Junior Hockey Team Ind Vs Pak: ज्युनियर हॉकी आशिया चषक 2024 मध्ये भारतीय संघाने आपल्या दमदार खेळीने पाकिस्तानचा पराभव केला. अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. भारताने पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली आहे. ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत भारत पाचव्यांदा चॅम्पियन बनला आहे. भारताने चमकदार कामगिरी करत जेतेपदाच्या लढतीत पाकिस्तानचा पराभव केला.
2024 पूर्वी भारताने 2004, 2008, 2015 आणि 2023 मध्ये ज्युनियर हॉकी आशिया चषक हे विजेतेपद पटकावले होते. आता पुन्हा एकदा टीम इंडियाने पाचव्यांदा जेतेपद पटकावले आहे. या सामन्यात पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. मात्र भारताने जोरदार पलटवार केला आणि पाकिस्तानी संघ पुनरागमन करण्यात अपयशी ठरला. पाकिस्तानने तिसऱ्याच मिनिटाला पहिला गोल केला पण अरजित हुंदलने पाकिस्तानी संघावर मात केली. त्याने काही सेकंदातच पाकिस्तानची आघाडी संपुष्टात आणली.
हे ही वाचा: Sachin vs Virat: सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात श्रेष्ठ कोण? सुनील गावस्करांचे उत्तर एकदा ऐकाच
पहिल्या गोलनंतरही अरजित हुंदल थांबला नाही, त्याने दुसऱ्या हाफमध्ये पुन्हा एकदा गोल करत ब्लू आर्मीला आघाडी मिळवून दिली. यानंतर दिलराज सिंगनेही वाहत्या गंगेत हात धुवून तिसरा गोल करून पाकिस्तानवरचे दडपण दुप्पट केले.
हे ही वाचा: IND vs AUS: क्रिकेट विश्वात शोककळा...भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान 'या' महान फलंदाजाचे निधन
ASIAN CHAMPIONS!
What a night for Indian hockey!
Team India lifts the Men’s Junior Asia Cup 2024 trophy after a thrilling win over Pakistan.
A display of passion, skill, and determination that will be remembered for years to come.Here’s to the champions who made the… pic.twitter.com/wOL2DeuTai
— Hockey India (@TheHockeyIndia) December 4, 2024
3-1 अशा पिछाडीनंतरही पाकिस्तान संघ मागे हटला नाही. सुफियान खानने 30व्या आणि 39व्या मिनिटाला दोन पेनल्टी गोल करत सामन्यात टीमला जीवदान दिले. पुढील 8 मिनिटे संघ बरोबरीत राहिल्याने सामन्याने रोमांचक वळण घेतले होते. मात्र अरजित हुंदलने पुन्हा एकदा चौथा गोल करत भारताला आघाडीवर नेले. त्यानंतर पाकिस्तानला पुनरागमन करण्यात अपयश आले आणि 54व्या मिनिटाला भारताकडून आणखी एक गोल झाला. यासह भारताने ५ वे विजेतेपद पटकावले.