महिलांचं वाढलेलं मतदान महायुतीला वरदान ठरणार का? इतिहास काय सांगतो
राज्यात पार पडलेल्या विधानसभेच्या मतदानाचा टक्का वाढल्याचं पाहायला मिळतंय. निवडणुक आयोगाच्या आकडेवारीनुसार गेल्या 30 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडीत निघालाय. त्यामुळे मतदानाच्या वाढलेल्या या टक्क्याचा कुणाला फायदा होणार याची चर्चा सुरू झालीय.
Maharashtra Election 2024 : राज्याच्या विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. या मतदानामध्ये मतदारांनी मोठा उत्साह दाखवल्याचं पाहायला मिळालं. यामुळे गेल्या 30 वर्षांचा मतदानाचा रेकॉर्ड मोडीत निघालाय. यंदाच्या विधानसभेसाठी राज्यात 65.11 टक्के मतदान झालंय. याआधी राज्यात 1995 साली 71.69 टक्के मतदान झालं होतं.
त्यावेळी राज्यात प्रथमच काँग्रेस सरकार आलं होतं.. त्यामुळे राज्यात यंदाच्या निवडणुकीत 2019 च्या तुलनेत वाढलेल्या मतांचा टक्का कुणाला फायदेशीर ठरणार याची राज्यात चर्चा सुरू झालीय. आता नजर टाकुया राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झालंय त्याच्या आकडेवारीवर.
कशी वाढली मतदानाची टक्केवारी?
विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर महायुती आणि महाविकास आघाडी या पक्षांनी आक्रमक प्रचार केला. भाजपच्या 'बंटेंगे तो कटेंगे' आणि 'एक है तो सेफ हैं'च्या घोषणा केल्या. तर महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भावनिक आवाहनाने नागरिकांना घराबाहेर पडण्यास भाग पाडले.
वाढला टक्का, कुणाला फायदा? राज्यात 65.11 टक्के मतदान
कोल्हापूर - 76.25 %
संभाजीनगर - 68.89 %
नागपूर - 60.49 %
नाशिक - 67.57 %
पुणे - 61.05 %
रायगड - 67.23 %
ठाणे - 56.05 %
मुंबई शहर - 52.07 %
तर याआधी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राज्यात मतांची टक्केवारी काय होती त्यावर एक नजर टाकुया.
वाढला टक्का, कुणाला फायदा? आतापर्यंतच्या विधानसभा मतदानाची टक्केवारी
- 2024 - 65.11 टक्के
- 2019 - 61.04 टक्के
- 2014 - 63.38 टक्के
- 2009 - 59.68 टक्के
- 2004 - 64.44 टक्के
दरम्यान राज्यात वाढलेल्या या मतांच्या टक्केवारीचा भाजपलाच फायदा होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.
विधानसभेच्या निवडणुकीत सर्वच जिल्ह्यांमध्ये चुरशीनं मतदान झालंय. मविआ आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळतेय. त्यामुळे वाढलेल्या मतांच्या टक्क्यांचा फायदा कुणाला होणार याची उत्सुकता आता शिगेली पोहोचली आहे.