मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी (chandrapur Liquor ban) उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबतची माहिती दिली. "दारुबंदी नंतरही चंद्रपुरात अवैधरित्या आणि डुप्लिकेट दारु विकली जात होती. यामुळे दारुबंदी उठवण्यासाठी अडीच हजार निवेदनं देण्यात आली. जिल्ह्यात दारुबंदीचे परिणाम दिसू लागले होते. या पार्श्वभूमीवर एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने लोकांमध्ये जाऊन दारुबंदीबाबत जाणून घेतलं. त्यानुसार या समितीने एक अहवाल तयार केला. हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला. यानुसार मंत्रिमंडळाने ही दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला", असं वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यात फडणवीस सरकारने 6 वर्षांपूर्वी 20 जानेवारी 2015 मध्ये दारुबंदीचा निर्णय घेतला होता. (maharashtra state cabinet meeting mahavikas aaghadi remove chandrapur Liquor ban)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लॉकडाऊनबाबत वडेट्टीवार काय म्हणाले?


'लॉकडाऊनबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की याबाबत वेगळी चर्चा करू, रेड झोनमध्ये अजूनही काही जिल्हे आहेत. आता रुग्ण कमी होत असले तरी गेल्या लाटेतील उच्चांकी आकडा आहे. आता 64 हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहे. तज्ज्ञांचे मत घेऊन टप्प्याने निर्बंध उठवू.' अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.