Sambhaji Nagar Loksabha Election Results 2024 : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये संभाजीनगरमध्ये मोठा फेरबदल पाहिला मिळाला. संभाजीनगर (Sambhaji Nagar) जे मुळचं औरंगाबाद या नावाने ओळखलं जायचं. इथे तिरंगी लढत पाहिला मिळाली. एमआयएम पक्षाचे नेते आणि विद्यमान खासदार इम्तियाज (Imtiyaz Jalil) जलील, एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यात प्रमुख लढत झाली. या लढतीत गेल्या निवडणुतील विजय झालेले इम्तियाज जलील दुसऱ्यांदा आणि सहाव्यांदा खासदार होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चंद्रकांत खैरे यांचं स्वप्न भंग झालंय. एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी विजय मिळवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

52 दरवाजांचं मराठवाड्याच्या राजधानीचं शहराचे चंद्रकांत खैरं तब्बल 20 शिवसेनेचे खासदार होते. तर गेल्या पाच वर्षांपासून संभाजीनगर एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या ताब्यात आहे. 1999, 2004, 2009 आणि 2014 असे चार टर्म चंद्रकांत खैरे खासदार झालं खरं पण पाचव्यांदा त्यांचा पराभव झाला. आता खैरे सहाव्यांदा त्याचं नशिब आजमावत होते. 


2009 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उत्तमसिंह पवारांचा 33 हजार मतांनी पराभव केला. तर 2014 मध्ये काँग्रेसच्या नितीन पाटलांना दीड लाख मतांनी धुळ चारली. मात्र 2019 मध्ये एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी खैरेंना केवळ 4 हजार 400 मतांनी मात केली. 


हेसुद्धा वाचा - Maharashtra Lok Sabha Winner List: कोण आहेत महाराष्ट्राचे नवे 48 खासदार? वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी


त्या वेळच राजकीय चित्र पाहता अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधवांना मिळालेल्या 2 लाख 83 हजार मतांमुळं खैरेंचा पराभव असं राजकीय विश्लेषकांचं मत होतं. यंदा लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरकरांनी 63.07 टक्के मतदान केलं. हा आकडा पाहता छत्रपती संभाजीनगरमध्ये अटीतटीची लढत पाहिला मिळतेय. 


या मतदारसंघातही शिवसेनेच्या बंडखोरीचा फटका उमेदवारी निवडताना दिसून आला. खैरेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही महायुतीचा उमेदवार निश्चित होत नव्हती. पण संदिपान भुमरे यांना उमेदवारी दिली पण त्यांना प्रचार करण्यास कमी वेळ मिळाला तरीही त्यांनी संभाजीनगरमध्ये मोठा फेरबदल घडवून आणला. संभाजीनगरमधील मतदारांबद्दल बोलायचं झालं तर आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मराठा समाज नाराज होती. पिण्याचा पाण्याचा, शहराचे नामकरण झाल्याने धुव्रीकरण, दुष्काळ, गुन्हेगारी हे मुद्दे या निवडणुकीत गाजले.