Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणूजे अत्याचार करणारा अल्पवयीन मुलगा हा फक्त 9 वर्षांचा आहे. 9 वर्षीय मुलानेच हे कृत्य केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 15 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरुन कोंढवा पोलिसांनी काल एका नऊ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले. सोशल मीडियाचा प्रभाव असल्याने त्याने हे कृत्य केल्याचे त्याने कबुल केले आहे. पोलिसांनी मुलाला ज्युवेनाईल जस्टिस बोर्डासमोर (जेजेबी) हजर केले, ज्याने त्याचा जामीन मंजूर केला आणि त्याचा ताबा पालकांच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी प्री स्कुलची विद्यार्थिनी आहे. तर, मुलगा स्थानिक शाळेत इयत्ता तिसरीचा विद्यार्थी आहे. गेल्या काही काळापासून ते एकाच वस्तीत राहत असल्याने हे कुटुंब एकमेकांना ओळखत होते. मुलगी त्या मुलाला दादा असं म्हणायची. त्याच्या राहत्या घराजवळील एका ठिकाणी ती एकटी दिसली तेव्हा त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने तिच्या आईला ही घटना सांगितल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला आहे. 


पीडित मुलीने घडलेला सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला. पीडितेच्या आईने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध लैंगिक छळ आणि हल्ल्याशी संबंधित एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुलाला ताब्यात घेतल्यानंतर मुलीला बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या एनजीओच्या प्रतिनिधी उपस्थितीत विश्वासात घेण्यात आले तेव्हा तिने या घटनेची सविस्तर माहिती दिली.