परभणी : लोकसभा निवडणूक २०१९ च्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या १० मतदारसंघात मतदान सुरू आहे. या दरम्यान परभणीत काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. परभणीतल्या शिवडी मतदान केंद्रावर पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्याचा परिणाम काही काळ मतदान प्रक्रियेवर पाहायला मिळाला.


पोलिसांच्या गाडीवर दगडफेक

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतदान प्रक्रिया सुरू असताना पोलिसांनी शंभर मीटर हद्दीत सुरू असलेलं किराणा दुकान कारवाई करत बंद केल्यावरून वाद सुरू झाला आणि थोड्याच वेळात या वादाचं रुपांतर दगडफेकीत झालं. शिवडी मतदान केंद्रवार काही जणांनी पोलिसांच्या गाडीवर केली दगडफेक केली. यानंतर मानवत तालुक्यातील शिवडीत तणावाचं वातावरण तयार झालं. 


पोलिसांच्या गाडीवर दगडफेक

परंतु, परिस्थिती व्यवस्थितरित्या हाताळत इथं मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात पोलिसांना यश आलंय.