Maharashtra Weather Update : संपूर्ण देशातून पावसाने माघार घेतली असली तरीही महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, संभाजीनगर, जालना या भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे ऑक्टोबर हीटचा तडाखा बसत असताना काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेकदा नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 



हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या व मध्यम सरीचा पाऊस कोसळेल. 22 ऑक्टोबरला राज्यातील उत्तर महाराष्ट्रातून मान्सून निघून जाणार आहे. त्यानंतर 23 ऑक्टोबरला राज्यातील मराठवाडा विभागातील मान्सून माघारी फिरणार आहे आणि 24 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार असा दावा हवामान तज्ज्ञ करत आहेत. याशिवाय, येत्या 5 नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.



या जिल्ह्यांना यलो अलर्ट 


रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवा़ा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.