Pune Richest Man Cyrus S Poonawalla : मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई महाष्ट्रातील पहिल्या क्रमांंचे श्रीमंत शहर आहे. मुंबई पाठोपठ नंबर लागतो तो पुण्याचा. पुणे शहर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकांचे श्रीमंत शहर आहे. पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव माहित आहे का? भारतातील टॉप 10 श्रीमतांच्या यादीत या व्यक्तीचे नाव हे चौथ्या स्थानी आहे. जाणून घेऊया कोण आहे ही व्यक्ती.
काही दिवसांपूर्वी हुरुन इंडियाने देशातील श्रीमंताची यादी (Hurun India Rich List 2024) जाहीर केली आहे. भारतातील टॉप 10 श्रीमतांच्या या यादीत पुण्यातील या सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील नाव आहे. पुण्यातील ही पहिल्या क्रमांची श्रीमंत व्यक्ती या यादीत चौथ्या स्थानी आहे. पुण्यातील या सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव सायरस पूनावाला असे आहे.
सायरस पूनावाला हे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. लस निर्मिती करणारी कंपनी सीमर इन्स्टीट्यूटचे ते मालक आहेत. सीरम इन्स्टिट्यूटचे मालक सायरस एस. पूनावाला आणि कुटुंब 2.90 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह श्रीमंताच्या यादीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनाविरोधातल्या लस तयार केली. या बद्दल सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सीरमचे सीईओ आणि सायरस पूनावाला यांचा मुलगा आदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीने कोविड-19 लस तयार केली. Covishield ही कोरोना महामारीच्या काळात भारतात सर्वाधिक वापरली गेलेली लस आहे.
पोर्ट, एअरपोर्टपासून सीमेंट, ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये काम करणारे अरबपती उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. भारतीय श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत. त्यांची संपत्ती 10.14 लाख कोटी इतकी आहे. एचसीएल टेक्नलॉजीसचे फाऊंडर शिव नाडर 3.14 लाख कोटीं रुपयांच्या संपत्तीसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. लस निर्मिती करणारी कंपनी सीमर इन्स्टीट्यूटचे मालक एस. पूनावाला या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. तर सन फॉर्मास्युटिकल्सचे मालक दिलीप सांघवी पाचव्या स्थानावर आहे. गेल्या पाच वर्षात सहा उद्योगपती असे आहेत जे भारताच्या टॉप-10 अरबपतींमध्ये कायम आहेत.
या यादीत कुमार मंगलम बिर्ला सहाव्या क्रमांकावर, गोपीचंद हिंदुजा सातव्या, राधाकृष्ण दमानी आठव्या, अझीम प्रेमजी नवव्या आणि नीरज बजाज दहाव्या क्रमांकावर आहेत.