Devendra Fadnavis: उद्यापासून नागपूरमध्ये होणाऱ्या विधीमंडळाच्या (Winter Assembly Session) हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. अधिवेशनाआधी पंरपरेगत होणाऱ्या चहापानावर विरोधकांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार घातला. त्यामुळे आता हिवाळी आधिवेशनामुळे राज्यातील वातावरण तापणार हे आता निश्चित झालं आहे. एकीकडे विरोधक सरकारला अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात असताना आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलंय. (devendra fadnavis should be chief minister of maharashtra in my bjp state president tenure said chandrakant bawankule)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जातीपातीच्या बाहेर निघालेले नेते आहे. प्रत्येकाला न्याय मिळाला, यासाठी त्यांनी मदत केली आहे. कोणी मराठा असेल, कोणी धनगर असेल किंवा ओबीसी असेल, सर्वांसाठी त्यांनी काम केलंय. त्यामुळे आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की, फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले आहेत.


माझ्या भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या (BJP State President) कार्यकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं वक्तव्य केल्याने आता राज्यात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर तीन वेळा सरकार बदललं त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार की काय?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.


आणखी वाचा - Maharashtra Politics: ''सकाळी उठल्यावर जे सुरू होते त्यानं...'' चंद्रशेखर बावनकुळे यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा


दरम्यान, नागपुरातील एका कार्यक्रमात बावनकुळेंनी (Nagpur News) हजेरी लावली होती. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मारक आणि आर्ट गॅलरीचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. आपली ही जबाबदारी आहे की पुन्हा 2014 ते 2019 चा काळ महाराष्ट्रात आला पाहिजे. त्यासाठी आपण सर्व समाजातील लोकांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Chandrasekhar Bawankule on Devendra Fadnavis) मागे उभं राहिलं पाहिजे, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.