Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: मुख्य निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी, महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्याचा निषेध
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 8 पदाधिकाऱ्यांवर कारवाई
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: राज्यात विधानसभा निवडणुकांमुळं राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील घडामोडींचा सविस्तर आढावा एका क्लिकवर
Latest Updates
मुख्य निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी, महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्याचा निषेध
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्याचा निषेध केला आहे. सोबतच अधिकाऱ्यांनी उल्लंघन करणाऱ्यांशी कठोरपणे वागण्याचे दिले निर्देश.
सीईसी कुमार यांनी निवडणूक प्रचारादरम्यान महिला नेत्यांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध केला. सोबतच चिंता व्यक्त केली की महिलांच्या प्रतिष्ठेच्या आणि सन्मानाच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी महिलांच्या सन्मानाला आणि प्रतिष्ठेला विरोध करणारे असे कोणतेही कृत्य/कृती/उच्चार टाळावेत,असे आवाहन केले.
इतर पक्षांच्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर वक्तव्य देवू नये सोबतच विरोधी उमेदवाराबाबत अपमान करण्यासाठी खालच्या पातळीवरील वैयक्तिक हल्ले करू नयेत असा सल्ला दिला.
पूजा खेडकर प्रकरणात सुनावणी टळली
दिल्ली हायकोर्टातील सुनावणी टळली. पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीन संदर्भात होणार होती सुनावणी. यापूर्वी दिल्ली हायकोर्टानं पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण दिलं होतं. चीफ जस्टीस यांच्या निवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे सुनावणी होऊ शकली नसल्याची माहिती.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 8 पदाधिकाऱ्यांवर कारवाई
महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण 8 पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कारवाई करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याने 8 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं.
1) बापू भेगडे, प्रदेश उपाध्यक्ष
2) कृष्णा अंधारे, जिल्हाध्यक्ष अकोला ग्रामीण
3) विश्वंभर पवार, जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर
4) श्रीमती पूजाताई व्यवहारे, महिला जिल्हाध्यक्ष नांदेड
5) ज्ञानेश्वर भामरे , माजी जिल्हा परिषद सदस्य
6) ममता शर्मा, दहिसर तालुकाध्यक्ष मुंबई
7) नरेंद्र तुरकर, तुमसर तालुकाध्यक्ष
8) आनंद सिंधीकर, युवक प्रदेश सचिव, नांदेड
अमरावती देवेंद्र फडणवीस.....
- रवी भाऊंचा प्रचार करण्याची गरज नाही कारण त्यांचं कामच बोलते. ते जनतेच्या मनामध्ये आहेत, तिच्या नदीच्या मनामध्ये असतात त्यांनाच मतं मिळतात देवेंद्र फडणवीस यांची रवी राणांवर स्तुतीसूमने.
- महाराष्ट्रात अकरा लाख महिलांना लखपती दीदी केलं, येणाऱ्या काळात एक कोटी महिलांना लखपती दीदी करू.
- महिलांना अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणायचे आहे.
- मुलीच्या जन्म झाला तर त्याचं स्वागत झालं पाहिजे.
- मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.
नरेंद्र मोदींचं नाशिकमध्ये भाषण -
काँग्रेस विकासात अडचण निर्माण करतं
आयटी पार्क नाशिकमध्ये रोजगार निर्माण करणारे
नाशिकमध्ये डिफेन्स व्यवसाय विकास करतोय
मिग सुखोई तयार करतोय याचा नाशिककरांना अभिमान आहे
काँग्रेसने डिफेन्स व्यवसाय वृद्धी थांबविण्याचा प्रयत्न करतेय
शेतकऱ्यांना मिळणारी 12 हजारांची मदत 15 हजार करणार
काँग्रेसने 75 वर्ष बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लागू करू दिले नाही
हे पाप काँग्रेसचे होते आर्टिकल 376 ची भिंत बांधून बाबासहेबाना काश्मीर मध्ये घुसू दिले नाही
मात्र आम्ही आर्टिकल रद करून बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे
काँग्रेसने पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा गोंधळ सुरू केलाय
त्यांना पुन्हा बाबासाहेब यांचं संविधान आणि आरक्षण काढून घ्यायचे आहे
'वाघाचं कातडं पांघरल्याने कोणी लांडगा वाघ होत नाही'
वाघाचं कातडं पांघरल्याने कोणी लांडगा वाघ होत नाही. योजना राबवण्यासाठी आणि पैसे आणण्यासाठी मनगटात बळ असावं लागतं. तानाजी सावंत यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नावं न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
मराठवाड्याच्या हक्काचं 7 टीएमसी पाणी गुढीपाडव्याला सिना कोळेगाव धरणात पडणार म्हणजे पडणारच - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News : साताऱ्यात अमित शाह यांची सभा होती. यावेळी त्यांनी अग्निविर आणि 370 कलम यावर वक्तव्य केलं. 'गेल्या वेळची चूक सुधारा आणि यावेळी अतुल भोसले यांना निवडून आणा. साताऱ्याच्या मातांना प्रणाम करतो कारण देश सेवेसाठी त्यांनी अनेक पुत्र दिले. 1 रँक 1 पेन्शन मोदी साहेबांनी दिलं, अग्निविर चांगले वीर घडवण्याचा प्रयत्न आहे. राहुल गांधींवर तुमचा सारखी खोटी आश्वासने नरेंद्र मोदींची नसतात. या पवित्र भूमीत येवून मला सांगायचे आहे की भाजपने जे संकल्प केले ते पूर्ण केले. अयोध्येत राममंदिर उभारून प्राण प्रतिष्ठान केली. 370 कलम हटविण्याचं काम केलं.'
