नागपूर : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर  लॉकडाऊन लागणार का अशा चर्चांना उधान आले आहे. त्यामुळे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले आहेय


 राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लॉकडाऊन नाही परंतु कठोर निर्बंध लागू शकतात. तसेच मुंबईतील लोकल ट्रेन बंद होणार नाही, परंतु गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. असे मंत्री वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
 
नागपूरमधील कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन कमी पडले का? या प्रश्नाला उत्तर देताना, वडेट्टीवार यांनी मान्य केले की, आमचा अंदाज चुकला. नवा स्ट्रेनचा अचानक मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे. यात २५ वर्षाखालील मुला मुलींचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे नागपूरात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी योग्य ते सर्व पाऊले सरकार उचलत असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
 
नागपूरमधील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उपययोजनांसाठी ६५ कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नागपूर आणि राज्यामध्ये रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लोकांनी रक्तदानासाठी पुढे येणं गरजेचं असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.