Corona Update : आज तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण वाढले?
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोय...
Maharshtra Corona Update : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच दिवसा संचारबंदी आणि अनेक कडक निर्बंध ही लागू करण्यात आले आहेत. तरी देखील राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या अजूनही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
देशासाठी येणारे 4 आठवडे महत्त्वाचे आहेत. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जावू शकते. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात वाढत असल्याने चिंता वाढल्या आहेत.
नाशिक : जिल्ह्यात आज 4122 नव्या रुग्णांची वाढ झाली असून 24 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : आज 10,428 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
चंद्रपूर : गेल्या 24 तासात 637 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
अमरावती : जिल्ह्यात आज दिवसभरात 4 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून 344 रुग्णांची वाढ झाली आहे.
यवतमाळ : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून 350 नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत.
निफाड : तालुक्यात 229 नवे रुग्ण वाढले असून आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 214 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
भंडारा : जिल्ह्यात आज कोरोनाचे 1177 रूग्ण वाढले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
येवला : आज 43 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आतापर्यंत 82 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अकोला : गेल्या 24 तासात कोरोनाचे 263 रुग्ण वाढले असून 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जालना : जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे 614 नवे रुग्णांची नोंद झाली असून आज 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
नांदेड : गेल्या 24 तासात 26 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1255 नवे रुग्ण वाढले आहेत.
लातूर : जिल्ह्यात आज उच्चांकी 969 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर : गेल्या 24 तासात 1652 कोरोना रुग्णांची भर पडली आहे.