Ajay Baraskar on Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांतता रॅली दौरा सुरू आहे. ही रॅली अहमदनगरमध्ये 12 डिसेंबरमध्ये येणार असून या पार्श्वभूमीवर पूर्वश्रमीचे मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते अजय महाराज बारस्कर यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर तोफ डागली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत जे डाव टाकले आहेत ते फसलेयत अशी टीका त्यांनी जरांगेंवर केली. लोकसभेत जरांगेनी केलेल्या आवाहनानुसार जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंचा पराभव झाला आणि कल्याण काळे विजयी झाल्याचे ते म्हणाले. मात्र त्याच कल्याण काळे यांनी लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू शकत नाही असे व्यासपीठावर जाऊन सांगितले. त्या कल्याण काळेंबाबत मनोज जारंगे पाटील यांनी कोणती भूमिका घेतली?असा प्रश्न त्यांनी जरांगेंना विचारला. मला तुमचे समर्थक शिवीगाळ करतात मग कल्याण काळे यांचे बाबत काय भूमिका घेतली? असे त्यांनी विचारले.


गरजवंत मराठ्यांचा लढा आता राहिला नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आता बंद झालंय अशी घोषणा त्यांनी स्वतःच केली असून गरजवंत मराठ्यांचा लढा आता राहिलेला दिसत नाही. कोणाला निवडून आणायचे कोणाला पाडायचे, जाती जातीचे समीकरण त्यांनी केलं. दोन समाजातील धार्मिक समीकरणे जुळतात का? हे राजकारण सध्या मनोज जरांगे पाटील हे करत आहेत. उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केल्याचा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला आहे.


'कांद्याने लोकसभेत कंबरडं मोडलं चूक मान्य करतो...' अजित पवारांची निफाडमध्ये कबुली


जरांगेंनी 17 प्रश्नांची उत्तरे द्यावी


अहमदनगर शहरांमध्ये मनोज जरंगे पाटील यांच्या शांतता रॅली आगमन झाल्यानंतर मी त्यांचे स्वागत करणार असून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जातीय व्यवस्थेचे निर्मूलन हे पुस्तक भेट देणारा असून मला पडलेले आणि मराठा समाजाला पडलेले 17 प्रश्न मला त्यांना विचारायचे आहेत. त्यांनी संपूर्ण मीडियासमोर आणि संपूर्ण समाजासमोर माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी जर त्या प्रश्नांनी माझे समाधान झाले आणि माझे काही चुकले असेल तर मी त्यांची जाहीर माफी मागेल आणि त्यांचे चुकले असेल तर त्यांनी समाजाची जाहीर माफी मागावी असे आव्हान अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले आहे.


....यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीका