Raj Thackeray MNS Manifesto :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज त्यांचा 'आम्ही हे करू' या नावाचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. 'जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेकांनी आम्ही काय करू एवढंच सांगितलंय. पण, आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय करू आणि कसं करू याबद्दल आम्ही जाहीरनाम्यामध्ये माहिती दिलीय.' (maharashtra assembly election raj thackeray MNS Manifesto )


मनसेच्या जाहीरनाम्यात काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये मूलभूत गरजा आणि जीवनमान या गोष्टी आहेत. महिला, आरोग्य प्राथमिक शिक्षण, रोजगार वगैरे आहे. दुसऱ्या विभागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट या गोष्टींचा उल्लेख केला आहे. तिसरा विभाग, प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे विषय आहे. चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावला आहे. या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. अजून एक पुस्तिका यात आम्ही काय केलं आतापर्यंत केले त्या त्यात नमूद केल्या आहेत, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.