Cabinet Expansion: अजित पवारांच्या `या` 10 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ; यादी एकदा पाहाच
Maharashtra Cabinet Expansion Ajit Pawar All 10 Miniters Full List: अजित पवारांच्या पक्षाने स्ट्राइक रेटच्याबाबतीत दुसरं स्थान पटकावलं असून एकूण 41 जागा जिंकल्या आहेत.
Maharashtra Cabinet Expansion Ajit Pawar All 10 Miniters Full List: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 60 जागा लढवून 41 जागा जिंकणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणते मंत्री महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री असतील हे निश्चित झालं आहे. अजित पवारांच्या पक्षाने केलेल्या लक्षवेधी कामगिरीने सर्वचजण थक्क झाले आहेत. सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पक्षाला कशीबशी एक जागा जिंकता आली होती. स्वत: अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या सुद्धा लोकसभा निवडणुकीला बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंकडून दीड लाखांहून अधिक मतांनी पराभूत झालेल्या. त्यामुळेच विधानसभेलाही लोकसभेची पुनरावृत्ती होणार की अजित पवार आपला करिश्मा दाखवणार याबद्दलची उलट सुलट चर्चा होती.
9 आमदार मंत्रिमंळात शपथ घेणार
मात्र अजित पवारांच्या पक्षाने 41 जागांवर विजय मिळत चुलते आणि पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का दिला. शरद पवारांच्या पक्षाला केवळ 10 जागा जिंकता आल्या. त्याच्या अगदी उलट कामगिरी करत शरद पवारांच्या पक्षापैका चौपट अधिक जागा अजित पवारांच्या पक्षाने जिंकल्या. अनेकजागी अजित पवारांच्या उमेदवारांनी प्रथापितांनाही धक्का दिला. शरद पवारांनी प्रचारात जोर लावूनही अजित पवारांचे अनेक उमेदवार सहज विजयी झाले. त्यामुळेच महाराष्ट्रातील राजकीय पटलावर अजित पवारांचं वजन अधिक वाढलं असून दिल्लीशी असणारी जवळीकही वाढली आहे.
अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी आज म्हणजेच 15 डिसेंबर रोजी पक्षाचे 9 आमदार शपथ घेतील असं प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. अजित पवारांसहीत एकूण 9 आमदार असा 10 मंत्रिपदांचा वाटा राष्ट्रवादीला मिळाला आहे. मात्र या 10 नावांपैकी 2 नावांवर शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम आहे.
नक्की वाचा >> Maharashtra Cabinet Expansion: फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील भाजपाचे 20 मंत्री कोण? ही घ्या संपूर्ण यादी
10 मंत्रिपदं मिळणार
त्यामुळेच 41 आमदार निवडून आलेले असताना अजित पवारांच्या पक्षाला फडणवीसांच्या 3.0 सरकारमध्ये 10 मंत्रिपदं मिळणार आहे. या मंत्रिपदावर कोणकोणाची वर्णी लागली आहे हे मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी समोर आलं आहे. स्वत: अजित पवारांसहीत अन्य कोणते 10 आमदार फडणवीसांच्या मंत्रिमंडळात असतील पाहूयात...
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी :
अजित पवार (उपमुख्यमंत्री)
आदिती तटकरे
नरहरी झिरवाळ
दत्ता भरणे
हसन मुश्रीफ
बाबासाहेब पाटील
मकरंद पाटील
इंद्रनील नाईक
अन्य दोन नावं कोण?
शपथविधीला चार तासांहून कमी कालावधी शिल्लक असतानाही 10 पैकी अन्य दोन नावं कोण याबद्दलचं गूढ कायम असतानाच शेवटची दोन नावं ही छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंची असतील असं सांगितलं जात होतं. अगदी शेवटच्या क्षणी या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.