Navneet Rana On Sanjay Raut Statement: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणा यांचा नटी म्हणून उल्लेख केला होता. यानंतर संजय राऊत यांच्यावर चहुबाजूने टीका करण्यात आली होती. दरम्यान नवनीत राणा यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले. यावेळी नवनीत राणा यांनी 'लायकी काय...' असा उल्लेख केलाय. कोणीही आपल्या सुनेवर येऊन बोट दाखवत असेल तर तुम्ही सहन करणार का? असा प्रश्न नवनीत राणा यांनी अमरावतीकरांना विचारला. आमच्यावर टीका करणाऱ्यांची काय लायकी आहे? असे म्हणत त्यांनी राऊतांवर टीका केली.
शेतकरी अजूनही पांदण रस्त्यासाठी लढतो आहे, असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्ह्यासाठी 3 गोष्टी मागितल्या. घर, रोजगार आणि पांदण रस्ते या 3 गोष्टी आम्हाला द्या अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. या मतदार संघातील प्रत्येक प्रश्न मी पोटतिडकीने मांडत असल्याचे त्या म्हणाले. या मतदारसंघात पहिल्यांदा कमळ आलं असल्याचे त्या म्हणाल्या. 26 तारखेला भरपूर लग्न आहेत. लग्न उद्या होईल पण मतदान करणे गरजेचे असल्याचे आवाहन नवनीत राणांनी केले.
ही जिल्हा परिषद किंवा नगर परिषद तसेच विधान सभेची निवडणूक आहे. भारताचे आणि देशाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे. नवनीत राणा यांच्या नावासमोरील कमळाचे बटण दाबले की थेट मोदींना मत मिळते. पंजाचे बटण दाबले की राहुल गांधी यांना मत मिळते. तुम्हाला पंतप्रधान कोण पाहिजे तुम्ही ठरवा, असे ते म्हणाले. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे पण त्यांना कोणी इंजिन मानायला तयार नाही. ममता, स्टॅलिन, शरद पवार हे सुद्धा स्वतःला इंजिन म्हणत आहे. त्यामुळे त्यांच इंजिन हालत नाही डुलत नाही त्यामुळे तुम्ही कोणाच्या इंजिन मध्ये बसणार आहात? असा प्रश्न त्यांनी विचारला.
मोदींच्या इंजिनला नवणीत राणा यांचा डब्बा लागला पाहिजे. देशाला पुढे न्यायचं असेल तर माता भगिनींना उभे करावं लागेल. मंचावर सध्या महिला कमी आहेत. यापुढे अस चालणार नाही. महिलांना आता पुढे आणावं लागणार असल्याचे ते म्हणाले. सोयाबीन आणि कापसाचा शेतकरी अडचणीत आला. 4 हजार कोटींचा मोबदला शेतकऱ्याला मिळाला आहे. काँग्रेसचे उमेदवार सध्या इथले आमदार आहेत. ते विधान सभेत कधी दिसले नाही त्यांनी कधी विधान सभेत तोंड उघडले नाही, असे ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करणार असल्याचे मी म्हटल्याचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला. आधी हे ठरवा मी सांगितलं होतं की अमित शहा यांनी सांगितलं होतं? असा उलट प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. उद्धव ठाकरे सध्या भ्रमिष्ट झाले आहेत. परिवारवादी पार्ट्या कितीही एकत्र आल्या तरी काहीच होणार नाही, असे फडणवीस यावेळी म्हणाले.