महाड : महाड येथून अक्कलकोटला जाणारी एसटी बस आंबेनळी घाटात कोसळली आहे. महाबळेश्वरच्या हद्दीत घटना घडली आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. ही बस मुक्कामी महाडला असते. प्रतापगडपासून पोलादपूरला जाणाऱ्या घाटातून ही बस खाली गेली. पण खाली कोसळलेली ही बस झाडांमध्ये अडकली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांचा जीव वाचवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या अपघातामध्ये १५ प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.