • मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी देवेंद्र फडणवीस मुंबादेवीच्या चरणी  

    Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) मुंबादेवीच्या दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुंबादेवीच्या दर्शनाला आहे आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह राहुल नार्वेकर, चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन हे देखील मुंबादेवीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहे. 

  • Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates:  देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात सिद्धिविनायक मंदिरात थोड्याच वेळात पोहचत आहेत,सिध्दीविनायक मंदिरात आमदार कालिदास कोळंबकर फडणवीसांच्या स्वागतासाठी पोहचले आहेत. 

     

  • शपथविधी आधी फडणवीस करणार देवदर्शन

    Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: आज सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) सकाळी  11:30 च्या सुमारास सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतील.  त्यानंतर ते मुंबादेवीचे दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. 

  • राज्यातील अनुलोम संस्थेचे कार्यकर्ते पुन्हा जोमात, कार्यकर्ते आज मुंबईला रवाना

     

    Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी राज्याच्या विविध भागातून अनुलोम संस्थेचे कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत प्रत्येक जिल्ह्यातून देवेंद्र फडणवीस यांचा छायाचित्र लावलेले गाड्या आपल्याला रस्त्यांवर ठिकठिकाणी दिसत आहेत या संस्थेने शासकीय विभागातील सर्वसामान्यांची कामे लवकर करून देण्याचा प्रयत्न केला आहे तसच भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून काम केले आहे . देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेली ही संस्था आता पुन्हा जोमाने सक्रिय झाली आहे

  • वर्षा निवासस्थान परिसरात फडणवीसांच्या अभिनंदनाचे बॅनर्स

     

    Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला परिसरात एका संघटनेतर्फे बॅनर बाजी करण्यात आली आहे. धर्मरक्षक,महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र चे मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन अशा आशयाचे बॅनर्स वर्षा बंगल्याच्या परिसरात लावण्यात आले आहेत. 

  • "दिल्ली सोबत पंगा घेण्याची हिम्मत..." संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर साधला निशाणा 

    Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: अनेक माजी मुख्यमंत्र्यात त्यांच्याच पक्षाचे आहेत. कमिशनचा फौजदार पार्त २ आज आझाद मैदानावर दिसेल. उद्धव ठाकरे जातील की नाही मी कस सांगू. मी दिल्लीत आहे. प्रोटोकॉलनुसार आमदार खासदार यांना निमंत्रण येतं, मला आल आहे असं समजा. एकनाथ शिंदे १०० टक्के उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. दिल्ली सोबत पंगा घेण्याची हिम्मत त्यांच्यात अजिबात नाही. आज तिघे शपथ घेतील, बाकीच्या शपथविधीला अजून वेळ जाईल. 

  • भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला हरवत रचला इतिहास

    Junior Asia Cup: ज्युनियर हॉकी आशिया चषक 2024 मध्ये भारतीय संघाने आपल्या दमदार खेळीने पाकिस्तानचा पराभव केला. भारताने पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली आहे. ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत भारत पाचव्यांदा  चॅम्पियन बनला आहे. भारताने चमकदार कामगिरी करत जेतेपदाच्या लढतीत पाकिस्तानचा पराभव केला.

    सविस्तर इथे वाचा > Junior Asia Cup: विजेतेपदाची हॅट्ट्रिक! भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला हरवत रचला इतिहास

  • "राज्याच्या परंपरेप्रमाणे आम्ही त्यांना..." संजय राऊतांनी शपथविधी सोहळ्यावर प्रतिक्रिया

     

    Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: फडणवीस शपथ घेत आहेत यावर प्रतिक्रिया द्याव अस काही नाही. राज्याचा निकाल धक्कादायक आला, त्यातून अजून राज्यातील जनता सावरलेली नाही. गावागावात मॉक पोल सुरू आहेत पण तिथे १४४ लागू केलं आहे. बहुमत असतानाही १३ दिवस मुख्यमंत्री शपथ घेऊ शकले नाही. अखेर आज आझाद मैदानावर फडणवीस शपथ घेत आहेत. राज्याच्या परंपरेप्रमाणे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.  राज्य लूट न होण्याची जबाबदारी तुमची असेल. मागच्या अडीच वर्षात राज्यातील संपत्तीवर दरोडे पडले. 

  • कल्याणकरांनी हातात घेतला झाडू 

    कल्याण पश्चिम काळातलाव येथील महानगरपालिका कचरा साफ करत नसल्याने नागरिकांनी कचरा साफ करून काळा तलाव च्या गेट बाहेर टाकला कचरा. महानगरपालिका कचरा साफ करत नसल्याने नागरिकांनी हातात घेतला झाडू .

  • बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर शांतता 

     

    Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. बारामतीत मात्र शांतता असून बारामतीकर मुंबईकडे रवाना झाले आहेत.  बारामती तालुक्यातील काटेवाडीतील अजित पवार यांच्या पवार फार्म या निवासस्थानासमोरून शांतात आहे. 

  • अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट जखमी,  मानेगाव येथील घटना

     

    Maharashtra: भंडारा जिल्ह्याच्या मानेगाव जवळील आभास रेस्टॉरंट जवळच्या राष्ट्रीय महामार्ग 53 ला काळविटाची जोडी रस्ता ओलांडत असतांना एका अज्ञात ट्रॅकने नर काळवीटला धडकल्याची घटना घडली असून त्याला उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेल्यात आले. 

  • राज्यातील 9 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी

    Maharashtra Weather Forecast: राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील एकूण 9 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

  • शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी, शाहा ते उद्धव ठाकरेसह कोणाकोणाला मिळाले निमंत्रण? 

    Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांसह 19 राज्याचे मुख्यमंत्री  उपस्थित राहणार आहेत. याशिवाय साधू-संत आणि लाडक्या बहिणींनाही निमंत्रण मिळाले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनाही  शपथविधीसाठी आमंत्रण मिळायची माहिती मिळत आहे. 

  • महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला नाशिकचे साधू महंत लावणार हजेरी

     

    Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: मुंबईच्या आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या रंगणार्‍या ऐतिहासिक सोहळ्यात, राज्य शासनानं त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या अनेक साधू-संतांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केलं आहे. रामकृष्ण महाराज लहवितकर, महंत भक्तिचरणदास, महंत गणेशानंद सरस्वती, महंत रमणगिरी महाराज, माधवदास राठी, ह.भ.प. संजय धोंडगे, महंत सुधीरदास पुजारी, स्वामी संविदानंद सरस्वती, कांचनताई जगताप अशा मान्यवरांचा समावेश आहे. 

  •  एकनाथ शिंदे आज घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ? शपथविधी सोहळ्याला राहणार उपस्थित 

    Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: काल शिवसेना मधील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढली असून आपण सत्तेत असले पाहिजे या आमदारांच्या मतांशी शिंदे यांनी सहमती दाखवली आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्याच बरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतही जी चर्चा झाली ती सकारात्मक झाली अशी खात्रीपूर्वक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

  • Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपद किती जणांना? 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत २० जणांनी मुख्यमंत्रीपद भूषविले असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यातील सात जणांना एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

    एकापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणारे नेते

     

    • शरद पवार (४ वेळा)

    • वसंतराव नाईक (३ वेळा)

    • वसंतदादा पाटील (३ वेळा)

    • शंकरराव चव्हाण (२ वेळा)

    • अशोक चव्हाण (२ वेळा)

    • विलासराव देशमुख (२ वेळा)

    • देवेंद्र फडणवीस (आता तिसन्यांदा) 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link