Kolhapur : कर्नाटक सरकारकडून सीमा (Maharashtra Karnataka Border Dispute ) भागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन होणार आहे. (Maha Vikas Aghadi Protest) कोल्हापूर शहरातील शाहू समाधी स्थळ या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनात मविआचे नेते सहभागी होणार आहेत. (Maharashtra Political News) या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय. सकाळी 10 वाजता हे धरण आंदोलन सुरु होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

( हे सुद्धा वाचा - कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बडबड सुरुच, पुन्हा बरळलेत )


महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद राज्यात उमटत आहेत. कर्नाटककडून (Karnataka) मराठी बांधवाची गळचेपी करण्यात येत असल्याने आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने वाद अधिकच उफाळला आहे. (Maharashtra Political News) कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील नेते एकवटले आहेत. महाविकास आघाडीकडून आंदोलन (Mahavikas Aghadi Protest) करण्यात येणार आहे. त्यामुळे कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात कालपासून 23 डिसेंबरपर्यंत प्रवेश बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. (Maharashtra Political) कोल्हापुरात जमावबंदीचे आदेश लागू असताना महाविकास आघाडीचे नेते आंदोलनावर ठाम आहेत.


कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश बंदीचा निर्णय 


दरम्यान, सीमा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश बंदीचा निर्णय घेतला गेला आहे. आज महाविकास आघाडीचे कोल्हापुरात आंदोलन होणार आहे. कोल्हापुरातील शाहू समाधीस्थळावर आंदोलन होत आहे. आंदोलनात सीमावासीय मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.


कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक, पुन्हा वादग्रस्त वक्तव्य


दुसरीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याप्रकरणी अमित शाह यांची भेट घेतली. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा आडमुठेपणा कायम दिसत आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. तसेच या प्रकरणी कोणतीही तडजोड करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. सीमावादावर बोम्मई यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ते संतप्त झालेत. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरुन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांशी बोलणे झाले आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. तसेच, याप्रकरणात कोणतीही तडजोड करणार नाही, असे ते म्हणाले.