महाराष्ट्रातील `या` 38 मतदारसंघांमध्ये थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत; वाचा संपूर्ण यादी
NCP vs NCP: राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. यामुळे शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे या चौघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. निवडणूक जिंकत आपणच खरी शिवसेना किंवा राष्ट्रवादी आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून असेल.
NCP vs NCP: महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. याआधी लोकसभा निवडणुकीत ते आमने-सामने आले होते. दरम्यान सध्या होणारी विधानसभा निवडणूक शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या चौघांसाठी प्रतिष्ठेची आहे. निवडणूक जिंकत आपणच खरी शिवसेना किंवा राष्ट्रवादी आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून असेल. दरम्यान फूट पडल्यामुळे अनेक मतदारसंघात हे पक्ष आमने-सामने आहेत.
राज्यात एकूण 38 ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पहायला मिळणार आहे. हे मतदारसंघ नेमके कोणते आहेत हे जाणून घेऊयात.
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी
1) लोकसभेत चित्र काय होतं?
लोकसभेत बारामती आणि शिरुरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होता. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार तर शिरुरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यात लढत होती. बारामतीत पवार कुटुंबातच सामना असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष होतं. दरम्यान दोन्ही ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणूक जिंकली होती. अजित पवारांना यामुळे मोठा धक्का बसला होता.
2) कुठे कुठे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ?
एकूण 38 ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार आहे. दरम्यान कोणत्या जिल्ह्यात किती जागी ही लढत होणार आहे हे जाणून घ्या
- विदर्भ - 5
- मराठवाडा - 6
- उत्तर महाराष्ट्र - 7
- मुंबई - 1
- ठाणे - 2
- कोकण - 2
- प. महाराष्ट्र - 15
3) नवे विरुद्ध जुने चेहरे
1) अहेरी (ST) धर्मरावर बाबा आत्राम (NCP) भाग्यश्री आत्राम (SP)
2) परळी धनंजय मुंडे (NCP) राजेसाहेब देशमुख (SP)
3) सिन्नर माणिकराव कोकाटे (NCP) उदय सांगळे (SP)
4) बारामती अजित पवार (NCP) युगेंद्र पवार (SP)
5) तासगाव-कवठे महांकाळ - संजयकाका पाटील ( NCP ) रोहीत पाटील (SP)
4) बारामतीत अस्तित्वाची लढाई
बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबातच सामना होणार आहे. याचं कारण अजित पवार यांच्याविरोधात शरद पवारांनी पुतण्या युगेंद्र पवारांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अजित पवारांचं राजकीय भवितव्य ठरवणारी निवडणूक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी - एकूण 38
विदर्भ - 5
1) अमरावती - वरूड-मोर्शी देवेंद्र भुयार (NCP) + उमेश यावलकर (BJP) गिरीश कराळे (SP)
2) काटोल चरणसिंह ठाकूर (BJP) + अनिल देशमुख (NCP) सलील देशमुख (SP)
3) तुमसर राजे कारेमोरे (NCP) चरण वाघमारे (SP)
4) अहेरी (ST) धर्मरावर बाबा आत्राम (NCP) भाग्यश्री आत्राम (SP)
5) पुसद इंद्रनील नाईक (NCP) शरद मैंद (SP)
मराठवाडा - 6
6) वसमत चंद्रकांत उर्फ राजू नवघरे (NCP) जयप्रकाश दांडेगावकर (SP)
7) माजलगाव प्रकाश दादा सोळंके (NCP) मोहन बाजीराव जगताप (SP)
8) बीड योगेश क्षीरसागर (NCP) संदीप क्षीरसागर (SP)
9) परळी धनंजय मुंडे (NCP) राजेसाहेब देशमुख (SP)
10) अहमदपूर बाबासाहेब पाटील (NCP) विनायकराव पाटील (SP)
11) उदगीर (SC) संजय बनसोडे (NCP) सुधाकर भालेराव (SP)
उत्तर महाराष्ट्र - 7
12) येवला छगन भुजबळ (NCP) माणिकराव शिंदे (SP)
13) सिन्नर माणिकराव कोकाटे (NCP) उदय सांगळे (SP)
14) दिंडोरी (ST) नरहरी झिरवाळ (NCP) सुनीता चारोस्कर (SP)
15) अकोले (ST) किरण लहामटे (NCP) अमित भांगरे (SP)
16) कोपरगाव आशुतोष काळे (NCP) संदीप वर्पे (SP)
17) पारनेर काशिनाथ दाते (NCP) राणी लंके (SP)
18) अहमदनगर शहर संग्राम जगताप (NCP) अभिषेक कळमकर (SP)
मुंबई - 1
19) अणुशक्ती नगर सना मलिक ( NCP ) फहाद अहमद (SP)
ठाणे - 2
20) शहापूर (ST) दौलत दरोडा (NCP) पांडुरंग बरोरा (SP)
21) मुंब्रा-कळवा नजीब मुल्ला (NCP) जितेंद्र आव्हाड (SP)
कोकण - 2
22) श्रीवर्धन आदिती तटकरे (NCP) अनिल नवघणे (SP)
23) चिपळूण शेखर निकम (NCP) प्रशांत यादव (SP)
प. महाराष्ट्र - 15
24) जुन्नर अतुल बेनके (NCP) सत्यशील शेरकर (SP)
25) आंबेगाव दिलीप वळसे पाटील (NCP) देवदत्त निकम (SP)
26) शिरूर माऊली कटके ( NCP ) अशोकराव पवार (SP)
27) इंदापूर दत्तात्रय भरणे (NCP) हर्षवर्धन पाटील (SP)
28) बारामती अजित पवार (NCP) युगेंद्र पवार (SP)
29) वडगाव शेरी सुनिल टिंगरे ( NCP ) बापूसाहेब पठारे (SP)
30) हडपसर चेतन तुपे (NCP) प्रशांत जगताप (SP)
31) माढा मीनल साठे (NCP) अभिजित पाटील (SP)
32) मोहोळ (SC) यशवंत माने (NCP) राजू खरे (SP)
33) फलटण (SC) सचिन पाटील (NCP) दीपक चव्हाण (SP)
34) वाई मकरंद पाटील (NCP) अरुणादेवी पिसाळ (SP)
35) चंदगड राजेश पाटील (NCP) नंदिनीताई भाबुळकर कुपेकर (SP)
36) कागल हसन मुश्रीफ (NCP) समरजीत घाटगे (SP)
37) इस्लामपूर निशिकांत पाटील ( NCP) जयंत पाटील (SP)
38) तासगाव-कवठे महांकाळ संजयकाका पाटील ( NCP ) रोहीत पाटील (SP)