Devendra fadanvis In Khupte Tithe Gupte: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सरकार स्थापन करताना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदी (CM of Maharastra) शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आणि राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) मोठी खळबळ उडाली. केंद्राकडून फडणवीसांचं डिमोशन करण्यात आलं, अशी चर्चा सर्वत्र झाली. अशातच खुपते तिथे गुप्ते (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात, मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे तुम्ही नाराज झाले होते, असं तुमचे नेते म्हणाले होते. तुमची निवड फायनल असताना असं का झालं? असा सवाल अवधुत गुप्ते यांनी केला. त्यावर फडणवीसांनी (Devendra fadanvis) रोखठोक उत्तर दिलं. 


नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला वाटतं क्रोनोलॉजी चुकतीये. मी मुख्यमंत्री होणार नाही हे मी ठरवलं. ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं. तेव्हा आता हे सरकार बदललं पाहिजे, हे आपल्या विचारांनी चालू शकत नाही. सरकारमध्ये हिंदुत्वाद्यांचा जीव गुदमरतोय, अशी परिस्थिती मांडली गेली. त्यावेळी मी माझ्या पक्षाकडे गेलो. माझ्या पक्षाला मी सांगितलं, की आपण शिंदेंना मुख्यमंत्री केलं पाहिजे. पक्षाला समजवण्यासाठी माझ्या पक्षाला बराच काळ द्यावा लागला. पक्षाला लगेच मान्य झालं नव्हतं. मी पक्षाला सांगितलं, मी सरकारचा भाग असणार नाही. मी पक्षाची जबाबदारी सांभाळेल. मी दोन अडीच वर्ष मेहनत करून पक्षाला क्रमांक 1 चा पक्ष करतो. त्याप्रमाणे सर्व ठरलं. आम्ही राज्यपालांना पत्र देयला गेलो. त्यावेळी मी चार लोकांना सांगितलं, की शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत. तोपर्यंत मला, शिंदेंना आणि आमच्या तीन वरिष्ठांना माहिती होतं. 


प्रेस कॉन्फरेन्समध्ये मी घोषित केलं शिंदे मुख्यमंत्री होणार आहे, त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर थोडं सुद्धा दु:ख दिसत नव्हतं. माझा चेहरा विजयी होता. मला जिंकल्याचा आनंद होता. घरी आल्यावर माझ्या नेत्यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की, तुला उपमुख्यमंत्री व्हायचंय आणि हा माझ्याकरता धक्का होता. मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री होतोय, खालच्या पदावर जातोय, याचं दु:ख नव्हतं. माझ्या पक्षाने सांगितलं तर मी चपरासी व्हायला तयार आहे. मला चिंता होती की लोकं काय म्हणतील... सत्तेसाठी हा किती हापापलेला आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री होता, आता उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाला. पंतप्रधानांनी ज्याप्रकारे ट्विट केलं. त्यामुळे कोणाच्या मनात संभ्रम उरला नाही. जी प्रसिद्धी मला मुख्यमंत्री असताना मिळाली नसती, ती मला उपमुख्यमंत्री झाल्यावर मिळाली, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी समाधान व्यक्त केलं आहे.


पाहा Video



दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी या कार्यक्रमात अनेक विषयांवर रोखठोक मत मांडलं. त्यावेळी त्यांनी ट्रोलिंगवर आगपाखड केली अन् उद्धव ठाकरे गटावर सडकून टीका देखील केली. उद्धव ठाकरे यांनी समोरून येऊन आम्हाला सांगायला पाहिजे होते, असं म्हणत त्यांनी नाराजी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी पावडर नाही, तर सोटा घेऊन फिरतात आणि जे लोक मळलेले आहेत त्यांना लाईनीवर आणतात, असं म्हणत त्यांनी वाशिंग पावडरवर कमेंट केली. महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टीमने टीका करण्याची खालची पातळी गाठली आणि त्यामुळे राजकरणाला वाईट कलाटणी आली, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.