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: राज ठाकरे यांची रत्नागिरीत सभा सुरु होती त्यावेळी त्यांनी काही मुद्द्यांवर चर्चा केली आहे. निवडणूक लढवण्यापासून पर्यटनापर्यंत अनेक गोष्टींवर त्यांनी वक्तव्य केलं. राज ठाकरे म्हणाले, "किती वर्ष त्याच विषयावर निवडणूक लढवणार, निवडून दिलेल्या माणसाला प्रश्न विचारला पाहिजे. नुसत्या टुरिझम वर हे तीन जिल्हे महाराष्ट्र पोसू शकतात. एका पर्यटन या विषयावर गोवा सुरु आहे. तर खासदार दिल्लीत जाऊन काय करतात? राजकारणी फक्त गुंतलेत पक्ष फोडाफोडीचे राजकारणात, पत्रकारांची धार बोठट झालेली आहे. एक काळ होता जेव्हा पत्रकारांना राजकारणी घाबरायचे."
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: स्वतःऱ्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याचे गांधींनी ठरवले होते, कारण त्यांना माहित होतं की हे पुढे चालणार नाही. जम्मू कश्मीरमधे काँग्रेसच्या शासनात संविधान लागू नव्हते, एक संविधान लागू करण्याचे काम भाजपणे केलं. आर्टिकल 370 काँग्रेसनं निर्मण केलेली समस्या भाजपानं सोडवली, लक्षात ठेवा काँग्रेस सहयोगी पक्षांसोबत सत्तेत आल्यावर जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा आर्टिकल 370 लागू करण्याचे कामं केलं. काश्मीर तोडण्याचे कामं करीत आहे, भाजप आमदारांनी याला विरोध केला तर त्यांना सभागृहाबाहेर काढून टाकण्यात आलं.
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: बिरसा मुंडे यांची जयंती वर्षभर साजरी करणारः PM मोदींची घोषणा
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: आदिवासी समाज मोठा आहे, या समाजासाठी देशाच्या स्वातंत्र्यात स्थान राहिले आहे, पण काँग्रेसने त्याकडे लक्ष दिले नाही. जेव्हा अटल बिहारी सरकार आले तेव्हा आदिवासी मंत्रालय स्वतंत्र केले. तेव्हा आदिवासी समाजाला न्याय मिळाला. बिरसा मुंडे यांची जयंती वर्षभर साजरी करणार. एकलव्य निवासी विद्यालय बनवत आहोत, अशा घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केल्या आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: केंद्राच्या प्रत्येक योजनेच्या केंद्रस्थानी महिला: PM मोदी
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: युती सरकार केंद्राप्रमाणे महिला सशक्तीकरणाचे कामं करीत आहे. महाराष्ट्र पोलीसमध्ये 25 हजार महिला भरतीमुळे महिला सामर्थ्य वाढेल, सुरक्षा वाढेल, रोजगार मिळेल. महिलसाठीचे युतीचे कामं आघाडीला सहन होतं नाही, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: मागच्या विधानसभेत येऊन गेलो त्यावेळी राज्याच्या जनतेने भाजपाला विजयी केले होते. आता पुन्हा धुळ्यात आलो आहे, येथूनच प्रचाराची सुरुवात करीत आहे. महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला जनतेचा आशीर्वाद पाहिजे, विश्वास देतो गेल्या अडीच वर्षात जी विकासाला गती मिळाली आहे तिला थांबू दिले जाणार नाही. येत्या पाच वर्षात राज्याला सुशासन महायुती देऊ शकते, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: मविआत ड्रायव्हरच्या सीटवर बसण्यावरुन वाद; PM मोदींचा टोला
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: महाविकास आघाडीच्या गाडीला ना ड्रायव्हर ना चाक. लोकांना लुटणारे महाआघडीचे लोक, धोक्याने बनलेल्या सरकारचे अडीच वर्ष पहिले आहेत, आधी सरकार लुटले आणि शेवटी लोकांना लुटायला लागले होते.
