Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपची विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे अशोक चव्हाण यांचा मतदार संघ सुरक्षित झाला आहे. 


हे देखील वाचा... भाजपच्या पहिल्याच यादीत मोठा ट्विस्ट; शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिकीट देऊन धर्मसंकटात टाकले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाले. भोकर मतदार संघातून खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजप मध्ये प्रवेश केला होता. भोकर अशोक चव्हाण यांचा पारंपारिक मतदार संघ आहे. आपल्या मुलीला निवडून आणणे अशोक चव्हाण यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचे आहे. कारण अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतरही नांदेड लोकसभा भाजपला गमवावी लागली होती. 


लोकसभेतील विजयानंतर काँग्रेस उत्साहात आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये गेलेले अनेक पदाधिकारी लोकसभेनंतर परत काँग्रेसमध्ये आले आहेत. भोकर मधून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तिरुपती पाटील कोंढेकर किंवा जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. वंचित ने भोकर मध्ये उमेदवार जाहीर केला आहे.  MIM उमेदवार देण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील भोकर मधून उमेदवार देणार की कुणाला समर्थन यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे.
अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट देण्यात आले आहे.  अशोक चव्हाण यांना श्रीजया आणि सुजया या दोन मुली आहेत.  चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण, यांच्या नंतर त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी राजकीय वारसा चालवला. यानंतर आता श्रीजया चव्हाण राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. 


अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी सर्व प्रथम भारत जोडो अभियानाच्या राहुल गांधी यांच्या स्वागताच्या प्रत्येक बॅनरवर श्रीजयाचा फोटो झळकले होते. तेव्हापासूनच श्रीजया चव्हाण आगामी विधानसभा निवडणुक लढविणार असल्याची चर्चा रंगली होती. मागील काही महिन्यांपासून श्रीजया चव्हाण या राजकारणात अधिक सक्रिय झाल्याचे दिसले. त्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. भोकरमधून कन्या श्रीजया चव्हाण या विधानसभेच्या संभाव्य उमेदवार असतील हे लक्षात घेवून चव्हाण यांनी देखील मतदारसंघ पिंजून काढला. मतदार संघात श्रीजया चव्हाण यांचे भावी आमदार म्हणून बॅनरही झळकले होते.