Gautam Adani Mahavikas Agadhi Government: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार उद्योजक गौतम अदानींच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाडल्याचा आरोप केला आहे. हा आरोप करताना राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देत सरकार पाडण्यात अदानींचा हात होता हे अजित पवारच म्हणाल्याचा दावा केला आहे.


मोदी अदानींची हातमिळवणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊतांना पत्रकारांनी, "छगन भुजबळ म्हणतात की शरद पवारांनी शिवसेना फोडली," असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी, "छगन भुजबळ जेव्हा फुटले तेव्हा त्यांनी मंडलचं कारण दिलेलं. शिवसेना ही मंडलविरोधी असल्याने मी शिवसेना सोडतोय असं ते म्हणाले आणि पक्ष सोडला, हे भुजबळ विसले असतील असं मला वाटत नाही," असं उत्तर दिलं. पुढे बोलताना राऊत यांनी, " शरद पवारांनी पक्ष फोडला की गौतम अदानींची पक्ष फोडला हे अजित पवारांना विचारला. स्वत: अजित पवार कबुल करत आहेत की महाराष्ट्रातील सरकार गौतम अदानींनी पाडलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्यामागे सुद्धा नरेंद्र मोदी आणि अदानी यांनी हातमिळवणी आहे," असा आरोप केला.


अदानींनी आमचं सरकार पाडलं याचा अर्थ...


"आमचं सरकारचं गौतम अदानींनी पाडलं. अजित पवारांच्या दाव्यानुसार एक उद्योगपती आमचं सरकार पाडत असेल तर याचा अर्थ असा की आमचा कोणत्याही उद्योगपतीशी हातमिळवणी नाही. गौतम अदानीच्या हस्ते ही मुंबई लुटली जाऊ नये म्हणून आम्ही लढलो आणि आमचं सरकार पाडलं. जर आम्ही गौतम अदानीशी हातमिळवणी केली असती तर आमच्या बॅगेत, हेलिकॉप्टरमध्ये आणि विमानात नक्की पैसे असते. आमच्या विमानात खरोखर कोमट पाणी आहे. ते पाणी पिऊन आम्ही दौरे करतो," असं खोचक उत्तर संजय राऊतांनी दिलं.


नक्की वाचा >> 370 कलम, ‘बटेंगे, कटेंगे’पेक्षा मोदींनी महाराष्ट्राला हे सांगावे की...; ठाकरेंची मागणी


सध्याची लढाई अदानींविरोधात कारण हा महाराष्ट्र...


"अजित पवार, फडणवीस, शरद पवार ही बैठक कधी झाली नाही. मात्र गौतम अदनी, फडणवीस, अमित शाह, अजित पवार, प्रफुल्ल पटेल ही बैठक वारंवार होत आली. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात आहे. म्हणजेच यात नरेंद्र मोदी, अमित शाह आणि फडणवीसांचा हात आहे. आता याबद्दलचा खुलासा अजित पवारांनी केला आहे. ते या बैठकीमध्ये उपस्थित होते. सध्या महाराष्ट्रातील निवडणुकीची ही लढाई गौतम अदानींविरोधात आहे. असा उद्योगपती जो सरकारे पाडतो, आमदार-खासदारांना विकत घेतो आणि विकतो. अशा गौतम अदानींच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आम्ही जाऊ देणार नाही. म्हणून संघर्ष सुरु आहे," असंही राऊतांनी यावेळेस म्हटलं. 


नक्की वाचा >> 'बॅग तपासली तर एवढा काय फरक पडला? अरे माझी बॅग...'; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला


अजित पवार अदानींबद्दल काय म्हणाले?


अजित पवारांनी 'द न्यूज मिनीट'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये 2019 साली सकाळच्या शपथविधीनंतर स्थापन झालेल्या 80 तासांच्या सरकारबद्दल विचारलं असता त्यांनी हे सरकार स्थापन करण्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये कोणकोण होतं याची यादीच सांगितली. यामध्ये अजित पवारांनी काका शरद पवार, अमित शाह, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि मी स्वत: या बैठकीला होतो असं म्हटलं आहे. यावरुनच राऊत यांनी थेट पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.