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: धुळ्यातून पंतप्रधान मोदींच्या प्रचारसभेला सुरुवात
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या प्रगतीला गती मिळाली. जनतेला लुटणारे महाविकास आघाडीसारखे लोक सत्तेत आले तर ते विकास थांबवून ठेवतात, अशी टीका मोदींनी केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: महाराष्ट्रानं मला खूप आशीर्वाद दिलेतः पंतप्रधान मोदी
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात. ग्रामदैवत एकविरा देवीला नमन करीत राम राम म्हणत भाषणाला सुरुवात
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: 10 लाख रोजगाराच्या संधी लाडाक्या भावाना देत आहोत, विकासाला देत आहोत, विरोधक वोट जिहाद करीत आहेत, असा दावा फडणवीसांनी केला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: धुळे जिल्हा महाराष्ट्रातील नंबर एकचा जिल्हा होणारः देवेंद्र फडणवीस
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: धुळे जिल्हा महाराष्ट्रातील नंबर एकचा जिल्हा होणार आहे. तसंच, धुळे जिल्हाल्या 6 राष्ट्रीय महामार्ग दिले. धुळे जिल्हा 100 टक्के निकाल देणार, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: पंतप्रधान मोदी धुळ्यातील सभास्थळी दाखल
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: धुळ्यात पंतप्रधान मोदींची पहिलीच सभा आहे. नरेंद्र मोदी धुळ्यातील सभास्थळी दाखल झाले आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: प्रा. लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणात 10 जणांना कंधार पोलीसांनी घेतले ताब्यात
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: सहायक पोलिस निरीक्षकाच्या तक्रारीवरुन 30 जणांवर गुन्हा दाखल. गैर कायद्याची मंडळी जमवून उमेदवाराचे वाहन थांबवले. पोलीस कर्मचाऱ्याशी झटापट करुन जखमी केले. पोलीसांशी वाद घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: कोपरगावात अपक्ष उमेदवाराचा प्रचार पॅटर्न ठरतोय चर्चेचा विषय
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: एकीकडे अनेक उमेदवारांकडून हायटेक प्रचार यंत्रणा राबवली जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराचा प्रचार पॅटर्न चर्चेचा विषय ठरतोय.. संजय भास्कर काळे या अपक्ष उमेदवाराला कचरापेटी चिन्ह मिळाले असून त्यांनी अनोख्या पद्धतीने आपला प्रचार सुरू केलाय
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: अमित ठाकरे यांनी दादर समुद्र किनारा केला स्वच्छ
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: छटपूजन निमित्त अनेक भाविक समुद्रकिनारी पूजा करतात. पूजा झाल्यानंतर या ठिकाणी निर्माल्यावर इतर वस्तू पडलेल्या असतात. याची सफाई करण्यासाठी माहीम विधानसभा मतदार संघाचे मनसे उमेदवार अमित ठाकरे आपल्या विद्यार्थी मनसे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दादर बीच वर साफसफाई केली. यावेळी अमित यांच्या पत्नी मिताली ठाकरे सोबत आहेत
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: नालासोपार्यात एटीएम व्हॅनमध्ये आढळले साडेतीन कोटी रुपये
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: नालासोपारा एसटी आगाराजवळ गुरूवारी दुपारी एका एटीएम व्हॅनमध्ये साडेतीन कोटी रुपयांची रोकड आढळली आहे. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने ही रोकड असलेली व्हॅन जप्त केली असून एवढी रक्कम कुणासाठी आणली त्याची चौकशी सुरू आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: ईडीपासून बचाव करण्यासाठी पक्ष सोडून गेलेः संजय राऊत
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: ईडीला घाबरून पक्ष सोडून गेले. ईडीचा दबाव हे पक्षफोडीमागे मुख्य कारण, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: नवी मुंबई पामबीच मार्गावर कारच्या अपघातात एकाचा मृत्यू
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: बेलापूर येथुन पामबीच मार्गे ऐरोली येथे जाणाऱ्या रेनॉल्ट क्विड कारला पाठीमागून भरधाव थार गाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार चालकाचा मृत्यू तर त्याची पत्नी व 4 वर्षीची मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे पामबीच मार्गावर नेरुळ येथील सारसोळे येथे घडली. या अपघातानंतर पळून गेलेल्या थार कार चालकाला नेरुळ पोलिसांनी सकाळी अटक केली आहे. या अपघातातील थार कार चालकाने मद्यदुंध अवस्थेत रेनॉल्ट क्विड कारला धडक दिल्याचे आढळुन आले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: जळगावात 25 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: जळगाव शहरातील शनिपेठ भागात एका व्यक्तीकडून 25 लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली असून गस्ती दरम्यान पोलिसांना सदर व्यक्तीच्या हालचाली संशयित वाटल्याने पोलिसांनी सदर व्यक्तीची चौकशी केली असता एका बॅगमध्ये सदर व्यक्तीकडे 25 लाख रुपये रोख रक्कम आढळून आली. सदर रकमेबाबत कुठलाही पुरावा सादर न केल्यामुळे पोलिसांनी या व्यक्तीस ताब्यात घेतले असून प्रमोद हिरामण पवार असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान सदर व्यक्तीकडे एवढी रक्कम कुठून आली याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू असून दुसरीकडे मात्र एका बड्या नेत्याची ही रक्कम असल्याची चर्चा आहे
