Prakash Ambedkar On PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत भाजपने विजयाचा गुलाल उधळला. सलग तिसऱ्यांना नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. भाजपच्या 20 जागा कमी झाल्या असत्या तर मोदी पंतप्रधान झाले नसते असा दावा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. झी २४ तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसने वंचितला सोबत घेतलं असतं तर आज राहुल गांधी पंतप्रधान झाले असते असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेसने वंचितला सोबत घेतलं असतं तर भाजपला रोखता आलं असतं. वंचित आणि काँग्रेसने मिळून भाजपला 220 जागांच्या वर जाऊ दिलं नसतं असंही आंबेडकर म्हणालते. तसंच जर भाजपच्या 20 जागा कमी झाल्या असत्या तर मोदी पंतप्रधान झाले नसते तर राहुल गांधी पंतप्रधान झाले असते असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केलाय.. वंचितला न घेतल्याने काँग्रेसने पंतप्रधानपदाची संधी गमावली असं आंबेडकर म्हणाले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या रेकॉर्डशी बरोबरी केलीये... देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी 1952, 1957 आणि 1962 मध्ये तीन निवडणुकांमध्ये बहुमत गाठत सलग तीनदा पंतप्रधानपद भुषवलं होतं. त्यांच्यानंतर सलग तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.


लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाची ऑफर होती -  मंत्री नितीन गडकरींचा गौप्यस्फोट


लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाची ऑफर होती, असा गौप्यस्फोट मंत्री नितीन गडकरींनी केलाय. विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याने संपर्क साधून पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. मात्र ती ऑफर फेटाळली, असा दावा गडकरींनी नागपुरातील एका कार्यक्रमात केला. ऑफर देणा-या बड्या नेत्याचं नाव गडकरींनी मात्र सांगितलं नाही.