महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील `या` 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?
Raj Thackeray : लोकसभा निवडणूक स्वबळावर राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पुण्यातील आठ पैकी पाच मतदारसंघात मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत असल्यानं राज ठाकरे यांनी मिशन पुणे हाती घेतलंय.
Maharashtra Assembly Elections 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पुणे मिशन हाती घेत पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीसाठीच्या या खास बैठकीसाठी पुण्यातील इच्छुकांना मुंबईत पाचारण करण्यात आलं होतं. मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी नेमका काय कानमंत्र दिला हे अजून गुलदस्त्यात आहे.
हे देखील वाचा.... पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव माहित आहे का?
कधीकाळी पुणे महापालिकेत मनसेचे 29 नगरसेवक आणि शहरात एक आमदार राहिलेल्या मनसेची अलीकडच्या काळात चांगलीच घसरण झालीये. गेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे दोन नगरसेवक निवडून आले . त्यापैकी एक असलेले वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीआधी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय.
अलीकडच्या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही. तरीही पुण्यात राज ठाकरे यांची क्रेझ कायम आहे. त्यामुळेच त्यांच्या सभांना पुण्यात मोठी गर्दी होते. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या गर्दीच रूपांतर मतांमध्ये करण्याचा आव्हान पुन्हा एकदा पक्षासमोर आहे. पुणे शहरातील कोथरूड, शिवाजीनगर, कसबा, पर्वती तसेच हडपसर मतदारसंघात मनसेची बऱ्यापैकी ताकद आहे. त्यामुळेच इथल्या इच्छुकांनी विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे.
हे देखील वाचा... मुंबईच्या साऊथ बॉम्बेला टक्कर देतात पुण्यातील या पॉश वस्त्या; इंथ राहतात करोडपती
पुणे शहरातील आठही विधानसभा लढण्याची मनसैनिकांची इच्छा आहे. असं असलं तरी त्या आठपैकी पाच मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याच सूतोवाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे केल्याचं कळतंय. हडपसरमधून शहराध्यक्ष साईनाथ बाबर, कोथरूड मधून माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि प्रदेश प्रवक्ते हेमंत संभूस, कसब्यातून गणेश भोकरे, शिवाजीनगर मधून रणजीत शिरोळे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्यांना राज ठाकरे यांच्या अंतिम आदेशाची प्रतीक्षा आहे.
राज ठाकरे एकीकडे पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेत असतानाच पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील त्यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. यावेळची विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढवणार हे जवळजवळ निश्चित आहे. विधानसभेसाठीचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्याचा विचार करता मनसेच्या तंबूत निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आवश्यक हालचालींना अजून तरी वेग आलेला दिसत नाहीये.