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: जालन्यात 52 लाख रुपये जप्त
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: जालना : स्थानिक गुन्हे शाखेची एका अज्ञात वाहनावर कारवाई. 52 लाख रुपये जप्त केले असून शहरातील किरण पेट्रोल पंपाजवळील घटना आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: धुळ्यात पंतप्रधान मोदींच्या सभेची जय्यत तयारी
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळे शहरातून करणार आहेत. धुळे शहरातील दसरा मैदान येथे त्यांची सभा संपन्न होणार असून, दुपारी बारा वाजेला पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळे शहरात येतील. या ठिकाणी सभेला एक लाखांपेक्षा अधिकचा जनसमुदाय असेल असा दावा आयोजकांनी व्यक्त केला आहे. तर 3000 पेक्षा अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सहा विधानसभा मतदारसंघांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी धुळ्यात येत आहेत. धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, शिरपूर, शिंदखेडा आणि मालेगाव ग्रामीण या मतदार संघाच्या प्रचारासाठी मोदी हे आज सभा घेत आहेत
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाराशिव जिल्ह्यात आज तीन सभा
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज धाराशिव जिल्ह्यात तीन सभा असणार आहेत. आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या भूम परंडा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिली सभा घेणार आहेत. ही सभा आत्तापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक सभा असणार असून मुख्यमंत्र्यांची धाराशिव जिल्ह्यातील सभा म्हणजे विजयाची नांदी आहे असा दावा आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केला आहे. दुपारनंतर धाराशिव व उमरगा या दोन मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा सभा होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर धाराशिव जिल्ह्यात सभांचा धडाका सुरू होणार आहे
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: अलिबागमध्ये महाविकास आघाडीतील तिढा सुटला
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: अलिबाग मतदार संघात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यातील तिढा सुटला आहे. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मनोमिलन झाले आहे. शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग मधील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली. यावेळी शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले. अलिबाग मध्ये जसा आम्ही शेकापला पाठींबा देत आहोत तसा शेकापने पेण मध्ये शिवसेनेला पाठींबा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: पूजा खेडकरविरोधात युपीएससी आणि दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळला जावा अशी मागणी केली आहे. पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण होईपर्यंत दरवेळी पुढील तारखेपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण मिळते आहे
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा आज महाराष्ट्र दौरा
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यातील महत्त्वाच्या शहरांत जाहीर सभा होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा
दुपारी 12 वाजता - धुळे
दुपारी 2 वाजता - नाशिक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सभा
शिराळा विधानसभा
सकाळी 11:00 वाजता..
स्थळ - विश्वासराव नाईक कॉलेज मैदान, शिराळा, सांगलीकराड दक्षिण विधानसभा
दुपारी: 12. 30
स्थळ - आदर्श विद्यामंदिर, कराड, सातारासांगली विधानसभा
दुपारी - 02:15 वाजता
स्थळः डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, खणभाग, सांगलीइचलकरंजी विधानसभा
संध्याकाळी - 04:15 वाजता
स्थळ: व्यंकोबा मैदान चौक, कोल्हापुरMaharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: ठाण्यात ९३३ मतदारांना करायचंय घरातूनच मतदान
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: विधानसभा निवडणुकीत ८५ वर्षांपेक्षा जास्त वयोमानाचे ज्येष्ठ मतदार व दिव्यांग असे ९३३ जण यावेळी घरून मतदान करणार आहेत. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात ८०१ ज्येष्ठ मतदार व दिव्यांगांनी घरून मतदान केले होते. या योजनेची जनजागृती होत असल्याने घरून मतदान करणाऱ्यांची संख्या ठाणे जिल्ह्यात १३३ने वाढली. ज्या मतदारांनी वेळेत 'फॉर्म १२ डी' भरून दिला त्यांना घरून मतदानाची संधी मिळाली.