Maharashtra Assembly Elections 2024 : माहीम मतदारसंघात मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याच्या मुद्यावर भाजपनं ठाम भूमिका घेतलीये तर दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अशातच सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय.. भेटीनंतर येत्या 24 तासात भूमिका ठरवण्यासाठी सरवरणकरांना मुदत देण्यात आलीय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिलीय. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून महेश सावंत रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता या पाठिंब्याची बिनशर्त परतफेड करण्यासाठी अमित ठाकरे यांच्यासाठी महायुती आपला उमेदवार मागे घेणार असल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहेत.
माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर निवडणुकीतून माघार घेण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सदा सरवणकर यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्या शाखेबाहेर गर्दी केली. तसेच सरवरणकरांनी निवडणुकीतून माघार न घेण्याची मागणी केली. त्यानंतर सरवणकरांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला.
सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार न घेतल्यास माहीम विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाची साथ मात्र मनसेच्या अमित ठाकरेंना मिळेल अशीही चर्चा सुरू आहे.
2009 मध्ये माहिम विधानसभा मतदारसंघातून मनसेचे नेते नितीन सरदेसाई 48 हजार मतांनी निवडून आले होते. तर, 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून संदीप देशपांडे यांना 42 हजार मतं मिळाली होती. 2014 मध्ये सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. त्यावेळी भाजपच्या विलास आंबेकर यांना 33 हजार मतं मिळाली होती. त्यामुळं माहिमध्ये भाजपचे देखील चांगली ताकद आहे. मनसेला भाजपाचा पाठिंबा मिळाल्यास अमित ठाकरे सहज निवडून येऊ शकतात. अशा राजकीय परिस्थितीत भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.