Navneet Rana vs Balawant Wankhade Education Details: लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात अनेक महत्वाच्या लढती आहेत. दरम्यान अमरावती लोकसभा मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. येथे महायुतीकडून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही उमेदवारांसाठी राज्यातील मोठे नेते रिंगणात उतरले आहेत. दुसरीकडे नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध करत बच्चू कडूंनीदेकील उमेदवार उभा केला आहे. प्रहार संघटनेकडून दिनेश बूब यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल इतकं मात्र नक्की. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकीला उभे राहण्यापुर्वी उमेदवार स्वत:बद्दलची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करत असतो. त्यामुळे उमेदवारांची संपत्ती किती? शिक्षण किती? त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत का? अशी सर्व माहिती मतदारांना मिळते. ही माहिती सर्वांसाठी खुली असते. माय नेता वेबसाइटवर तुम्ही ही माहिती वाचू शकता. 
दरम्यान भाजपच्या नवनीत राणा आणि कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांच्यात कोण जास्त शिकलंय, तुम्हाला माहिती आहे का?


भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या दहावी उत्तीर्ण आहेत. त्यांनी मार्च 2002 मध्ये दहावी दिली. मुंबईतील कर्तिका हायस्कूलमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. मायनेता वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार नवनीत राणा यांच्यावर आयपीसी कलम 420, 468, 471 आणि 34 अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.


'काय लायकी...' नवनीत राणांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर


बळवंत वानखडे यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भरघोस पाठींबा मिळतोय. ते बारावी उत्तीर्ण आहेत. त्यांनी अमरावीतील दर्यापूरच्या डीपीएस कॉलेजमधून शिक्षण घेतले. 1991 मध्ये त्यांनी बीएला प्रवेश घेतला. ते बीए अनुत्तीर्ण आहेत. 


प्रहार संघटनेचे दिनेश बूब हे बारावी उत्तीर्ण आहेत. त्यांनी संत गाडगेबाबा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या केशरबाई लाहोटी कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. 1992-93 साली त्यांनी बारावी केली. 1989-90 मध्ये मणिबाई गुजराती हायस्कूलमधून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 


माफी मागतो! 5 वर्षापूर्वी माझ्याकडून एक चूक झाली- भरसभेत असं का म्हणाले शरद पवार?