`पवार कुटुंबाने आता तरी...`, छगन भुजबळांचं मोठं विधान, शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले `ते कुटुंब...`
Chhagan Bhujbal on Pawar Family: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) कुटुंबातही दुरावा निर्माण झाला. दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एक मोठं विधान केलं आहे.
Chhagan Bhujbal on Pawar Family: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) कुटुंबातही दुरावा निर्माण झाला. दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एक मोठं विधान केलं आहे. पवार कुटुंबीयांनी एकत्र यावं असं भुजबळ म्हणाले आहेत. तसंच शरद पवार कधीच कुटुंब तुटू देणार नाहीत असा विश्वासही व्यक्त केला आहे.
राज्यामध्ये दिवाळी साजरी होत असताना राजकीय फटाकेही मोठ्या प्रमाणात फुटत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर पवार कुटुंबीयांनी एकत्र यावं, वाढलेली कटूता कमी व्हावी असं ते 'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.
"या निवडणुकीनंतर पवार कुटुंबीयांनी एकत्र आलं पाहिजे. त्यांचे राजकीय पक्ष, राजकीय विचारसरणी याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण कुटुंब म्हणून ते एकत्र आले पाहिजेत. त्यांच्या विधानांवरुन काळजी करण्याचं कारण नाही. शरद पवार हे कुटुंब तुटू देणार नाहीत. कुटुंबीय एकत्र राहिलं, तर आपल्यालाही आनंद होईल. सगळ्यांच्या घरात आनंद राहिला तर आपल्यालाही आनंद होतो," असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
दरम्यान पत्रकार परिषदेत छगन भुजबळांना पुतण्या समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष लढणार असण्यासंबंधी विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, "मला वाटतं सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे. शरद पवारांचा पुतण्या, अजितदादांचा पुतण्या, पूर्वी मुंडे साहेबांचा पुतण्या, बाळासाहेब ठाकरे यांची पुतणे. असे अनेक पतणे कंपनीचे आहेत ते काकांचं ऐकतातच असं वाटत नाही. राजकारणात सगळे पुतणेचे आहेत. त्यांचा वेगळाच डीएनए असं वाटायला लागलं आहे".