Maharashtra Political News : भाजप आणि शिंदे गटामध्ये (BJP vs Shinde Group) धुसफूस सुरु असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. (Maharashtra Political) विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर उमेदवार परस्पर जाहीर केल्याने ही धुसफूस असल्याची माहिती मिळत आहे. तसेच देवेन भारती यांची नियुक्तीही नाराजीला कारणीभूत असल्याचं कळत आहे. नुकतीच देवेन भारती यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. (Latest Political News in Marathi) तेव्हा या दोन्ही कारणांमुळे सध्या भाजप आणि शिंदे गटामध्ये सारं काही आलबेल नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपने ना. गो. गाणार यांना पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने गाणार यांची उमेदवारी आधीच जाहीर केली होती. भाजपाच्या पाठिंब्यावर गेले दोन टर्ममध्येही गाणार या मतदारसंघातून निवडून आलेत. यंदाही भाजप पाठिंबा देणार की नवीन उमेदवार उभा करणार याची चर्चा सुरु होती. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीही भाजप आमदारांची मतं जाणून घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. यात बहुसंख्य आमदारांनी गाणार यांनाच पसंती दिल्याची माहितीही समोर आली आहे. तेव्हा नाणार यांच्या नावावर भाजपने अखेर शिक्कामोर्तब केलंय.


तर दुसरीकडे अमरावती पदवीधर मतदार संघातून डॉक्टर रणजीत पाटील भाजपचे उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते अमरावतीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर कोकण शिक्षक मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून किरण पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. 12 तारीख उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात राजेंद्र विखे यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.


विद्यापीठ सिनेट सदस्य नियुक्त्यांवरुन वाद उफाळला


गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य नियुक्त्यांवरुन शिंदे गट-भाजपात खटके उडल्याचे दिसून आले आहेत. शिंदे गटाने आपली नावं डावलल्याचा भाजपवर आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करण्याची करण्यात आली आहे.  गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन जिल्ह्यातील राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्यांच्या यादीत डावलण्यात आल्याने शिवसेना शिंदे गटात नाराजी बघायला मिळत आहे.


राजभवनाच्यावतीने 6 जानेवारीला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु प्रशांत बोकारे यांना राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्यांची 9 नावं पाठवण्यात आली. मात्र ही सर्व नावं भाजपच्या जवळची असल्याचा आक्षेप चंद्रपूरच्या शिंदे गट अध्यक्षांनी घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते यांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाने सुचवलेल्या नावांना यादीत स्थान मिळणार नसेल तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्ष्याच्या विस्तारात अडचणी येतील याची जाणीव मुख्यमंत्र्यांना या पत्रातून करून देण्यात आली आहे.