Maharashtra Karnataka border dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बडबड सुरुच, पुन्हा बरळलेत

Karnataka Chief Minister Basavaraj Bommai :  महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद थांबण्याचे नाव घेत नाही. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळलेत.

Updated: Dec 10, 2022, 08:24 AM IST
Maharashtra Karnataka border dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बडबड सुरुच, पुन्हा बरळलेत title=
Maharashtra-Karnataka-Border-Dispute-Bommai

Maharashtra Karnataka border dispute : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद थांबण्याचे नाव घेत नाही. या वादात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई अधिक भर घालत असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळलेत. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काहीही फरक पडत नाही.  (Maharashtra Political) कर्नाटक सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही, असं बोम्मई म्हणाले. सोमवारी कर्नाटकचे खासदार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत. राज्याची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी बोम्मईही लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत. (Mahavikas Aghadi Protest)

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याप्रकरणी अमित शाह यांची भेट घेतली. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा आडमुठेपणा कायम दिसत आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. तसेच या प्रकरणी कोणतीही तडजोड करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

सीमावादावर बोम्मई यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ते संतप्त झालेत. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरुन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांशी बोलणे झाले आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. तसेच, याप्रकरणात कोणतीही तडजोड करणार नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, यासंबधी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट केलेय. ट्विटमध्ये बोम्मई म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी फोनवरुन चर्चा केली आहे, दोन्ही राज्यामध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे यावर आम्ही दोघांचेही एकमत झाले आहे. असे असताना वादग्रस्त वक्तव्य करत ते वादात भर घालत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने हा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील राज्य सरकारला 24 तासांचा अल्टीमेटम दिला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर चर्चा केल्यानंतरही बोम्मई पुन्हा बरळ्याने या चर्चेवर पाणी फिरलेय.