Ordnance Factory Job: ग्रॅज्युएशन झालंय आणि चांगल्या पगाराची नोकरी हवीय? तुम्हाला आधी कुठेतकी प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावे लागेल. प्रशिक्षण देणारी संस्था सरकारी असेल तर तुम्हाला भविष्यात नोकरीच्या दृष्टीकोनातूनही चांगले ठरते. अशीच एक संधी चालून आली आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीत विविध पदांची भरती केली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संरक्षण मंत्रालयांतर्गत भारत सरकारचा उपक्रम असून ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट येथे ही भरती केली जाणार आहे. येथे तुम्हाला अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग दिली जाणार आहे. सोबत पगारदेखील दिला जाणार आहे. 


ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी (ग्रॅज्युएट इंजिनीअर्स),  ग्रॅज्यएट  प्रशिक्षणार्थी (जनरल स्ट्रीम)  आणि टेक्निशियन प्रशिक्षणार्थी(डिप्लोमा होल्डर्स) ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 


ग्रॅज्युएट अप्रेंटिस इंजिनीअर्स


ऑर्डनन्स फॅक्टरीमधील भरती अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस इंजिनीअर्सची एकूण 45 पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 9 हजार इतका स्टायपेंड दिला जाणार आहे. 


ग्रॅज्यएट प्रशिक्षणार्थी (जनरल स्ट्रीम)


ग्रॅज्यएट प्रशिक्षणार्थी (जनरल स्ट्रीम) ची एकूण 45 पदे भरली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून बीकॉम, बीएससी किंवा बीसीएमध्ये पदवी पूर्ण केलेली असावी. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 9 हजार इतका स्टायपेंड दिला जाणार आहे. 


तंत्रज्ञ  प्रशिक्षणार्थी


टेक्निशियन  प्रशिक्षणार्थी (डिप्लोमा होल्डर्स) ची एकूण 50 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून  संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 9 हजार इतका स्टायपेंड दिला जाणार आहे. संबंधित पदवी किंवा डिप्लोमा करुन तुम्हाला 5 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असेल तर यासाठी अर्ज करता येणार नाही. तसेच उमेदवाराकडे संबंधित कामाचा 1 वर्षाचा अनुभव असावा. 


कुठे पाठवाल अर्ज?


या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर https://munitionsindia.in/career/ वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.या उमेदवारांनी आपले अर्ज द चीफ जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी, चंदा, चंद्रपूर, महाराष्ट्र-442501 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 


अर्जाची शेवटची तारीख


20 जुलै 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे.  अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा