ठाणे : कळवा-मु्ंब्रा विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी या अगोदर कळवा-मुंब्रा विधानसभेतून काम केलेलं आहे. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत जितेंद्र आव्हाडांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेने सेलिब्रिटी चेहऱ्याचा वापर केला. शिवसेनेने या मतदारसंघात अभिनेत्री दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिली. मात्र दीपाली सय्यद यांचा पराभव करून जितेंद्र आव्हाड विजयी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जितेंद्र आव्हाडांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मतदार संघात आले होते. एवढेच नव्हे तर जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारासाठी कन्हैया कुमारांनी मुंबईत सभा घेतली होती. या दोन्हीचा फायदा जितेंद्र आव्हाडांना झाला आहे. निवडणुकीच्यावेळी दीपाली सय्यद आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार टक्कर झाली होती. दीपाली सय्यदने जितेंद्र आव्हाडांवर टिका केली होती. 


तुमच्या भागाचा निकाल पाहा एकाच क्लिकवर


LIVE निकाल महाराष्ट्राचा : मुंबई


LIVE निकाल महाराष्ट्राचा : कोकण


LIVE निकाल महाराष्ट्राचा : मराठवाडा 


LIVE निकाल महाराष्ट्राचा : विदर्भ


LIVE निकाल महाराष्ट्राचा : पश्चिम महाराष्ट्र


LIVE निकाल महाराष्ट्राचा : उत्तर महाराष्ट्र


दीपाली सय्यदचा 'माहेरवाशीण' असा जितेंद्र आव्हाडांनी उल्लेख केला होता. त्यावर दीपाली सय्यद यांनी 'आव्हाडांसारखा भाऊ नको' असं प्रत्युत्तर दिलं होतं. आव्हाडांनी एवढ्या वर्षात काम केलं नाही. जनता त्यांच्या कामाने नाराज आहे. मी इथे काम करायला आलेय असं उत्तर दीपाली सय्यदने दिलं होतं. या निवडणुकीत मी शंभर टक्के जिंकणार आहे. हे मी नाही तर कळवा-मुंब्रा परिसरातील लोक सांगत आहेत. कारण लोकांना याठिकाणी विकासासाठी बदल हवा आहे. मी या ठिकाणी 20 हजारांहून अधिक मदाधिक्याने निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. पण जनतेचा कौल हा जितेंद्र आव्हाडांच्या बाजूने आहे. 


दीपाली सय्यद यांच्यावर जितेंद्र आव्हाडांनी देखील टिका केली होती. दीपाली सय्यद दोन नावांनी प्रचार करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता. दीपाली भोसले आणि सोफिया सय्यद या दोन नावांनी प्रचार करत असल्याचा आरोप केला होता.