Maharashtra Assembly Elections 2024 :   निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरू झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकाआघाडीसोबतच राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष (मनसे) देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी 'एकला चलो'ची घोषणा केलीय. येत्या विधानसभेला 'ना युती, ना आघाड्या' म्हणत राज ठाकरेंनी स्वबळाचं रणशिंग फुंकलंय. राज ठाकरे यांनी थेट मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अमित ठाकरेच्यां रुपानं आणखी एक ठाकरे राजकीय आखाड्यात उतरलेत. मात्र, लोकसभेतील बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्याची चर्चा सुरु असतानाच शिवसेना नेते सदा सरवणकर हे अमित ठाकरेंविरोधात निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अशातच आता शिवसनेच्या मदतीने महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलण्याची खेळी मनसे करणार आहे. मनसेचा शिवसेनेकडे 10 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. 


हे देखील वाचा... सदा सरवणकर यांचा एक निर्णय महाराष्ट्राचे राजकारण बदलणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुती लोकसभेतील मनसेच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्यासाठी महायुतीने मनसेविरोधात उमेदवार देऊ नये अशी मागणी होती. असे असताना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले  मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांना ही निवडणूक जड जाणार असल्याचे दिसत आहे. कारण, .शिवसेना नेते सदा सरवणकर दादर माहिममधून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.  मनसे नेते अमित ठाकरेंनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, सरवणकर उद्या अर्ज दाखल करणारेत. मध्यंतरी आशीष शेलारांनी महायुतीनं परतफेड करण्यात हरकत काय असा सवाल केला होता. मात्र, सदा सरवणकर दादर माहिममधून निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने अमित ठाकरें समोर निवडणूक जिंकण्याचे मोठे चॅलेंज आहे.


मनसेचा 10 जांगाचा  प्रस्ताव


दरम्यान, माहिम मतदार संघात निर्माण झालेला हा पेच सुटावा तसेच महत्वाच्या जागा जिंकण्यासाठी मनसेने आता थेट शिवसेनेला प्रस्ताव दिला आहे. 
वरळी, शिवडी, माहिम, अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशी भांडुप, विक्रोळी, कल्याण सह एकूण दहा मतदार संघात बिनविरोध तसेच सहज विजय मिळवता येईल अशा लढती व्हाव्यात यासाठी मनसेने शिवसनेकडे प्रस्ताव दिला आहे. या दहा जांगावर उेमदवार देऊ नये तसेच उमेदवार दिला असल्यास माघार घ्यावी असा हा मनसेचे प्रस्ताव असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.