Udhhav Thackrey On Sandipan Bhumre :  ठाकरेंची शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतल्या रंगशारदा इथं बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले. मंत्रीपदाच्या काळात अनेक वाईन शॉप लायसन्स विकत घेतले असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते दत्ता गोर्डे  यांनी संदीपान भुमरे यांच्यावर केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रीपदाचा गैरवापर केला


छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भुमरे यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात पदाचा गैरवापर करत सहा पेक्षा जास्त वाईन शॉप लायसन्स विकत घेतले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते दत्ता गोर्डे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. नियमावलीनुसार मंत्री असताना अशा पद्धतीने कुठलाही शासकीय परवाना  स्वतःचा पत्नीचा वा अपत्याच्या नावाने घेता येत नाही तर मग हे परवाने कसे घेतले? असा सवाल त्यांनी केला आहे आणि याबाबतची तक्रार त्यांनी लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधानांना केली आहे.


संदिपान भुमरे यांच्यावर कारवाई झाली नाही तर हायकोर्टात दाद मागणार असा इशाराही त्यांनी दिला आहे. सोबतच लोकसभा निवडणूक लढवत असताना प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांचं उत्पन्न कमी दाखवलं आहे जमीन खरेदी आणि वाईन शॉप पासून मिळणारे उत्पन्न त्यांनी दाखवलं नाही हा सगळा नियम भंग आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दत्ता गोर्डे यांनी केली आहे.