Maharashtra Cabinet Expansion: फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील भाजपाचे 20 मंत्री कोण? ही घ्या संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Expansion Full List 20 BJP Miniters In Fadnavis Government: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या पक्षातील कोणकोणते आमदार मंत्री म्हणून काम करतील याची यादी समोर आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 15, 2024, 12:07 PM IST
Maharashtra Cabinet Expansion: फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील भाजपाचे 20 मंत्री कोण? ही घ्या संपूर्ण यादी title=
फडणवीसांच्या पक्षातील कोणते सहकारी होणार मंत्री एकदा यादी पाहाच (फाइल फोटो)

Maharashtra Cabinet Expansion Full List 20 BJP Miniters In Fadnavis Government: महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पार्टीकडून कोणाकोणाला मंत्रिपद मिळणार याबद्दलचा सस्पेन्स संपला आहे. भाजपाने मंत्रिमंडळात स्थान दिलेल्या नेत्यांची नावं समोर आली आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपाला 100 हून अधिक जागा जिंकवून देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. त्यानंतर आता दहा दिवसांनी म्हणजेच हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधी नागपूरमधील राजभवनामध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरदरम्यान नागपूरमध्ये पार पडत असलेल्या हिवाळी अधिवेशनाआधी भाजपाकडून कोणकोण शपथ घेणार याची यादीच समोर आली आहे.

तीन महिलांचा समावेश

विधानसभेला ज्या पक्षाने जितक्या जागा जिंकल्या तितक्या प्रमाणात त्यांना मंत्रिपदं दिली जाणार असं निश्चित झाल्याची बातमी समोर आली. या सूत्रानुसार भाजपाकडून 20 आमदार मंत्री होणार हे निश्चित झालेलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपाचे कोणते 20 आमदार त्यांच्या मंत्रिमंडळात असतील हे समोर आलं आहे. या यादीमध्ये जुन्या आणि पहिल्यांदाच संधी मिळालेल्या आमदारांचा संमिश्र संख्या दिसत आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळामध्ये भाजपाने महिला आमदारांनाही योग्य प्रतिनिधित्व दिल्याचं पाहायला मिळत आहे.

20 आमदारांपैकी 3 महिला भाजपा आमदार मंत्रिपदी विराजमान होत आहेत. यापैकी एक महिला आमदार यापूर्वीही राज्यातील मंत्रिमंडळाचा भाग राहिलेल्या आहेत. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंनाही मंत्रिपद देण्यात येणार असून त्यांच्या खांद्यावरील जबाबदारी देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असलेले भाजपाचे डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्यावर सोपवण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

भाजप मंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे: - 

> देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
> चंद्रशेखर बावनकुळे
> नितेश राणे
> शिवेंद्रराजे भोसले
> चंद्रकांत पाटील
> गिरीश महाजन
> पंकजा मुंडे
> जयकुमार रावल
> राधाकृष्ष विखे-पाटील
> गणेश नाईक
> पंकज भोयर
> मेघना बोर्डिकर
> माधुरी मिसाळ
> अतुल सावे
> आकाश फुंडकर
> अशोक उईके
> आशिष शेलार
> मंगलप्रभात लोढा
> जयकुमार गोरे
> संजय सावकारे