Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्याच उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे. शरद पवार गटात वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिटीक देऊन भाजपने या नेत्याला धर्मसंकटात टाकले आहे. या नेत्याला तिकीट देण्यात आले असले तरी त्याच्या मुलाचा पत्ता भाजपने कट केला आहे.
शरद पवार गटात वाटेवर असलेला हा बडा नेता म्हणाजे गणेश नाईक आहे. गणेश नाईक यांना भाजपने ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक यांना उमेदवारी दिली आहे. तर, बेलापूर मतदार संघातून मंदा म्हात्रे यांना उमेदवाकरी देण्यात आली आहे.
बेलापूर (Belapur), ऐरोली (Airoli) या दोन्ही मतदारसंघावर गणेश नाईक यांनी दावा केला आहे. जर या दोन्ही ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही तर ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान भाजपने जाहीर केलेल्या यादीत ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक यांना तर बेलापूर मतदार संघातून मंदा म्हात्रे यांना उमेदवाकरी देण्यात आली आहे. यामुळे आता बेलापूर विधानसभेतून भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक वेगळी चूल मांडण्याची शक्यता आहे. संदीप नाईक तुतारी हाती घेत बेलापूर मधून निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
PHI
(20 ov) 201/9
|
VS |
MAS
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 80/9
|
VS |
INA
81/5(16.2 ov)
|
| Indonesia beat Thailand by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.