1 मे रोजीच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर
Maharashtra Din 2023: 1 मे हा आजचा दिवस संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. पण 1 मे रोजीच का महाराष्ट्र दिन साजरा केला जातो? यामागाचा इतिहास तुम्हाला माहितीय का?
Maharashtra Din History in Marathi : मराठी माणसांसाठी आजचा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन (Maharashtra Din 2023) हा खुप जीव्हाळ्याचा आणि आनंदाचा विषय आहे. कारण आजच्या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली. मराठी लोक आपल्या जन्मभूमीचा आदर करतात आणि त्याचबरोर महाराष्ट्राचा अभिमान देखील बाळगतात. महाराष्ट्राच्या सुरक्षेबाबत त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. वेगळ्या राज्याच्या मागणीच्या आंदोलनाला मराठी जनतेने नेहमीच पाठिंबा दिला आहे. केंद्राने संसदेत महाराष्ट्राच्या मागणीचा ठराव संमत करून 1960 साली मराठी लोकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली. मात्र अनेकांना माहिती नसेल, आजचा दिवशीच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? यामागाचा नेमका इतिहास काय आहे? चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचे महत्त्व....
भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी (Independence Day) स्वातंत्र्य मिळाले. पण, महाराष्ट्र स्वतंत्र झाला नव्हता. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. नंतर हळूहळू भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर देशातील राज्ये वेगळी होत गेली. त्यानुसार 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. म्हणूनच हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे या दिवशी स्मरण केले जाते. तर 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.
अशी झाली महाराष्ट्र राज्याची निर्मिती...
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, बहुतेक प्रांतीय राज्ये बॉम्बे प्रांतात विलीन करण्यात आली. तेव्हा गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक मुंबईत राहत होते. त्याचवेळी भाषांच्या आधारे वेगवान राज्य निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली. मराठी भाषा बोलणारे लोक स्वत:साठी वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी करू लागले. त्याच वेळी गुजराती भाषेतील लोकांचे स्वतःचे वेगळे राज्य हवे होते. या दरम्यान देशात अनेकांनी आंदोलन केले आणि या चळवळींचा परिणाम म्हणून 1960 मध्ये मुंबई पुनर्रचना कायदा, 1960 अंतर्गत महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली. म्हणजेच महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य हे पूर्वी एकच राज्य म्हणून ओळखले जात होते.
प्रत्यक्षात, "राज्य पुनर्रचना कायदा" 1956 अंतर्गत अनेक राज्यांची निर्मिती झाली. या कायद्याच्या आधारे कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांना म्हैसूर राज्य म्हणजेच कर्नाटक राज्य देण्यात आले. तेलुगू भाषिक लोकांना आंध्र प्रदेश राज्य मिळाले. त्याच वेळी मल्याळम भाषेच्या लोकांना केरळ आणि तमिळ भाषेच्या लोकांना तामिळनाडू राज्य मिळाले. पण मराठी आणि गुजराती लोकांना स्वतःचे वेगळे राज्य मिळाले नव्हते. त्यानंतर लोकांनी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी अनेक चळवळी सुरू केल्या.
1960 मध्ये एका बाजूला गुजरात राज्याच्या निर्मितीसाठी महागुजरात चळवळ सुरू झाली. त्याचवेळी महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. 1 मे 1960 रोजी विद्यमान भारत सरकारने बॉम्बे राज्याचे दोन राज्यांमध्ये विभाजन केले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती मराठी भाषिकांसाठी आणि गुजरात राज्याची निर्मिती गुजराती भाषिकांसाठी झाली.
पण त्याच दरम्यान या दोन राज्यांमध्ये बॉम्बेवरून लढा सुरू झाला. तर महाराष्ट्रातील लोकांना मुंबई हा त्यांच्या राज्याचा भाग हवा होता. कारण मुंबईतील बहुतांश लोक मराठी बोलतात. पण कालांतराने बॉम्बे महाराष्ट्राचा भाग बनले आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली.