Ladki Bahin Yojana :  नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंधराशे रुपयांचे एकविसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे.  महायुतीच्या 39 मंत्र्यांनी मंत्रीमत्राची शपथ घेतली. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे.  विधानसभेच्या पहिल्याच दिवशी नव्या सरकारने लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. 


हे देखील वाचा... म्हाडाचा सर्वात मोठा निर्णय! मुंबईत म्हाडची घरं भाडे तत्वावर मिळणार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिवेशनात 35 हजार 788 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3050 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते आणि पूल बांधणीसाठी 1500 कोटी रुपये,  मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1250  कोटी, मुंबई मेट्रोसाठी 1212 कोटींचे अर्थ सहाय्य तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  


हिवाळी अधिवेशानात लाडकी बहीण योजनेतील अनुदान पंधराशे रुपयांवरुन एकवीसशे रुपये करु असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी  लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले जात आहेत.  कोट्यावधी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे लाभ घेतला आहे. 1500 रुपये या प्रमाणे तीन महिन्यांचे मनाधन तसेच 3 हजार रुपयांचा दिवाळी बोनस देखील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.